InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

इस्रो

सप्टेंबरमध्ये कार्टोसॅट-३ चं प्रक्षेपण करण्यात येणार- इस्रो

अवकाशातून भारतीय जमिनीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशानं कार्टोसॅट-३ चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे.नैसर्गिक आपत्तीची सूचना देण्याचं, विकासकामांना सहाय्य करण्याचं काम हा उपग्रह करेल. यासोबतच देशाच्या सीमांवर नजर ठेवण्याची जबाबदारीदेखील कार्टोसॅट-३ पार पाडेल. या उपग्रहाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी तळांवर नजर ठेवणं सोपं होणार आहे.…
Read More...

इस्रोच्या चांद्रयान-2 चे उद्या 22 जुलैला होणार प्रक्षेपण

भारताचे दूसरे चंद्र मिशन 22 जुलैला दुपारी 2.43 मिनिटांनी क्षीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून लॉन्च होणार आहे. दरम्यान इस्रोचे माजी प्रमुख एएस किरण कुमार म्हणाले की, आता संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही सोमवारच्या इव्हेंटसाठी आहोत. इस्रोहने ही माहिती ट्विटरवरही दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, जीएसएलव्ही एमके3-एम1/चंद्रयान-2 ची लॉन्च रिहर्सल…
Read More...

चांद्रयान-२’चे २२ जुलैला आकाशात झेपवणार

तांत्रिक बिघाडामुळे या आठवड्यात ‘चांद्रयान-2’चे उड्डाण ‘इस्रो’ला रद्द करावे लागले होते. आता हे यान येत्या 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे. 15 जुलैला मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी ‘चांद्रयान-2’ अवकाशात झेपावणार होते. मात्र, क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या निप्पल जॉईंटमधून गळती झाल्याने 56 मिनिटे आधीच…
Read More...

‘चंद्रावरची झेप पडली लांबणीवर’; ‘चांद्रयान-2’ मोहीमेस होणार विलंब

'चांद्रयान-2' या मोहिमेकडे सर्व देशाचच नाही तर जगाचंही लक्षं लागलं होतं. कारण ही मोहीम स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारीत होती. इस्रोच्या कारकिर्दीतली ही सर्वात महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी मोहीम होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही मोहीम आता थोडी लांबणीवर पडलीय. इस्रोचे शेकडो शास्त्रज्ञ या मोहिमेवर गेली कित्येक वर्ष कठोर मेहेनत घेत होतो. शेवटच्या…
Read More...

- Advertisement -

‘इस्रो’ची आणखी एक मोठी कामगिरी, एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्राने पाडल्याची यशस्वी चाचणी केल्यानंतर आता हरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 28 देशांचे उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. 'इस्रो'ने PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने नवा विक्रम रचला आहे. या 28 उपग्रहांमध्ये 24 अमेरिकेचे…
Read More...

इस्रोची करणार 7 महिन्यात 19 मिशन लॉन्च

पुढच्या 7 महिन्यात इस्रो 19 मिशन लॉन्च करणार आहे. यामध्ये चंद्रयान-2 मिशन देखील आहे. इस्रोचे चेअरमन के. शिवन यांच्या माहितीनुसार, 'इस्रो 19 स्पेस मिशन कंडक्ट करणार आहे. ज्यामध्ये 10 सॅटलाईट आणि 9 लॉन्च वेइकल असणार आहेत. हे सगळे मिशन सप्टेंबर ते मार्च दरम्यान पूर्ण केले जाणार आहेत. 15 सप्टेंबरला PSLV C42 मिशनच्या लॉन्चिंगची सुरुवात केली जाणार आहे.'…
Read More...