T20 World Cup | नेदरलँड्सने जाता जाता दिले गिफ्ट, ‘या’ सामन्याआधीच भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा: टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये नेदरलँड्स (Nederland) ने सुपर 12 (Super 12) फेरीमधील आपल्या शेवटच्या सामन्यात सर्वात मोठा धक्का दिला आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) ला पराभूत करून नेदरलँड्सने या संघाला स्पर्धेतून बाहेर काढलं आहे. परिणामी, दक्षिण आफ्रिका बाहेर पडल्यामुळे भारत (India) थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरत आहे. आज बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात होणारा दुसरा सामना उपांत्य फेरीसारखाच ठरणार असून, हा सामना जो संघ जिंकेल तो उपांत्य स्पर्धेसाठी पात्र होईल असे चित्र दिसत आहे.

दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकाचा 13 धावांनी पराभव झाला. नेदरलँड्स संघाने दिलेल्या 158 धावांचं लक्ष दक्षिण आफ्रिका पूर्ण करू शकली नाही. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने या सामन्यामध्ये वेळोवेळी आपल्या विकेट्स गमावल्या. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी शेवटच्या शटकामध्ये 6 चेंडू मध्ये 26 धावा हव्या होत्या. पण दक्षिण आफ्रिका शेवटच्या शतकामध्ये फक्त 12 धावा काढू शकली. परिणामी दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकता आला नाही.

पॉईंट्स टेबलवर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर असला तरी बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो दक्षिण आफ्रिकेची जागा घेईल असे चित्र दिसत आहे. दरम्यान, भारताचा एक सामना बाकी असला तरी भारताचा रन रेट चांगला असल्यामुळे भारत पुढील फेरीसाठी पात्र ठरत आहे. टी20  विश्वचषक सामन्यांमध्ये उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा भारत हा पहिला संघ आहे.

नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यानंतर भारत दुसऱ्या गटांमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, भारतीय संघाचा रन रेट +0.73 आहे. त्यामुळे भारत आता कायम पहिल्या स्थानी राहणार आहे. त्याचबरोबर भारताचा एक सामना बाकी आहे. तरीही, बांगलादेश आणि पाकिस्तान यांना भारताचा रन रेट घटना कठीण आहे. दोन विजय आणि दोन पराभव स्वीकारून पाकिस्तान संघ पॉईंट्स टेबलच्या तिसऱ्या स्थानी आहे. तर बांगलादेश विरुद्धच्या सामन्यांमध्ये जो संघ जिंकेल त्याचे सहा गुण होऊन तो पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकतो.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.