InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

एमआयएम

‘सामना’मधून एमआयएमचा समाचार

शिवसनेच्या मुखपत्रातून म्हणजेच 'सामना'मधून एमआयएमचा समाचार घेण्यात आला आहे. औरंगाबादचा हिंदू नामर्द बनलेला नाही. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्यांना 'औरंगाबादे'त घरात घुसून मारू, असा इशारा देत शिवसनेने एमआयएमवर निशाणा साधला.औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला होता. या वरून आमच्यातीलच एकाने दिलेल्या दगाबाजीमुळे शिवसनेचे नेते चंद्रकात खैरे यांचा पराभव झाला. मात्र, या पराभवामुळे हिंदू…
Read More...

‘ईव्हीममध्ये फेरफार नाही तर हिंदूंच्या मेंदूत फेरफार झाला आहे’

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपुर्ण भारतामध्ये भाजपला मोठा विजय झाला आहे. तर काँग्रेसला मोठा पराभव स्विकारावा लागला आहे. भाजपच्या या विजयावर आता एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी जोरदार टीका केली आहे. ईव्हीममध्ये फेरफार नाही तर हिंदूंच्या मेंदूत फेरफार झाला आहे, असे वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ‘ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आलेला नाही, तर हिंदूंच्या मेंदूत फेरफार करण्यात आला. राष्ट्रवादावर भाजपाचा सामना करु न शकल्याने विरोधकांचा दारुण पराभव झाला…
Read More...

MIMच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेची हत्या; सोलापुरात खळबळ

गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रेश्मा पडनेकुर यांची हत्या झाली आहे. रेश्मा पडनेकुर यांनी एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. सोलापूरच्या विजयपूर परिसरात त्यांच्या मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.17 एप्रिल रोजी रेश्मा यांनी सोलापूरचे एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती. तक्रार दिल्यापासून रेश्मा या बेपत्ता होत्या. काल रात्रीच्या विजयपूर जवळील कोलार गावात त्यांच्या…
Read More...

औरंगाबादच्या जागेवरून भारिपा-एमआयएमध्ये मतभेद

औरंगाबादच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडीत मतभेद असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडीने माजी न्यायमुर्ती बी.जे. कोळसे पाटील यांच्या नावाची  घोषणा केली आहे .मात्र आता एमआयएमतर्फे औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येत आहे. बी.जे. कोळसे पाटील यांच नाव एमआयएमला मान्य नाही.'असदुद्दीन ओवेसी आणि आंबेडकर यांनी ठरवले तर आपण लोकसभेच्या रिंगणात उतरू,' असं आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.महत्त्वाच्या बातम्या –एअर…
Read More...

आता ३० जानेवारीपर्यंत काँग्रेसने आघाडीबाबत अंतिम निर्णय घ्यावा – आंबेडकर

आघाडी करायची की नाही, याबाबत ३१ जानेवापीपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर आम्ही आमची पुढची दिशा ठरवू, अशा इशारा प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिला आहे. ओवेसींच्या एमआय़एमला सोबत घेण्यावरून काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघात मतभेद आहेत. आघाडी करण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या काँग्रेससोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. काँग्रेस एमआयएमच्या मुद्यापलिकडे जायला तयार नाही.आता ३० जानेवारीपर्यंत काँग्रेसने अंतिम निर्णय घ्यावा, अन्यथा ३१ जानेवारीला श्रीरामपूर येथे बैठक घेऊन वंचित बहुजन आघाडीची पुढील दिशा…
Read More...

‘मलाई फक्त छगन भुजबळांनीच खाल्ली का?, अजित पवारांनी काहीच खाल्लं नाही का?’

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सर्वांनीच मलाई खाल्ली पण भष्ट्राचाराचे आरोप फक्त छगन भुजबळ यांच्यावर लावल्याची टीका एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी यांनी केली.  मलाई, दूध, दही सर्वांनी खाल्लं तुरुंगात फक्त छगन भुजबळ गेले. तेव्हा साहेबांच्या पुतण्याने अर्थात अजित पवार यांनी काहीच खाल्लं नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.नांदेडमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली. या सभेत भारीप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी भाजप आणि संघावर सडकून टीका…
Read More...

आम्ही वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्यास तयार – ओवेसी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल, तर वंचित बहुजन विकास आघाडीतून एमआयएम बाहेर पडायला तयार असल्याचं वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीनं ओवेसी यांनी केलं आहे. नांदेडमध्ये बहुजन वंचित विकास आघाडीच्या सभेत ओवेसी बोलत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध आहे. याविषयी बोलताना ओवेसी म्हणाले की, एमआयएम नको असेल तर मी आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. ते पुढे म्हणाले,"तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोला, त्यांना हव्या…
Read More...

एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या सय्यद मतीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल…

एमआयएमच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवक सय्यद मतीनने एका महिलेला नोकरीचं आमिष दाखवून बलात्कार केला असा आरोप करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच सय्यद मतीनची एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आली होती.एमआयएममधून हकालपट्टी झालेला नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. एका महिलेला नोकरी लावून देण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवत त्याने अत्याचार केल्याची तक्रार आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.…
Read More...

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीची ओवेसींनी सोडली साथ ?

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची मोट बांधली. सोबतीला 'एमआयएम' आल्याने प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांच्या संयुक्त सभांनी सत्ताधारी पक्षासंह प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवली होती.  मात्र लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना अचानक राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभांमधून एमआयएम गायब झाल्याचे चित्र आहे. सांगली, नांदेड, बीड आणि आज नाशिक येथे होणाऱ्या संयुक्त सभेला देखील खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.वंचित…
Read More...

प्रकाश आंबेडकर एमआयएमला सोडून काँग्रेससोबत जाणार?

औरंगाबादमध्ये अबू आझमी यांनी महाआघाडीबाबत भाष्य केले. महाराष्ट्रासह देशातही समविचारी, संविधानाला मानणाऱ्या पक्षांची महाआघाडी होणे आवश्यक असून, त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. भाजपाचा पराभव करण्यासाठी महाआघाडी गरजेची असल्याचे त्यांनी नमूद केले.दोन ते तीन दिवसांतच प्रकाश आंबेडकर हे एमआयएमला सोडून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतील, असा दावा त्यांनी केला. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी व इतर पक्षांतील फुटीर नगरसेवकांच्या बळावर भाजपाने महापालिकेत सत्ता हस्तगत केली. फुटीर…
Read More...