InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

ईव्हीएम

पवार साहेबांनी महायुतीत यावे- रामदास आठवले

'शरद पवार साहेबांचा ईव्हीएम मशीनवर संशय आहे. पण आमचा पवार साहेबांवर संशय नाही. त्यांनी महायुतीत यावे,' असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पवारांना टोला लगावला आहे. वसईत इथं रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आाला, तेव्हा ते बोलत होते.राज ठाकरे यांची मनसे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीवर रामदास आठवले यांनी टीका केली आहे. मनसे आणि वंचित हे दोघेही स्वबळावर निवडून येऊ शकत नाही, असं आठवले यांनी मह्टलं आहे.दरम्यान, कोल्हापूरमध्येही रामदास आठवले यांनी वंचित…
Read More...

विरोधक पराभव स्वीकारता येत नसल्याने बहाणा करत आहेत – रविशंकर प्रसाद

ते जिंकले तर ईव्हीएम ठीक होते आणि आम्ही जिंकलो तर ईव्हीएममध्ये गडबड. आपला पराभवाचा स्वीकार न करण्यासाठी केवळ बहाणे बनवत असल्याची टीका रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.रविशंकर प्रसाद म्हणाले कि, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड त्यांनी (काँग्रेस) जिंकले तर ईव्हीएम ठीक आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी जिंकल्या तर ईव्हीएम व्यवस्थित आहे. आपनेते अरविंद केजरीवाल जिंकले तर ईव्हीएम ठीक आहे. मात्र भाजप जिंकली तर ईव्हीएममध्ये गडबड आहे. आपल्या पराभवाचा केवळ एक बहाणा शोधत आहे असे म्हणत…
Read More...

ईव्हीएम प्रश्नावर पवार कुटूंबामध्येच मतभेद, ईव्हीएमबाबत अजित पवार म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, घडळ्याला मतदान केल्यावर मत कमळाला जात असल्याचे मी स्वतः पाहिल्याचे शरद पवार म्हणाले होते, आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या वक्तव्याने या मुद्दावर पवार कुटुंबातच मतभेद असल्याचे समोर आले आहे.ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यांत भाजपचा पराभव झाला नसता. त्यामुळे ईव्हीएमविषयी माझ्या मनात शंका नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे.महत्त्वाच्या…
Read More...

हॉटेलमध्ये सापडले ईव्हीएम; नागरिक संतापले

EVMवरून विरोधक सध्या आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी भाजप EVMचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे. त्यानंतर आता 21 विरोधीपक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली पुनर्विचार याचिका देखील फेटाळून लावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता बिहारमधील मुझ्झफरपूर येथील हॉटेलमधून एक ईव्हीएम ताब्यात घेण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. शिवाय, लोकांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर SDO कुंदन कुमार यांनी EVM आपल्या ताब्यात घेतले.…
Read More...

रांगेत एक तास उभे राहून राज यांनी केले मतदान

'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजप-शिवसेना युतीला घाम फोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सुमारे एक तास रांगेत उभे राहून मतदान केले.आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राज दादर येथील बालमोहन शाळेत मतदानासाठी सहकुटुंब पोहोचले. मतदानासाठी मोठी रांग होती. सर्वसामान्य मतदाराप्रमाणेच राजही मतदानासाठी रांगेत उभे राहिले. सुमारे एक तास रांगेत थांबल्यानंतर त्यांना मतदान करता आले.महत्त्वाच्या बातम्या –मनसे फॅक्टर 23 मे रोजी कळणार – उर्मिला मातोंडकर ‘हिन्दुस्तान…
Read More...

कोणतेही बटण दाबा, भाजपलाच मत; आखिलेश यादव यांनी उपस्थित केली शंका

समाजवादी पक्षाने ईव्हीएममधील बिघाडावरुन मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आहे. “देशभरात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या किंवा भाजपालाच मत जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने या तक्रारी समोर येत आहेत. जवळपास 350 हून अधिक ईव्हीएम बदलण्यात आले आहे. हा निष्काळजीपणा असून हे फौजदारी स्वरुपाचे कृत्य आहे”, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. यानिष्काळजीपणामुळे 50 हजार कोटी रुपये पाण्यात गेल्याचेही त्यांनी सांगितले.तिसऱ्या टप्प्यात…
Read More...

‘कुठले ही बटन दाबले की कमळाला मत, मशिन मॅनेज?’

आज दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 10 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडत आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांनी कोणतेही बटन दाबले तर मत हे कमळाला म्हणजे भाजपलाच जात असल्याचे म्हटले. यावर यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.कुठले ही बटन दाबले की मत कमळाच जात आहे… मग पंजाला का जात नाही?? मशिन मॅनेज झालं की काय?? , असं  ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.https://twitter.com/Awhadspeaks/status/1118769803546722304…
Read More...

कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं आहे, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी आज 10 मतदारसंघात मतदान होत आहे. अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ सुरू असल्यानं मतदारांमध्ये नाराजी आहे.'काही ठिकाणी EVM वर कोणत्याही चिन्हावर बटण दाबलं की कमळाला मत जातं', ईव्हीएमबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.  दरम्यान या घटनेची चौकशी करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.महत्त्वाच्या बातम्या –पुण्यात कोण मारणार बाजी, गिरीश बापट की मोहन जोशी ? अकोल्यात मतदाराने ईव्हीएमच फोडले…
Read More...

अकोल्यात मतदाराने ईव्हीएमच फोडले

अकोला मतदारसंघात एका मतदाराने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे. श्रीकृष्ण घ्यारे असे ईव्हीएम फोडणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.बाळापूर तालुक्यातील कवठा मतदानकेंद्रावर ही घटना घडली आहे. या मतदानकेंद्रावर नवीन ईव्हीएम देण्यात आलं आहे. श्रीकृष्ण घ्यारे यांनी ईव्हीएम का फोडले अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडत आहेत. भोकर, नायगाव, मुखेड, नांदेड उत्तर आणि दक्षिण, देगलूर या ठिकाणी एकूण 78 मशीन बंद…
Read More...

…आणि उमेदवाराने ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळून फोडलं

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशभरातील 91 मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे. आज सकाळपासूनच सर्वत्र मतदानासाठी सुरूवात झाली आहे. मात्र आंध्रप्रदेशाती विधानसभा उमेदवाराने रागामध्ये ईव्हीएम मशीन जमीनीवर आदळून फोडल्याची घटना घडली आहे.आंध्रप्रदेशातील अनंतरपूर जिल्ह्यातील जन सेना पक्षाचे उमेदवार मधुसुदन गुप्ता यांनी गुटी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन जमीनीवर आदळलं. या घटनेनंतर मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी मधुसुदन गुप्ता यांना अटक केली आहे.…
Read More...