T20 World Cup | विराट कोहलीला संघातून वगळण्याचा सल्ला देणाऱ्यांनी एकदा IND VS PAK सामना पाहावा
T20 World Cup : T20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 31 धावांत 4 मोठ्या विकेट्स गमावल्या. यानंतर कोहली आणि हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. यासह संघाने गतवर्षी विश्वचषकात 10 विकेट गमावल्याचा बदलाही घेतला आहे. याआधी पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद आणि मसूद यांनी अर्धशतके झळकावली. कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. हा दिवस विराटचा होता. विराटने आज ‘विराट’ खेळी केली. त्यामुळे त्यांला संघातून बाहेर काढण्याचा सल्ला देणारे देखील त्याचे कौतुक करत आहेत.
संपूर्ण देश उद्या दिवाळी साजरी करत आहे. पाकिस्तानला हरवत भारतीय संघाने देशाला दिवाळी गिफ्ट दिले. पाकिस्तानवर विजय मिळाल्यानंतर अनेक भावनिक क्षण पाहायला मिळाले. गंभीर म्हणाला, “विराटच्या प्रतिभेचे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द आहेत असे मला वाटत नाही. यावरून त्यांच्यात विशेष प्रतिभा असल्याचे दिसून येते. मला वाटतं आज विराटचा दिवस होता.”
सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “विराट कोहली हा भारताचा सर्वोत्तम चेस मास्टर आहे यात शंका नाही. हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. हरिस रौफच्या चेंडूवर विराटने मारलेला षटकार अप्रतिम आहे. काही लोक त्याच्या फॉर्मबद्दल बोलायचे. पण विराट कधीच आउट ऑफ फॉर्म नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. त्याला केवळ शतक झळकावता आले नाही.”
What it meant to win at The G! 💪🏻
Scorecard ▶️ https://t.co/mc9useyHwY #TeamIndia | #T20WorldCup | #INDvPAK | @imVkohli pic.twitter.com/A1uFG5Lbxr
— BCCI (@BCCI) October 23, 2022
कोहलीने भारतीय चाहत्यांना दिली दिवाळी भेट –
विराट कोहलीने भारतीय चाहत्यांना दिवाळी भेट दिली आहे. या सामन्यात त्याने 53 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी खेळली. भारतीय चाहत्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहणारी ही खेळी आहे. कोहली चेस मास्टर आणि मॅच विनर म्हणून परतला आहे. या विजयासह टीम इंडियाने गतवर्षी T20 विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. गेल्या वर्षी पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. तेव्हा संघाचा कर्णधार विराट कोहली होता.
शेवटच्या षटकातील थरार-
भारताला 6 चेंडूत 16 धावा करायच्या होत्या. हे षटक डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजने टाकले. पंड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने 37 चेंडूत 40 धावा केल्या. एक चौकार आणि दोन षटकार मारले. दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने धाव घेतली. कोहलीने तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर षटकार मारला. तोही नोबॉल होता. आता 3 चेंडूत 6 धावा हव्या होत्या. चौथ्या चेंडूवर कोहली बोल्ड झाला, पण फ्री हिटमुळे तो आऊट झाला नाही. 3 धावाही मिळाल्या. आता 2 चेंडूत 2 धावा करायच्या होत्या. कार्तिक 5 व्या चेंडूवर यष्टिचित झाला. त्याने 2 चेंडूत एक धाव घेतली. आता एका चेंडूवर 2 धावा हव्या होत्या. नवाजने पुढचा चेंडू वाईड दिला. अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात पाकिस्तान संघ चांगलाच कावरा-बावरा झाला होता. नो बॉल आणि वाईड गेल्यानंतर पाकिस्तानी खेळाडून पंचांवर दबाव आणत होते. मात्र नशिबाला सुद्धा पाकिस्तान जिंकणे मान्य नव्हते. त्यामुळे शेवटल्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताचा विजय झाला.
महत्वाच्या बातम्या :
- IND VS PAK । हार्दिक मला आत्मविश्वास देत होता; विजयानंतर विराट कोहलीचा मोठा खुलासा
- IND VS PAK | पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हार्दिक पांड्या ढसाढसा रडला! म्हणाला, “आमच्यासाठी आई बापाने…”
- Weight Loss Tips | दिवाळीमध्ये जर वजन वाढू द्यायचे नसेल तर ‘या’ गोष्टी करा फॉलो
- IND VS PAK | ते शेवटचे थरारक षटक, पाकिस्तान संघ कावरा-बावरा ; वाचा नेमकं काय घडलं
- IND VS PAK । भारताची ऑस्ट्रेलियात ‘विराट’ दिवाळी; पाकिस्तानला धो-धो धुतले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.