T20 World Cup । झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू ढसाढसा रडला, व्हिडिओ व्हायरल

T20 World Cup । मुंबई : टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर खेळाडूंची निराशा झाली. पाकिस्तान खेळाडू शादाब खान ही रडू लागला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानचा 1 धावेने पराभव करत मोठा अपसेट केला. पाकिस्तान संघाच्या पराभवाचा विचारही कोणी केला नाही.

या धक्कादायक पराभवाने शादाबला शारीरिक नव्हे तर भावनिकदृष्ट्या तुटून पडलं. सामना गमावल्यानंतर तो रडू लागला. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो गुडघ्यावर बसून रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला त्यांच्या सुपर 12 चे उर्वरित तीन सामने जिंकणे आवश्यक आहे.

मात्र, अंतिम चारसाठी पात्र ठरण्याची त्यांची शक्यता इतर सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून असेल. अशा स्थितीत पाकिस्तान संघाला पुढील वाटचाल निश्चित करणे कठीण झाले आहे, असे म्हणता येईल. याआधी भारताविरुद्धचा सामनाही शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर झिम्बाब्वेविरुद्धचा सामनाही शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि त्यात पाकिस्तानी संघाचा एक धाव कमी पडल्याने पराभव झाला. पाकिस्तानचा संघ आता नेदरलँड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी इतर संघांचे निकाल महत्त्वाचे असतील.

महत्वाच्या बातम्याः

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.