T20 World Cup । T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूचा समावेश

नवी दिल्ली । T20 विश्वचषक 2022 सुरू होण्यास आता फारच कमी वेळ शिल्लक आहे. त्याआधी बीसीसीआयने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या जागी अनुभवी मोहम्मद शमी याचा संघात समावेश करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून शमीच्या नावाची चर्चा होती. आता बीसीसीआयनेही त्याला अधिकृत दुजोरा दिला आहे.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज शमी, ज्याने गेल्या विश्वचषकापासून भारतासाठी एकही T20 सामना खेळलेला नाही. त्याला निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या द्विपक्षीय T20 मालिकेसाठी निवडले. मात्र त्याला राखीव खेळाडूंपैकी सहभागी करून घेण्यात आले. त्यावेळी जसप्रीत बुमराह प्रमुख गोलंदाज म्हणून संघात होता.

दुखापतीतून बरे झाल्यानंतर बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेत पुनरागमन केले. पण दोन सामन्यांनंतर त्याला पाठीला दुखापत झाली. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेतून तो बाहेर पडला. काही दिवसांनंतर बीसीसीआयनेही त्याला वर्ल्ड कपमधून वगळण्यात आले.अशा स्थितीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीशिवाय मोहम्मद सिराज आणि दीपक चहर यांचीही नावे चर्चेत होती,

पण चहरलाही दुखापत झाली आणि तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. चहरच्या जागी शार्दुल ठाकूरचा तर शमीच्या जागी सिराजचा राखीव यादीत समावेश करण्यात आला आहे. दोघेही लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. त्याच वेळी, मोहम्मद शमीने नुकतेच ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याचे फोटो शेअर केले आहेत. तो लवकरच भारतीय संघात सामील होईल आणि सराव सामन्यांसाठी उपलब्ध असेल.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.