InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याच्या तरुण मुलाने स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लोहा तालुक्यातील रमणेवाडी येथे घडली. रमणेवाडीतील शेतकरी शिवाजी राजाराम केंद्रे यांना राजू शिवाजी केंद्रे (वय 32) व संजय शिवाजी केंद्रे ही दोन मुले.घरात सातत्याने असलेली नाजूक परिस्थिती, राष्ट्रीय बॅंकेचे कर्ज आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे कंटाळून राजूने शेतात बुधवारी दुपारी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी माळाकोळी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून लोहा…
Read More...

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण करावी. तसेच यावेळी केरळ सरकारच्या मोरेटोरियमवर रिझर्व्ह बँकेने लक्ष घालण्याची विनंती सरकारने करावी. कर्जाच्या वसूलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवून बँकांनी त्रास देऊ नये, यावरदेखील सरकारने लक्ष द्यावे, असेही राहुल यावेळी म्हणाले. यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी…
Read More...

आत्महत्येची परवानगी द्या’; बीडच्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड व नित्रुड येथील शेतकऱ्यांना 2018 चा सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी बँकांमध्ये अनेक चकरा मारल्या. मात्र बँकचे अधिकारीही शेतकऱ्यांना टोलवाटोलवीचे उत्तरे देत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना निवेदन देऊन 'पिक विमा देता की, आत्महत्या करण्यास परवानगी देता ?' असा प्रश्न विचारला आहे. अनेक महिन्यांपासून शेतकर्‍यांची हेळसांड होत असल्याने शेतकऱ्यांना आता चक्क आत्महत्या…
Read More...

गरीबीला कंटाळून कुटुंबाची आत्महत्या

गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जव्हारमध्ये घडली. गेल्या महिन्यात कुटुंबातील मुख्य सदस्याने गळफास घेऊन आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली होती. कुटुंबाचा आधार गेल्यामुळे स्वत:चा आणि दोन लहान मुलींचा सांभाळ कसा करायाचा हा प्रश्न रुक्षणा यांना भेडसावत होता. या विवंचनेतून ३ वर्षीय मुलगी दीपाली आणि ७ महिन्यांची वृषाली हिला विष पाजून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, या घटनेत चिमुकली वृषाली हिचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.५ जुलै रोजी रुक्षणा (३०) यांनी…
Read More...

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कर्ज व सावकारी ओझ्याखाली दबलेले शेतकरी ऐन पावसाळ्यातही आत्महत्या करत आहेत. गेल्या १४ दिवसांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाच्या आत्महत्यांचे सत्र मराठवाड्यात थांबण्यास तयार नाही. १६ ते ३० जून या कालावधीत मराठवाड्यातील ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.गेल्या दोन आठवड्यात सर्वाधिक नऊ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून त्या खालोखाल औरंगाबाद सात, नांदेड सहा आणि जालना जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. परभणी, लातूर व…
Read More...

जीवन एकदाच आहे, जगायला विसरू नका सांगत आयआयटी विद्यार्थ्यांची आत्महत्या

पदवीच्या अंतिम वर्गात शिकत असलेल्या मार्क ॲड्रयू चार्ल्सने आत्महत्येपूर्वी तब्बल आठ पानी सुसाईड नोट लिहून अपेक्षा भंग झाल्याचे नमूद केले. एकाच वर्षात दोन विद्यार्थ्यांनी नोकरी मिळत नसल्याच्या भीतीने हैदराबाद आयआयटीमध्ये आत्महत्या केली आहे.मार्कने सुसाईड नोटमध्ये जीवन एकदाच आहे, जगायला विसरू नका असे नमूद केले आहे. मित्रांनाही तोच सल्ला देणाऱ्या मार्कने मात्र जीवनयात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मार्कला स्वतःला असलेल्या अपेक्षा आणि त्याला झालेल्या अपेक्षा भंगामुळे तो नैराश्येत होता.…
Read More...

प्रियशीचा नकार, तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या

सांगली- प्रेयसीने प्रेमास नकार दिल्याने नैराश्य आलेल्या एका तरुणाने तिच्यासमोरच कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतं. अबरार मुलाणी या २४ वर्षीय तरुणाचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. अबरारने या तरुणीला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे असा फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर बाइकवरून तिला कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर नेले. यावेळी त्याने तिच्यावर प्रेम असल्याचं बोलून दाखवत तिच्याशी लग्न करण्याची इच्छाही व्यक्त…
Read More...

पोलीस ठाण्यातच पोलिसाने घेतला गळफास

चंद्रपूर- पोलिसाने चक्क पोलीस स्टेशनमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्घटना घडली आहे. सरेश भांबुळे यांनी चंद्रपूरमधील वरोरा पोलीस ठाण्यात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.सुरेश भांबुळे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर होते. शुक्रवारी रात्री 11 वाजता डी.बी. रुममधील सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर त्यांनी स्वत:ला गळफास लावून घेतला.शनिवारी सकाळी कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर सुरेश यांनी आत्महत्या केली असल्याचं दिसलं.दरम्यान, सुरेश भांबुळे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण…
Read More...

पालघरमधील वाडा तालुक्यात दोन युवकांच्या आत्महत्या

पालघर - वाडा तालुक्यातील सारसी दोन तरुणांनी आत्महत्या केली घटना उघडकीस आली आहे. येथील विशाल ज्ञानेश्वर ठाकरे या 26 वर्षांच्या तर कोने येथील धिरज नरेश अधिकारी या 22 वर्षाच्या दोन तरुणांनी वेगवेगळ्या कारणास्तव एकाच दिवशी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या आत्महत्यांमुळे आजचे तरुण तणाव सहन करण्यात व आव्हाने पेलण्यात अक्षम बनत चाललेत की काय असा प्रश्न निर्माण होतोय. आपल्या मुलांना समजून कसे घ्यावे हे पालकांपुढे आव्हान असून या दोन्ही घटना पालकांच्या चिंता वाढविणाऱ्या ठरल्या…
Read More...

कोल्हापुरात सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर - लेबर कॉन्ट्रॅक्टरने विनोद जोशी यांनी आपल्या कुटुंबासह विष पिऊन सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या दुर्देवी घटनेत लेबर कॉन्ट्रॅक्टर विनोद रमाकांत जोशी आणि त्यांच्या पत्नी मीना जोशी यांचा मृत्यु झाला आहे. तर मुलगा श्रेयश (वय 17) हा यातून बचावला आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. कोल्हापुरातील कोंडाओळ येथील पल्लवी लॉज मधील घटना घडली. मध्यरात्री आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आला. व्यवसायातील नुकसानामुळे आर्थिक तोट्यात आलेल्या जोशी कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न…
Read More...