InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

एकनाथ खडसे

‘पक्ष तिकीट देओ अथवा न देओ जनता जनार्दन माझ्या पाठीशी’

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष तिकीट देओ अथवा न देओ जनता जनार्दन माझ्या पाठीशी असल्याचे खडसेंनी म्हटले आहे. दुसर्‍या पक्षातील लोकांना मंत्रिपदाचे तिकीट देतात परंतु पक्षाकडून निष्ठावंतांची अवहेलना करण्याचे काम सुरू असल्याची घणाघाती टीका खडसे यांनी रावेरमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत केली आहे.खडसे म्हणाले, माझे मंत्रिपद गेल्यापासून मी आणलेले अनेक प्रकल्प रखडल्याने जळगाव जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. मी चाळीस वर्षापूर्वी लावलेले रोपटे मोठे झाले असून ते मी तोडणार नाही. मी जसा बाजूला झालो आहे, तसे…
Read More...

मला हा डाग घेऊन जायचे नाही – एकनाथ खडसे

गेल्या चाळीस वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही. राजकीय आयुष्यात कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हते. आताही जे आरोप झाले ते विधानसभेबाहेरच्या व्यक्तीने बिनापुराव्याने केले. शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. सर्व आरोपांची चौकशी करा. कोणी खोटे आरोप करत असेल तर त्यालाही कठोर शिक्षा होईल असा कायदा करा. मला हा डाग घेऊन जायचे नाही, अशी मनातील खदखद भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधानसभेत बोलून दाखविली.तीन वर्षांत माझ्याकडेही अनेकांच्या फाइल्स जमा झाल्या. पण…
Read More...

दोन महिन्यासाठी नव्हे, तर पाच वर्षासाठी मंत्रिमंडळात समावेशाची आशा – एकनाथ खडसे

दोन महिन्यांसाठी मंत्रिमंडळात जाण्यासाठी स्वत: उत्सुक नव्हतो. पुढील काळात राज्यात भाजपची सत्ता आल्यास पाच वर्षांसाठी मंत्रिमंडळात समावेश होण्याची आशा आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे सांगितले.जिल्ह्यातील बोदवड नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर खडसेंनी मत व्यक्त केले.मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्रिपदे ही फक्त चार महिन्यासाठी आहेत. त्यातील दीड महिना हा निवडणुकीच्या आचारसंहितेत जाणार आहे. कमी कालावधीसाठी आपण मंत्री होण्यास इच्छुक नव्हतो.…
Read More...

खडसेंना भाजपचा आणखी एक धक्का; महाजनांकडे पालकमंत्रिपद

मंत्रिमंडळ पुनरागमनाच्या आशेवर बसलेल्या एकनाथ खडसेंना भाजपकडून दिलासा मिळण्याऐवजी उलट धक्क्यांवर धक्के देण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे.खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून जळगावचे पालकमंत्रिपद बाहेरच्या व्यक्तीकडेच होते. मंत्रिमंडळात पुनरागमन तर होईलच, शिवाय हातातून गेलेले पालकमंत्रिपदसुद्धा आपल्याला परत मिळेल, असे खडसे आणि त्यांच्या समर्थकांना वाटते. परंतु गिरीश महाजन यांनी नाशिकसोबत जळगावचे पालकमंत्रिपद आपल्याकडे घेऊन खडसेंच्या गटात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.कमी कालावधीसाठी का…
Read More...

जळगावच्या भाजपच्या मेळाव्यात झालेल्या राड्यावर एकनाथ खडसे म्हणतात….

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताईनगरच्या कोथली या त्यांच्या गावी सहकुटुंब मतदान केलं. यावेळी रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.यावेळी मतदानानंतर एकनाथ खडसेंना भाजपच्या मेळाव्यात झालेल्या मारहाणीविषयी विचारले असता. ते म्हणाले की, जळगावच्या पक्षाच्या मेळाव्यात जे घडले ते चुकीचे होते, असे घडायला नको होते. त्यानंतर सर्व संघटना कामाला लागली, त्याचे यशात रूपांतर होणार आहे, असे खडसे म्हणाले.राज ठाकरेंच्या सभांचा कोणताही परिणाम होणार…
Read More...

अंजली दमानिया यांना मुंबई हाय कोर्टाचा दिलासा, 21 खटल्यांना स्थगिती

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात आमदार एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बदनामी केल्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकांना मुंबई हाय कोर्टाने स्थगिती दिली आहे. मुंबई हाय कोर्टाच्या न्यायाधीश रेवंती मोहिते-ढेरे यांनी हा निकाल दिला. ३२ खटल्यापैकी २१ खटल्यांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे.आमदार एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात बदनामी केल्याप्रकरणी सहा जिल्ह्यात याचिका दाखल केल्या होत्या. यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि शिरपूर येथील याचिका स्थगित करण्यात…
Read More...

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिले, म्हणूनच माझ्यावर ही वेळ – एकनाथ खडसे

गेल्या अनेक दिवसांपासून विजनवसात असलेले भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. सावदा येथे अल्पसंख्याक समाजातर्फे एकनाथ खडसे यांचा नागरी सत्कार झाला. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने आपली अशी अवस्था झाली आहे.खडसे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिल्याने मी काहींसाठी नाआवडता झालो. एका मोठ्या व्यक्तीने मुस्लीम समाजाच्या जमिनीवर बांधलेले घर जमीनदोस्त करून ती जमीन सरकार जमा करण्याचा आदेश आपण दिला होता. मात्र…
Read More...

एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीची परिवर्तन सभा रद्द

राष्ट्रवादीने भाजप- शिवसेना सत्तेविरोधात लोकांमध्ये परिवर्तन करण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरुन सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. मात्र माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील परिवर्तन सभा राष्ट्रवादीने रद्द केली आहे.एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरात राष्ट्रवादीला परिवर्तन नको आहे का? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जात आहे. मुक्ताईनगरऐवजी राष्ट्रवादीची परिवर्तन सभा आता जामनेरमध्ये आयोजित…
Read More...

भाजप नेते एकनाथ खडसे म्हणातायेत, ‘मी पक्ष सोडणार नाही’

भाजप नेते एकनाथ खडसे बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, कुणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून बसत नाही. अन्याय झाला तेव्हा वेळीच त्याचा प्रतिकार देखील करायला हवा, तरच समोरच्याला आपल्या शक्तीची जाणीव होते असे सुचक वक्तव्य त्यांनी केले होते.  त्यांनतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.मात्र एकनाथ खडसे यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मी पक्षावर नाराज नाही. पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नाही. नाराज असेल तर मी माझ्या मनातील भावना…
Read More...

एकनाथ खडसेंच पुन्हा एकदा खळबळ जनक विधान…

 कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दीपनगर इथे लेवा समाजाच्या गुणवंतांचा गौरव सोहळ्याला खडसे उपस्थित होते.खडसे यांनी अनेक वेळा भाजपला खडे बोल सुनावले होते. दरम्यान, आज पुन्हा नाराजी व्यक्त करताना खडसे म्हणालेत, अन्याय झाला तेव्हा वेळीच प्रतिकार देखील करायला हवा, तरच समोरच्याला आपल्या शक्तीची जाणीव होते.वेळोवेळी खडसे यांनी नाराजी व्यक्त करत आले आहेत. मात्र,…
Read More...