T20 World Cup 2022। टी-२० विश्वचषकात भारतीय संघातील ‘हा’ खेळाडू सर्वात महत्वाचा ठरेल; सुरेश रैनाचा खुलासा

T20 World Cup 2022 । नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकात लवकर टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान संघासोबत होणार आहे. त्याचवेळी भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना याने टी-20 विश्वचषकासाठी टीममधील एक खेळाडू सर्वात महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे. सुरेश रैनाच्या मते, सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी गेम चेंजर सिद्ध होऊ शकतो आणि तो संघाला विश्वचषक जिंकून देऊ शकतो.

सूर्यकुमार यादवबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अलीकडे त्याने खूप धावा केल्या आहेत. यामुळेच सर्वजण त्याला टी-२० विश्वचषकासाठी ( T20 World Cup ) खूप महत्त्वाचे मानत आहेत. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. संघाकडे आघाडीच्या फळीत सर्वोत्तम फलंदाज आहेत आणि त्यामुळेच मधल्या फळीत सूर्यकुमार यादवच्या धावांनी संघाला मजबूत स्थितीत आणले आहे.

सुरेश रैनाच्या मते, सूर्यकुमार यादवमध्ये प्रचंड क्षमता आहे. याशिवाय त्याने हार्दिक पांड्याचेही त्याने कौतुक केले आणि तो खेळावर नियंत्रण ठेवेल असे सांगितले. रैना म्हणाला, सूर्यकुमार यादवने गेल्या दोन वर्षांत ज्या प्रकारे खेळ दाखवला, त्याच इराद्याने त्याने खेळावे असे मला वाटते. त्याचा अँगल आणि बॅटचा स्विंग जबरदस्त आहे.

मात्र, माझ्यासाठी हार्दिक पांड्या सर्वात महत्त्वाचा असणार आहे. तो खेळावर नियंत्रण ठेवेल आणि संघासाठी आवश्यक असलेली षटके टाकेल. एमएस धोनीने इतकी वर्षे संघासाठी केला तसा तो खेळही पूर्ण करेल. हे खेळाडू टी-२० विश्वचषकासाठी ( T20 World Cup ) खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी गेम चेंजर असेल पण अर्शदीप सिंग, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही विसरू नका.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.