T20 World Cup । टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादवशी सुरु असलेल्या कंपटीशनवर बाबर आझमची मोठी प्रतिक्रिया

नवी दिल्ली : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव सोबतच्या स्पर्धेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, मी कोणत्याही खेळाडूशी स्पर्धा करण्यावर लक्ष देत करत नाही, तर माझे लक्ष केवळ संघासाठी सामने जिंकण्यावर असते. खरं तर, पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सध्या आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

दुसरीकडे भारताचा सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. या खेळाडूंमध्ये एकमेकांना मागे टाकण्याची स्पर्धा लागली आहे. तसेच पुढे पहा, मी फक्त एका व्यक्तीबद्दल बोलू शकत नाही आणि करू नये कारण संघ प्रथम येतो. पहिला संघ जिंकण्याचा प्रयत्न असतो. रँकिंग तुम्हाला नेहमीच आत्मविश्वास देते, असंही बाबर म्हणाला.

जेव्हा तुम्ही पहिल्या नंबरवर येता तेव्हा ते एक स्वप्न असते आणि जेव्हा तुम्ही ते साध्य करता तेव्हा आनंद मिळतो. याआधी मोहम्मद रिझवाननेही सूर्यकुमार यादवसोबतच्या स्पर्धेवर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, सूर्यकुमार यादव खूप चांगला फलंदाज आहे. रिझवानच्या म्हणण्यानुसार तो नंबर वन पोझिशन किंवा मॅन ऑफ द मॅच याकडे लक्ष देत नाही.

महत्वाच्या बातम्या :

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.