InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

अशोक चव्हाण

आता गट तट, मतभेद विसरा आणि कामाला लागा- बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईतल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरला झालेल्या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी थोरातांना प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं दिलीत. कार्यक्रमाला काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात यांनी भाजपवर टीका करतानाच पक्षाच्या नेत्यांनाही कानपिचक्या दिल्यात. आता गट तट, मतभेद विसरा…
Read More...

राजा ढाले एक लढवय्ये नेते- अशोक चव्हाण

दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, दलित पँथरचे संस्थापक सदस्य राजा ढाले यांच्या निधनामुळे अन्यायग्रस्तांसाठी संघर्ष करणारा लढवय्या ‘पँथर’ काळाच्या पडद्याआड गेल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत, बंडखोर लेखक आणि दलित पँथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक राजा ढाले यांचे आज पहाटे निधन झाले.ढाले यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना अशोक चव्हाण यांनी म्हटलं की, ते एक लढवय्ये नेते होते. आयुष्यभर त्यांनी अन्यायाविरोधात संघर्ष केला.…
Read More...

विमा कंपन्यांवर मोर्चे काढण्याचा शिवसेनेचा ‘स्टंट’ – अशोक चव्हाण

शिवसेनेच्या पिकविमा मोर्चाबाबत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी खिल्ली उडवली आहे. सरकार म्हणून कर्तव्य बजावण्यात शिवसेना साफ अपयशी ठरली आहे. सरकार म्हणून ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकलेले नाहीत. हे अपयश झाकण्यासाठीच आता ते विमा कंपन्यांवर मोर्चे काढण्याचा 'स्टंट' करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. तर मोर्चा काढून काहीही होणार नाही. त्याऐवजी शासकीय पातळीवर धोरणात्मक निर्णय घेऊन कंपन्यांना भरपाई देण्यासाठी बाध्य केले पाहिजे, असे देखील अशोक चव्हाण म्हणाले.शिवसेना…
Read More...

मनसेला आघाडीत घेण्याबाबत अजूनही विचार केलेला नाही – अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेतल्यानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मोर्चेबांधणी करण्याच्या तयारीला लागली आहे. मात्र आघाडीसोबत मित्रपक्ष आणि वंचित आघाडीसह मनसे जाणार का? की वंचित स्वत: तिसरी आघाडी तयार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आघाडीत घेण्याचा निर्णय सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचा आहे. मात्र मुंबईत दोन्ही पक्षांमधील काही वादांमुळे मनसेला आघाडीत घेण्याबाबतचा विचार होत नसल्याचंही अशोक चव्हाण यांनी एका न्यूज चॅनेलशी बोलताना…
Read More...

विधानसभा निवडणुकीत वंचितने आघाडीत यावं, यासाठी आमचा प्रयत्न -अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढल्याने महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांनी वंचित ही भाजपचीच बी टीम असल्याचा आरोप केला. याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले.वंचितच्या भूमिकेबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, 'मतांचं धृवीकरण होऊ नये असा आमचा प्रयत्न होता. त्यामुळेच वंचितला आघाडीत सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. प्रश्न A टीम किंवा B टीमचा नसून हा…
Read More...

विधानसभा निवडणुका तोंडावर येऊनही काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष सापडेना

अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन दीड महिना उलटला तरी या पदावर अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. सध्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक चव्हाणच पक्षाचे कामकाज पाहत आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना पक्षाला पूर्ण वेळ प्रदेशाध्यक्ष नसल्याने नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती कधी होणार अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही २५ मे रोजी प्रदेशाध्यक्ष…
Read More...

‘RSSच्या इतिहासात भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाला केलेला विरोधही विद्यार्थ्यांना…

नागपूर विद्यापीठाने एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रमात नुकताच संघाच्या इतिहासाचा समावेश केला आहे. विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास शिकवला जाणार आहे. अभ्यासक्रमात १८८५ ते १६७४ या कालखंडात भारताचा इतिहास या भागाचा देखील आहे. या भाग शिकवताना संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देखील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.यावरून कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.नागपूर विद्यापीठ बीए भाग-२ च्या…
Read More...

राष्ट्रवादीच्या दगाबाजी केल्यामुळे अशोक चव्हाण पराभूत

लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उघडपणे भाजपचे काम करत होते. राष्ट्रवादीच्या दगाबाजी केल्यामुळे चव्हाण पराभूत झाले, असा आरोप भोकरच्या काँग्रेस आमदार अमिता चव्हाण यांनी केला. मुदखेड येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. मात्र, आता नांदेड जिल्ह्यात जाती-पातीचे राजकारण होत आहे. पूर्वीपासूनचे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. मात्र, लोकसभा…
Read More...

भाजप देशात फोडाफोडीचे राजकारण करत आहे – अशोक चव्हाण

 काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. परिषदेत त्यांनी कर्नाटकमधील आमदारांचा राजीनामा प्रकरण आणि वंचित बहुजन आघाडीबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.अशोक चव्हाण म्हणाले, भाजप संपूर्ण देशात फोडाफोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटकमध्ये सुरू आहे ते योग्य नाही. भाजपने देशाच्या लोकशाहीला काळिमा फासण्याचा प्रयत्न केला आहे. निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.त्यांची ही भूमिका योग्य नाही. भाजपकडून चाललेल्या या…
Read More...

भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे – अशोक चव्हाण

कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार व इतर भाजपशासीत राज्यातील यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरू आहे, भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.चव्हाण म्हणाले की,  हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोधी पक्षाचे सरकार चालू न देणे हा  एकमेव अजेंडा आहे. याकरिता  साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर…
Read More...