अमित शाह – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Tue, 10 Dec 2019 06:01:04 +0530 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.3 https://i1.wp.com/inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 अमित शाह – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 167515839 ‘काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा ढोंगीपणा करत आहे’; अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्ला https://inshortsmarathi.com/amit-shah-says-never-seen-seculer-party-like-congress/ https://inshortsmarathi.com/amit-shah-says-never-seen-seculer-party-like-congress/#respond Tue, 10 Dec 2019 06:01:04 +0000 http://inshortsmarathi.com/?p=89238

ज्यात युतीला बहुमत मिळाल्यानंतरही भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागलं. शिवसेनेनं राष्ट्रवादी,काँग्रेसच्या साथीने सरकार स्थापन केलं. यावरून गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसला सुनावलं. काँग्रेसनं सत्तेसाठी केलेल्या या तडजोडीवरून अमित शहा यांनी लोकसभेत जोरदार हल्लाबोल केला. सोमवारी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक 311 मतांनी मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या विरोधात 80 मते पडली. दरम्यान, या चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा ढोंगीपणा करत आहे’; अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्ला InShorts Marathi.

]]>

ज्यात युतीला बहुमत मिळाल्यानंतरही भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागलं. शिवसेनेनं राष्ट्रवादी,काँग्रेसच्या साथीने सरकार स्थापन केलं. यावरून गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसला सुनावलं. काँग्रेसनं सत्तेसाठी केलेल्या या तडजोडीवरून अमित शहा यांनी लोकसभेत जोरदार हल्लाबोल केला.

सोमवारी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक 311 मतांनी मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या विरोधात 80 मते पडली. दरम्यान, या चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणाी साधला. काँग्रेस नेते शशी थरूर, शिवेसेना नेते विनायक राउत आणि एमआयएमचे असाउद्दीने ओवेसी यांची मागणी फेटाळण्यात आली. लोकसभेनंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर चर्चेवेळी मोठा गदारोळ झाला. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. त्याला उत्तर देताना अमित शहांनी काँग्रेसचं धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा ढोंगीपणा करत असल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेससारखा धर्मनिरपेक्ष पक्ष नाही. केरळमध्ये मुस्लिम लीगसोबत सत्तेत तर महाराष्ट्रात शिवसेनेसोबत काँग्रेसनं सरकार स्थापन केलं आहे. तसंच मुस्लिमांबाबत कोणताही द्वेष नाही आणि हे विधेयक येणारच असा दावाही अमित शहांनी केला.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा ढोंगीपणा करत आहे’; अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्ला InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/amit-shah-says-never-seen-seculer-party-like-congress/feed/ 0 89238
पुण्यात पोलीस महासंचालकांच्या परिषदेचे उद्घाटन https://inshortsmarathi.com/inauguration-of-the-conference-of-the-director-general-of-police-in-pune/ https://inshortsmarathi.com/inauguration-of-the-conference-of-the-director-general-of-police-in-pune/#respond Sat, 07 Dec 2019 06:35:42 +0000 http://inshortsmarathi.com/?p=88753

पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालकांच्या (डीजी) परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या परिषदेला येणार आहेत. राजशिष्टाचाराप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. ते लोहगाव विमानतळावर पोहोचले आहेत. पुण्यात डीजीपी, आयजीपींच्या राष्ट्रीय परिषदेला गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी सायंकाळी पुण्यात दाखल […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पुण्यात पोलीस महासंचालकांच्या परिषदेचे उद्घाटन InShorts Marathi.

]]>

पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालकांच्या (डीजी) परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या परिषदेला येणार आहेत. राजशिष्टाचाराप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. ते लोहगाव विमानतळावर पोहोचले आहेत.

पुण्यात डीजीपी, आयजीपींच्या राष्ट्रीय परिषदेला गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी सायंकाळी पुण्यात दाखल झालेत. राष्ट्रीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या तीन दिवस परिषद चालणार आहे. पाषाण येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर) आणि  पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) येथे ही परिषद आयोजित केली जात आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय अन्वेषण व गुन्हेशाखेचे प्रमुख आणि निमलष्करी दलाचे प्रमुखही या परिषदेला उपस्थित आहेत.

पुण्यातील आयसर संस्थेत ही तीन दिवसीय परिषद होत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. आज रात्री त्यांचं पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानआंच्या स्वागतसाठी विमानतळावर  उपस्थित आहेत. राजशिष्टाचार म्हणून मुख्यमंत्री पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मुंबईतून पुण्यात आले आहेत.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पुण्यात पोलीस महासंचालकांच्या परिषदेचे उद्घाटन InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/inauguration-of-the-conference-of-the-director-general-of-police-in-pune/feed/ 0 88753
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला जाणार https://inshortsmarathi.com/uddhav-thackeray-will-welcome-narendra-modi-in-pune-for-annual-conference-of-dgp-and-igs/ https://inshortsmarathi.com/uddhav-thackeray-will-welcome-narendra-modi-in-pune-for-annual-conference-of-dgp-and-igs/#respond Fri, 06 Dec 2019 06:03:34 +0000 http://inshortsmarathi.com/?p=88338

महाराष्ट्रातील सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आजपासून (06 डिसेंबर) पुण्यात पोलीस महासंचालकाच्या तीन दिवसीय परिषदेला सुरुवात होत आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी दोन दिवस तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस पुण्यात असणार आहेत. राजकीय शिष्टाचारानुसार या परिषदेपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील पंतप्रधानांच्या आगमनस्थळी उपस्थित असणार आहेत. […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला जाणार InShorts Marathi.

]]>

महाराष्ट्रातील सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आजपासून (06 डिसेंबर) पुण्यात पोलीस महासंचालकाच्या तीन दिवसीय परिषदेला सुरुवात होत आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी दोन दिवस तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस पुण्यात असणार आहेत. राजकीय शिष्टाचारानुसार या परिषदेपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील पंतप्रधानांच्या आगमनस्थळी उपस्थित असणार आहेत.

पुण्यातील पाषाण भागातील पोलीस रिसर्च सेंटर आणि आयसर या दोन संस्थांमध्ये ही तीन दिवसीय परिषद चालणार आहे. ही परिषद 6 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत होणार आहे.

या परिषदेत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार, गृहविभागातील वरिष्ठ अधिकारी आणि देशातील वेगवगेळ्या राज्यांचे पोलिस महासंचालक उपस्थित राहणार आहेत. देशाच्या सुरक्षा धोरणांवर चर्चा करणे, देशांतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे आणि पुढील वर्षासाठी देशाच्या सुरक्षेचा रोडमॅप तयार करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला जाणार InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/uddhav-thackeray-will-welcome-narendra-modi-in-pune-for-annual-conference-of-dgp-and-igs/feed/ 0 88338
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणं टाळलं??? https://inshortsmarathi.com/amit-shah-did-not-wish-shivsena-uddhav-thackeray-after-he-becomes-cm-of-maharashtra/ https://inshortsmarathi.com/amit-shah-did-not-wish-shivsena-uddhav-thackeray-after-he-becomes-cm-of-maharashtra/#respond Fri, 29 Nov 2019 08:29:32 +0000 http://inshortsmarathi.com/?p=87475

‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणं टाळलं??? InShorts Marathi.

]]>

‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. मात्र या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणं टाळलं. यावरुनच आता राजकीय वर्तुळामध्ये अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करायचं टाळलं की ते विसरले अशी चर्चा रंगली आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणं टाळलं??? InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/amit-shah-did-not-wish-shivsena-uddhav-thackeray-after-he-becomes-cm-of-maharashtra/feed/ 0 87475
मोदी किंवा अमित शाह यांचा साधा फोनही आला नाही – उद्धव ठाकरे https://inshortsmarathi.com/updated-shivsena-uddhav-thackeray-mla-meeting-matoshree-ncp-congress-bjp-narendra-modi-amit-shah/ https://inshortsmarathi.com/updated-shivsena-uddhav-thackeray-mla-meeting-matoshree-ncp-congress-bjp-narendra-modi-amit-shah/#respond Fri, 22 Nov 2019 07:52:29 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86974

शिवसेना आमदारांची मातोश्रीवरील बैठक संपली असून या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांना राज्यात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे त्यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचं यावेळी सांगितलं. तसंच जेव्हापासून पेच निर्माण झाला आहे तेव्हापासून देवेंद्र फडणवीस वगळता नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांचा फोनही आला नसल्याची माहिती उद्दव ठाकरे यांनी आमदारांना […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोदी किंवा अमित शाह यांचा साधा फोनही आला नाही – उद्धव ठाकरे InShorts Marathi.

]]>

शिवसेना आमदारांची मातोश्रीवरील बैठक संपली असून या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांना राज्यात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे त्यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचं यावेळी सांगितलं. तसंच जेव्हापासून पेच निर्माण झाला आहे तेव्हापासून देवेंद्र फडणवीस वगळता नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांचा फोनही आला नसल्याची माहिती उद्दव ठाकरे यांनी आमदारांना दिली. या बैठकीत आमदारांनी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी केली.

“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी आमची मागणी होती ती आम्ही समोर ठेवली आहे. सर्व आमदारांना एकत्रित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. महाराष्ट्राचं नेतृत्त्व उद्धव ठाकरेंनी करावं हीच आमदारांची इच्छा आहे. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील,” असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे हे एकमेव नाव चर्चेत असून इतर कोणाच्याही नावाची चर्चा नसल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोदी किंवा अमित शाह यांचा साधा फोनही आला नाही – उद्धव ठाकरे InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/updated-shivsena-uddhav-thackeray-mla-meeting-matoshree-ncp-congress-bjp-narendra-modi-amit-shah/feed/ 0 86974
संपूर्ण देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू होणार – अमित शाह https://inshortsmarathi.com/nrc-amit-shahs-announcement-in-rajya-sabha-to-be-applicable-across-the-country/ https://inshortsmarathi.com/nrc-amit-shahs-announcement-in-rajya-sabha-to-be-applicable-across-the-country/#respond Thu, 21 Nov 2019 07:09:05 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86844

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज संसदेत केली. राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीबाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसेच, कोणत्याही धर्माच्या लोकांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही.’ असेही ते म्हणाले. आसाममध्ये सर्वात आधी एनआरसी लागू करण्यात आली आहे, यातून 19 लाख लोकांना बाहेर करण्यात […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. संपूर्ण देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू होणार – अमित शाह InShorts Marathi.

]]>

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज संसदेत केली. राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीबाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसेच, कोणत्याही धर्माच्या लोकांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही.’ असेही ते म्हणाले. आसाममध्ये सर्वात आधी एनआरसी लागू करण्यात आली आहे, यातून 19 लाख लोकांना बाहेर करण्यात आले आहे.

अवैध घुसखोरांना पिटाळून लावण्यासाठी देशभरात ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ अर्थात ‘एनआरसी’ लागू करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. यावरुन पहिल्यापासून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तर, कोणासोबतही भेदभाव केला जाणार नसून देशाचे नागरिकत्व सिद्ध करणाऱ्याला देशात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. शाहंच्या आजच्या उत्तरावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे.

एनआरसी आणि सिटीजनशिप ही दोन्ही विधयके वेगवेगळी असून विरोधक लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत उत्तर देताना केला.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. संपूर्ण देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू होणार – अमित शाह InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/nrc-amit-shahs-announcement-in-rajya-sabha-to-be-applicable-across-the-country/feed/ 0 86844
पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतर मोदींनी तात्काळ अमित शाहांना बोलावलं! https://inshortsmarathi.com/narendra-modi-meets-amit-shah-after-conversation-with-sharad-pawar/ https://inshortsmarathi.com/narendra-modi-meets-amit-shah-after-conversation-with-sharad-pawar/#respond Wed, 20 Nov 2019 09:11:56 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86791

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवारांनी राज्यातील ओल्या दुष्काळाची माहिती आणि अपेक्षित मदत याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. या भेटीनंतर नरेंद्र मोदींनी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पवार-मोदी भेट केवळ कृषीविषयक समस्यांवर चर्चेसाठी होती, की त्यामागे […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतर मोदींनी तात्काळ अमित शाहांना बोलावलं! InShorts Marathi.

]]>

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवारांनी राज्यातील ओल्या दुष्काळाची माहिती आणि अपेक्षित मदत याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. या भेटीनंतर नरेंद्र मोदींनी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पवार-मोदी भेट केवळ कृषीविषयक समस्यांवर चर्चेसाठी होती, की त्यामागे कोणती राजकीय कारणंही आहेत, याच्या चर्चा रंगू  लागल्या आहेत.

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पंतप्रधान कार्यालयात 45 मिनिटे बैठक झाली. यावेळी पवारांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीची माहिती देत केंद्र सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना यासंदर्भात सविस्तर पत्र दिलं. त्यात नाशिक आणि नागपूरमधील नुकसानीची सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे केंद्राने तात्काळ मदत द्यावी, अशी आग्रही मागणी शरद पवार यांनी केली आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतर मोदींनी तात्काळ अमित शाहांना बोलावलं! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/narendra-modi-meets-amit-shah-after-conversation-with-sharad-pawar/feed/ 0 86791
उद्धव ठाकरे ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल – दीपक केसरकर https://inshortsmarathi.com/uddhavs-bid-to-establish-power-can-be-solved-only-after-discussion-of-thackeray-amit-shah-deepak-kesarkar/ https://inshortsmarathi.com/uddhavs-bid-to-establish-power-can-be-solved-only-after-discussion-of-thackeray-amit-shah-deepak-kesarkar/#respond Fri, 08 Nov 2019 08:09:36 +0000 http://inshortsmarathi.com/?p=86039

सध्या राज्यात जो राजकीय पेच निर्माण झालाय हा सुटण्यासाठी अमीत शहा आणि उद्धव ठाकरे यांचे जेव्हा बोलणं होईल तेव्हा यातून काहीतरी मार्ग निघेल असं शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दिपक केसरकर शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता बोलत होते. दिपक केसरकर निस्सीम साईभक्त आहेत. ते कायम शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांनी शिर्डीत साईदर्शन आणी […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. उद्धव ठाकरे ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल – दीपक केसरकर InShorts Marathi.

]]>

सध्या राज्यात जो राजकीय पेच निर्माण झालाय हा सुटण्यासाठी अमीत शहा आणि उद्धव ठाकरे यांचे जेव्हा बोलणं होईल तेव्हा यातून काहीतरी मार्ग निघेल असं शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दिपक केसरकर शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता बोलत होते.

दिपक केसरकर निस्सीम साईभक्त आहेत. ते कायम शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांनी शिर्डीत साईदर्शन आणी खंडोबाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांना राज्यातील सत्ता समीकरणांविषयी विचारलं असता. हा पेच अमीत शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेनंतरच सुटू शकेल असं म्हटलं आहे. कारण लोकसभेच्या वेळी जे काही ठरलंय ते या दोघातच ठरलं असल्याचं म्हटलं आहे. राज्यात स्थिर सरकार यावं आणी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद यावा यासाठी प्रार्थना केली असल्याचं सांगत उद्धव ठाकरे ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल असंही केसरकर यांनी म्हंटल आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. उद्धव ठाकरे ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल – दीपक केसरकर InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/uddhavs-bid-to-establish-power-can-be-solved-only-after-discussion-of-thackeray-amit-shah-deepak-kesarkar/feed/ 0 86039
महाराष्ट्रामध्ये नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करणार; देवेंद्र यांच्याच पाठीशी हायकमांड ठाम https://inshortsmarathi.com/no-cm-post-for-shivsena-bjp-president-asserts-devendra-fadnavis-as-cm/ https://inshortsmarathi.com/no-cm-post-for-shivsena-bjp-president-asserts-devendra-fadnavis-as-cm/#respond Thu, 07 Nov 2019 05:31:57 +0000 http://inshortsmarathi.com/?p=85920

महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेबाबत आज दिल्लीमध्ये भाजपच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी सकारात्मक भूमिका असली तरी मुख्यमंत्रिपदावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही असे संकेत मिळत आहेत. शिवसेनेसोबत बाकी गोष्टींची चर्चा करण्याची तयारी आहे मात्र मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडचा […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्रामध्ये नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करणार; देवेंद्र यांच्याच पाठीशी हायकमांड ठाम InShorts Marathi.

]]>

महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेबाबत आज दिल्लीमध्ये भाजपच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी सकारात्मक भूमिका असली तरी मुख्यमंत्रिपदावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही असे संकेत मिळत आहेत.

शिवसेनेसोबत बाकी गोष्टींची चर्चा करण्याची तयारी आहे मात्र मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडचा स्पष्ट नकार आहे. या घडामोडींमध्ये वेळ आली तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी आहे पण शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले जाणार नाही. शिवाय सध्या महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची जी चर्चा सुरु आहे त्याला ही पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सरकारचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करणार, देवेंद्र यांच्याच पाठीशी हायकमांड ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्रामध्ये नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करणार; देवेंद्र यांच्याच पाठीशी हायकमांड ठाम InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/no-cm-post-for-shivsena-bjp-president-asserts-devendra-fadnavis-as-cm/feed/ 0 85920
पंकजा मुंडेंच्या धक्कादायक निकालाची कारणं… https://inshortsmarathi.com/reasons-for-the-shocking-result-of-pankaja-munde/ https://inshortsmarathi.com/reasons-for-the-shocking-result-of-pankaja-munde/#respond Fri, 25 Oct 2019 08:15:26 +0000 http://inshortsmarathi.com/?p=85659

विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागला तो परळी मतदारसंघात… ‘ताईगिरी’ संपून आता परळीत ‘दादागिरी’ सुरू झालीय. ‘चला राजकारण सोडून देऊ…’ हे पंकजा मुंडेंचं आवाहन परळीकरांनी फारच गांभीर्यानं घेतलं म्हणा… ताईंविरोधातली नाराजी भोवली म्हणा किंवा ताईपेक्षा जास्त दादा भावला म्हणा…. पण परळीत धक्कादायक निकाल लागला. भावा बहिणीच्या या संघर्षाकडे तमाम राज्याचं लक्ष लागलं होतं… […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पंकजा मुंडेंच्या धक्कादायक निकालाची कारणं… InShorts Marathi.

]]>

विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागला तो परळी मतदारसंघात… ‘ताईगिरी’ संपून आता परळीत ‘दादागिरी’ सुरू झालीय. ‘चला राजकारण सोडून देऊ…’ हे पंकजा मुंडेंचं आवाहन परळीकरांनी फारच गांभीर्यानं घेतलं म्हणा… ताईंविरोधातली नाराजी भोवली म्हणा किंवा ताईपेक्षा जास्त दादा भावला म्हणा…. पण परळीत धक्कादायक निकाल लागला.

भावा बहिणीच्या या संघर्षाकडे तमाम राज्याचं लक्ष लागलं होतं… भाजपाच्या वरच्या फळीतल्या महिला नेत्या आणि ‘महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री’ अशी त्यांची वर्णनंही त्यांच्या गटातून गायली जात होती. परंतु, पंकजा मुंडेंना आपला विधानसभा मतदारसंघही राखता आला नाही… यामागे काय कारणं कारणीभूत ठरली हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.

१. मुळात मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंची परळीकरांशी काही प्रमाणात नाळ तुटली

२. त्याउलट धनंजय मुंडेंनी परळीकरांशी वैयक्तिक संवादातून संपर्क वाढवला

४. परळीत रस्ते आणि रोजगारासंदर्भात विकासकामं रखडलीयत…

५. त्याउलट धनंजय मुंडेंनी नगरपालिकेच्या माध्यमातून चांगली कामं केल्याचं स्थानिकांचं म्हणणंय

६. २००९ मध्ये गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून पंकजा निवडून आल्या

७. २०१४ मध्ये मुंडेंच्या निधनानंतर सहानुभूतीमुळे आणि मोदी लाटेमुळे पंकजा सहज निवडून आल्या… पण आता तशी परिस्थिती राहिली नाही

८. परळीमधला मुस्लीम समाज पक्षापेक्षा व्यक्तीला मत देतो, यंदाच्या निवडणुकीत बहुतांश मुस्लीम समाज धनंजय मुंडेंच्या पाठीशी राहिला

९. खरं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सभा परळीत लावून पक्षानंही पंकजा मुंडेंचं ओबीसी नेतृत्व म्हणून प्रस्थापिक करण्याचा प्रयत्न केला… पण मतदारांनी ते साफ नाकारलं

परळी या एकमेव मतदारसंघात खुद्द पंतप्रधान मोदी आणि अमित शाह अशा दोघांनीही सभा घेतल्या…. तरीही पंकजा मुंडे पराभूत होणं, हा पक्षासाठी मोठा धक्का आहे…. त्याचं ऑडिट पक्षाला करावंच लागेल.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पंकजा मुंडेंच्या धक्कादायक निकालाची कारणं… InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/reasons-for-the-shocking-result-of-pankaja-munde/feed/ 0 85659