InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

अमित शाह जाताच लोकांनी चटाया पळवल्या

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात योग दिन साजरा केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत रोहतक येथे योग दिवस साजरा केला.परंतु, या ठिकाणी आलेल्या लोकांनी कार्यक्रम संपताच आणि अमित शाह जाताच खाली योगासाठी अंथरलेल्या चटई पळवल्या.चटई पळवण्यासाठी लोकांमध्ये झुंबड पाहायला मिळाली. चटई घेऊन जाऊ नका, असे आयोजकांना सांगावे लागले. तरीही लोकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चटई पळवल्या.
Read More...

कृषिकन्यांनी साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

टीम महाराष्ट्र देशा : दौंड तालुक्यातील नांदूर येथे , कृषि महाविद्यालय पुणे येथील प्रशिक्षणार्थी कृषी कन्यांंचे आगमन झाले आहे. गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. दिनांक 21 जुन रोजी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत योगदिनानिमित्त शाळेत कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक विजय ठोबरे यांनी मार्गदर्शन केलं.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रमोद रसाळ ,केंद्र प्रमुख डॉ. हसबनिस, कार्यक्रम अधिकारी डॉ.सुनीता वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या सुरेखा दराडे, हर्षदा…
Read More...