T20 World Cup | फ्लॉप झालेल्या केएल राहुलऐवजी ऋषभ पंतला ओपनिंगची संधी? संघ प्रशिक्षकाची मोठी माहिती

T20 World Cup |  टीम इंडिया 2022 च्या T20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करत आहे. पाकिस्तानला हरवून आपल्या मोहिमेची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात नेदरलँडचा पराभव केला. सलग 2 विजयांसह संघ 4 गुणांसह टीम इंडिया गट 2 मध्ये अव्वल आहे, मात्र आता दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे आव्हान आहे. गटात दक्षिण आफ्रिका ३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पर्थमध्ये रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी सलामीवीर केएल राहुल बाबत वक्तव्य केले आहे. केएल राहुल पहिल्या दोन सामन्यांमध्ये धावा करू शकला नाही.

विक्रम राठोड म्हणाले, “आम्ही सध्या केएल राहुलच्या जागी पंतला खेळण्याची संधी देणार नाही, तो भारतासाठी डावाची सुरुवात करताना दिसेल. मॅचमध्ये फक्त 11 लोकच खेळू शकतात. मी मान्य करतो की ऋषभ पंत हा अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे, तो काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आम्ही त्याच्याशी जे बोललो तर त्याने तो तयार असल्याचे सांगितले आहे. त्याला लवकरच संधी मिळेल. त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार असले पाहिजे आणि तो सरावात खूप मेहनत घेत आहे.”

भारतासमोर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे आव्हान-

भारतीय फलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज हे सर्वात मोठे आव्हान आहे. गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा १०४ धावांनी पराभव केला. या मोठ्या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेच्या धावगतीमध्येही बरीच सुधारणा झाली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. बांगलादेशविरुद्ध अॅनरिक नोर्कियाने 10 धावांत 4 बळी आणि तबरेझ शम्सीने 20 धावांत 3 बळी घेतले. रिले रुसोनेही 109 धावांची अप्रतिम खेळी खेळली.

जर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने हा सामना जिंकला तर त्यांच्या उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता वाढेल. दुसरीकडे, भारतीय संघ जिंकला तर उपांत्य फेरीत जाईल. पाकिस्तानची नजर या सामन्यावर अधिक असेल कारण त्यांना दक्षिण आफ्रिकेने हा सामना हरावा असे वाटते. उद्या रविवार साडेचार वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.