InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

अपघात

‘चारधाम’साठी निघालेल्या बसचा अपघात; चार ठार, अनेक जखमी

नाशिकहून चारधामला निघालेल्या सर्वज्ञ यात्रा कंपनीच्या बसला काल रात्री 10 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील विदीशा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत.जखमींवर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीच बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.या…
Read More...

ताबा सुटला अन् अपघात झाला ; ३ ठार, १ जखमी

नगर- पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जखमी.आहे. जखमीला जवळील रुग्णायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमधील सर्वच व्यक्ती हे धुळ्याचे रहिवाशी होते.पुणेकडून नगरकडे जाणाऱ्या रोडवर जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रक MH 22 AA 524 वर पाठिमागून आलेल्या स्कार्पिओ नंबर MH 18 AJ 8443 या गाडीने जोराची धडक दिली. पहाटेच्या झोपेत चालकाचे गाडीवरल नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात तीन जण ठार झाले व एक जखमी झाला…
Read More...

सनी देओल प्रचारादरम्यान अपघातातून थोडक्यात बचावला

भाजप उमेदवार आणि अभिनेता सनी देओल अपघातातून थोडक्यात बचावला आहे. रोड शोसाठी जात असताना, टायर फुटल्याने हा अपघात झाला.अमृतसर-गुरदासपूर राष्ट्रीय राज्यमार्गावरुन जात असताना, गाडीचा टायर फुटल्याने ताफ्यातील गाड्या एकमेकांवर जोरदार आढळल्या. या घटनेत सनी देओलला कोणतीही दुखापत झालेली नाही. तसेच, इतरांना देखील दुखापत झाला नाही.  अपघातानंतर सनी देओल दुसऱ्या वाहनाने पुढील दौऱ्यासाठी निघाला.भाजपने सनी देओलला पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.महत्त्वाच्या बातम्या –1988…
Read More...

अपघाताचा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, कसा काय वाचला तो?

नागपूर-  जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी टोल नाक्यावर एक बाईकस्वार सुखरूप बचावला. सावनेर कडून नागपूरकडे येणाऱ्या एका बसने टोल नाक्याच्या दुचाकीच्या लेनमध्ये प्रवेश करत बेरिकेट तोडले आणि समोर जाणाऱ्या बाईक स्वाराला धडक दिली. पण सुदैवाने अपघातात बाईकस्वार सुखरूप बचावला.  लोकांनी बसचा पाठलाग करत बस चालकाला पकडले आहे.https://youtu.be/0Phv9MPIHUM
Read More...

गोपीनाथ मुंडेंचा अपघात नाही तर घातपात होता; धनंजय मुंडेंना संशय

गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन होऊच शकत नाही, असा संशय गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केला. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूवरुन आरोप प्रत्यारोप सुरु असताना धनंजय मुंडे यांनी असे वक्तव्य केले. ते एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.  गोपीनाथ मुंडेंचा अपघात नाही तर घातपात होता असा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.ते म्हणाले, ' गोपीनाथ मुंडे माझे काका होते. आमचे रक्ताचे नाते होते. सीबीआयचा अहवाल आला त्यात हा अपघात असल्याचं समोर आलं. त्यामुळे तो मान्य करणं साहजिक आहे. पण…
Read More...

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या गाडीला अपघात तर आदित्य यांच्या कार्यक्रमात मंडप उडाला हवेत

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात बाळा नांदगावकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या इनोव्हाला कळवण ग्रामीण पोलीस जीपची धडक बसली.नांदगावकर यांच्या गाडीला बसलेल्या या धडकेत इनोव्हाच्या मागील बंपरची ड्रायव्हर साईड तुटली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही.आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाचा मंडप उडालायुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूरमधील कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप हवेत उडाल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पूर्ण…
Read More...

बोट दुर्घटनेचा अपघात हा घातपात तर नाही ना? – अशोक चव्हाण

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणाऱ्या बोटीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा बोट दुर्घटनेशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही अशोक चव्हाणा यांनी केला आहे.विनायक मेटे यांच्या चौकशीच्या मागणीनंतर झालेला अपघात, घातपात तर नाही ना? असा संशय अशोक चव्हाण यांनी केला. या घटनेची सखोल चौकशी व्हावी,…
Read More...

पुण्यात ब्रेक फेल झालेल्या ट्रकची किमान ८ वाहनांना धडक

पुणे : साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची कात्रजच्या नव्या बोगद्याकडून येताना उतारावर ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढील किमान ८ वाहनांना धडक दिली. त्यात ८ जण जखमी झाले आहेत.जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना वडगाव येथील पुलावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.साताऱ्याहून नारळ घेऊन जाणाऱ्या तामिळनाडुतील ट्रकचे उतारावर नवले पुल व वडगाव पुलादरम्यानच्या विश्वास हॉटेलसमोर ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याने पुढे असलेल्या…
Read More...

भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, पाच जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने भीषण अपघातझाला आहे. मोहरम निमित्त नागपुरातील ताजबाग परिसरातील काही भाविक वरोडा शिवारातील चाँदशाह दग्र्याकडे ऑटोने जात होते. कळमेश्वर-सावनेर मार्गाववर वरोडा शिवारातील पोल्ट्री फार्मजवळ सावनेरकडून कळमेश्वरकडे जाणाऱ्या या भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली. यात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.महत्वाच्या बातम्या – लालबागच्या राजाच्या गर्दीचे नियंत्रण…
Read More...

पुणे शिवशाही बसला अपघात

रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला असून या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत.शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दापोलीवरुन पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसला अपघात झाला. जखमी प्रवाशांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस दापोलीवरुन पुण्याकडे निघाली होती. लोणेरे गावातील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ हा अपघात घडला. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.
Read More...