T20 World Cup साठी टीम इंडिया फायनल! रोहित म्हणाला, “काही स्लॉट रिकामे आहेत, पण…”
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 टी-20 मालिकेपूर्वी रोहित शर्मा याने T20 World Cup (टी -20 विश्वचषक) बाबत भाष्य केले आहे. “गेल्या विश्वचषकात आम्हाला अनुकूल निकाल मिळाले नाहीत पण याचा अर्थ असा नाही की आम्ही इतक्या वर्षांत वाईट क्रिकेट खेळलो. क्रिकेट विश्वचषकात आम्ही एक किंवा दोन सामने गमावले तर याचा अर्थ असा नाही की आम्ही संधीचा फायदा घेतला नाही,” असे रोहित शर्मा म्हणाला.
रोहित शर्मा म्हणाला, “विश्वचषकापूर्वीची आमची कामगिरी बघितली तर आम्ही जवळपास ८० टक्के सामने जिंकले. विश्वचषकात आपण हरलो हे खरे आहे, पण तसे घडते. याचा अर्थ आम्ही मुक्तपणे खेळत नव्हतो असा नाही. त्यानंतर आम्ही कोणताही बदल केला नाही. आम्ही पूर्वीप्रमाणेच खेळत होतो, पण खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळण्यासाठी अधिक स्वातंत्र्य देण्यात आले. मोकळेपणाने खेळा आणि कोणत्याही प्रकारचे अनावश्यक दबाव घेऊ नका. जर तुम्ही मोकळेपणाने खेळाल तर ते कामगिरीत दिसून येईल.”
काळाबरोबर प्रत्येकाला बदलावे लागेल –
“आम्ही सध्या ज्या प्रकारचे क्रिकेट खेळत आहोत त्यात अधूनमधून अपयश येणे निश्चितच आहे. पण त्यात काही अडचण नाही कारण आम्ही काहीतरी शिकत आहोत आणि प्रयत्न करत आहोत. काहीतरी वेगळे करत आहोत. त्यामुळे चुकांना फारशी जागा नाही, पण याचा अर्थ असा नाही की आमचे खेळाडू खराब खेळत आहेत. काळाबरोबर प्रत्येकाला बदलावे लागेल आणि आपण बदल करत आहोत आणि मला वाटते की बाहेर बसलेल्या लोकांनीही त्यांची विचारसरणी बदलली पाहिजे,” असे देखील रोहित शर्माने स्पष्ट केले.
टी-२० विश्वचषकासाठी संघ जवळपास निश्चित झाला आहे-
या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जवळपास निश्चित झाला आहे आणि आता फक्त काही स्लॉट रिकामे आहेत, असे रोहितने म्हटले आहे. तो म्हणाला, “संघात काही पोकळी जी अजून भरायची आहेत आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल हे आम्हाला माहीत आहे. आम्ही सध्या खेळत असलेल्या सामन्यांमध्ये आम्ही या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहोत.”
महत्वाच्या बातम्या :
- IND vs WI T20 : टीम इंडियात दमदार फलंदाजाची अचानक एंट्री, तरीही रोहितला वेस्ट इंडिजची भीती!
- Eknath Shinde’s banner torn | छगन भुजबळांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडला
- Bheem army | “तिरुपती देवस्थान प्रकरणातील दोषींवर कारवाई करा, अन्यथा…”; भीम आर्मी आक्रमक
- Amol Mitkari | फडणवीसांचे ट्विट म्हणजे ‘मूह मे राम, आणि बगल मे छुरी’ – अमोल मिटकरी
- Uddhav Thackeray । ते शिवसैनिक नाहीत, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Comments are closed.