InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

आरक्षण

आरक्षणापेक्षा सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा- खा. छत्रपती संभाजीराजे

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने उस्मानाबादमधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा दुर्देवी प्रकार नुकताच घटला. या घटनेनंतर खा. छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त करत आरक्षण गेलं खड्ड्यात; पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.त्यांच्या ट्विटनंतर अनेकांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया आल्या. दहावीत 94 टक्के मार्क असलेल्या एका मराठा…
Read More...

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण; मराठा आरक्षणासाठी विधानसभेत विधेयक मंजूर

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करून हे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत पूर्वलक्ष्यी प्रभावाने मराठा समाजाला (एसईबीसी) आरक्षण लागू करण्यासंदर्भातील अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यादरम्यान विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताच…
Read More...

आम्हांला गाजर नको, हक्क हवा- धनगर समाजाचा आक्रमक पवित्रा

विधानसभेत पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक पवित्रा घेतला. यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळात घुसण्याचा प्रयत्न केला. धनगरांच्या मागण्यांसाठी यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.पुरंदरच्या बहिणीला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसह अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी केलेली 1 हजार कोटींची तरतूद फक्त निवडणुकीचं गाजर आहे . आम्हाला गाजर नको, धनगर समाजाच्या हक्काच्या एसटी…
Read More...

अर्थसंकल्पातील घोषणा म्हणजे ‘चुनावी जुमलेबाजी’- अशोक चव्हाण

यंदा वाढलेली प्रचंड महसुली तूट आणि राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प फुटल्याने हा ‘तुटी’चा आणि ‘फुटी’चा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.हा सलग तिसरा तुटीचा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी सुमारे १५ हजार कोटी रूपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. ही तूट यंदा २० हजार २९२ कोटींवर गेली आहे. हे सरकारच्या ‘अर्थ’शून्य व नियोजनशून्य कारभाराचे द्योतक आहे.या अर्थसंकल्पातूनशेतकरी, कामगार,…
Read More...

शासकीय नोकरीत दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण – राज्यमंत्री दिलीप कांबळे

केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमानुसार दिव्यांगांना सरकारी नोकरभरतीतील 4 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली असून कालच (बुधवार दि.29 मे 2019) त्या संबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे अशी माहिती राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.या निर्णयामुळे अंध/अल्पदृष्टी, कर्णबधिरता, अस्थ‍िव्यंग, मेंदूचा पक्षाघात, कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त, स्नायू विकृती, स्वमग्नता, मंदबुध्दी, मानसिक आजार अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सरकारी…
Read More...

‘धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार’

सांगली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी जानकार यांनी धनगर आरक्षण बाबतीत भाजप आणि आपली भूमिका स्पष्ट केली.जानकर म्हणाले की, नगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार आहे. यासाठी सुरुवात आम्ही केली, त्यामुळे शेवटही आम्हीच करणार,ओबीसी कमिशनला या आधी घटनात्मक दर्जा नव्हता, मात्र नरेंद्र मोदी यांनी तो दिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र पातळीवर आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे प्रयत्न सुरु आहेत. शिफारस…
Read More...

आदिवासींच्या आरक्षणास व निधीस धक्का न लावता धनगर समाजाला सवलती

आदिवासी बांधवांच्या आरक्षणास व निधीस धक्का न लावता धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबत होणाऱ्या कोणत्याही अपप्रचारास समाज बांधवांनी बळी पडू नये, असे आवाहन आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी केले आहे.धनगर समाजाच्या समस्या, निवेदने याचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ 9 मंत्री सदस्य असलेली उपसमिती 1 मार्च, 2019 रोजी स्थापन करण्यात आली. या उपसमितीची बैठक दि. 2 मार्च, 2019 रोजी घेण्यात आली.…
Read More...

मराठा समाजातील उमेदवारांची आरक्षणातून नियुक्ती नाही

मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणात पुन्हा अडथळे निर्माण झाले आहेत. मराठा समाजाला देण्यात आलेला आरक्षणाचा निर्णय हा उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने आरक्षणातून उमेदवारांना नियुक्ती देण्यात येऊ नये, असे आदेश शासनाने सर्व विभागांना दिले आहेत. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयातील सर्व विभागाचे सचिव, प्रधान सचिव आणि अप्पर मुख्य सचिव यांना सोमवारी दिले आहेत.फडणवीस सरकारकडून काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून 16 %…
Read More...

मोदी सरकारचा मोठा निर्णय; आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांसाठी १० टक्के आरक्षण

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांसाठी मोदी सरकारने अत्यंत दिलासादायक बातमी आणली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्ण समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठी मोदी सरकार घटनादुरुस्ती करुन आरक्षण कोट्यात वाढ करणार आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ४९ टक्के आरक्षणाच्या कोट्यात वाढ करण्यात येणार आहे.…
Read More...

मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणावर हायकोर्टात याचिका दाखल..

फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १६ टक्के आरक्षणाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात असताना, आता ओबीसी समाजाला दिलेल्या ३२ टक्के आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.महाराष्ट्रात ओबीसींना देण्यात आलेलं आरक्षण हे कोणत्याही सर्वेक्षण अथवा अभ्यासाच्या आधारे देण्यात आलेलं नाही. मग ते योग्य कसं? असा सवाल करत बाळासाहेब सराटे यांच्यावतीने हायकोर्टात नवी जनहित याचिका सादर करण्यात आली.मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी ही याचिका सादर…
Read More...