T20 World Cup | बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तान संघ पोहोचला उपांत्य फेरीत

टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये आज पाकिस्तान (Pakisthan) आणि बांगलादेश (Bangladesh) यांचा सामना रंगला होता. या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने बांगलादेश संघाला पराभूत करत अंतिम चार मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये बांगलादेशनी 8 विकेट्समध्ये अवघ्या 127 धावा केल्या होत्या. तर, पाकिस्तान संघाने 18.1 षटकांमध्ये 5 गडी गमावत हे लक्ष्य गाठले आहे. या विजयानंतर पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर या सामन्याच्या विजयानंतर पाकिस्तान संघ पॉइंट्स टेबलवर पहिल्यांदाच प्रथम क्रमांकावर गेला आहे.

पाकिस्तान संघ टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

आज बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने बांगलादेश संघाला हरवून उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. या सामान्यदरम्यान, बांगलादेशने पाकिस्तान संघाला 128 धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांनी यांनी सामन्याला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून सामन्यादरम्यान अर्धशतक गाठले. यामध्ये बाबरने 25 तर रिझवाने 32 धावा केल्या. तर मोहम्मद हरीसने 18 चेंडू मध्ये 31 धावा काढल्या. तर, बांगलादेश कडून नजमुल अहमद, शाकिब, मुस्तफिझूर आणि इबादत हुसेन यांनी पाकिस्तान संघाच्या 1-1 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात बांगलादेशची फलंदाजी

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तर या सामन्यांमध्ये 73 धावांवर 2 गडी गमावल्यानंतर बांगलादेश चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल असे चित्र दिसत होते. मात्र अचानक बांगलादेश संघातील फलंदाजांनी पाकिस्तान संघातील गोलंदाजासमोर गुडघे टिकल्याचे दृश्य समोर आले. या सामन्यांमध्ये अर्धशतक करणारा नजमुल हुसेन हा एकमेव फलंदाज ठरला. 48 चेंडू मध्ये त्याने 53 धावा केल्या.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटांमध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय संघाने उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. दरम्यान, निर्णय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने बांगलादेश संघाला हरवल्यास ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. याचा अर्थ असा की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ बाद फेरीमध्ये पोहोचतील. न्यूझीलंड आणि इंग्लंड सोबत त्यांचा उपांत्य फेरीमध्ये सामना होणार आहे. दोन्ही देशांच्या संघासोबत सामन्यामध्ये पाकिस्तान आणि भारत यश मिळाले तर अंतिम फेरीमध्ये त्यांची गाठ पडू शकते.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.