T20 World Cup । T20 विश्वचषकापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली चांगल्या फॉममध्ये, प्रॅक्टिस मॅचमधील व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : लवकर टी-20 विश्वचषक सुरु होणार आहे. यावेळी हि स्पर्धा आस्ट्रेलिया येथे पार पडणार आहे. टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. त्याआधी टीम इंडिया आपल्या तयारीत व्यस्त आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी गुरुवारी प्रॅक्टिस मॅचमध्ये भाग घेतला. यादरम्यान दोन्ही खेळाडू जबरदस्त फॉममध्ये दिसले.

विराट कोहलीसाठी हा टी-20 विश्वचषक खूप महत्त्वाचा असणार आहे. यामुळे तो त्याच्या तयारीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्याचवेळी रोहित शर्मालाही त्याने यावेळी विश्वचषकात चांगली कामगिरी करावी असे वाटते. संघाचा कर्णधार असल्याने त्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. हे दोन्ही फलंदाज मैदानात जोरदार सराव करताना दिसतायत.

भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो त्याच्या पुल शॉटचा सराव करत आहे. रोहित शर्माने हा शॉट अतिशय शानदार खेळला आणि चेंडूला मैदानाबाहेर पाठवले.

त्याचवेळी, आणखी एका व्हिडिओमध्ये विराट कोहली चेंडूला चांगलाच मिडल करताना दिसत आहे. विराट कोहलीला आतापर्यंतच्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये खेळायला दिले गेलेले नाही. अशा स्थितीत तो सराव सत्रात अधिकाधिक फलंदाजी करत आहे.

 

दरम्यान, टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध त्यांच्या घरी दोन मालिका खेळल्या होत्या आणि दोन्ही मालिका जिंकल्या होत्या. मात्र, जसप्रीत बुमराहची भरपाई करणे संघासाठी सोपे जाणार नाही. त्याचबरोबर काही खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत, त्यामुळे त्या खेळाडूंना लवकरच जुळवून घ्यावे लागेल. भारतासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे खेळाडूंची दुखापत. एकापाठोपाठ एक अनेक खेळाडू जखमी होत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.