InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

कर्जमाफी

राज ठाकरेंच्या ‘चंपाची चंपी’ टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर

विधानसभा निवडणुकीत ‘चंपाची चंपी’ करणार असं म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी आपल्यासाठी दुसरा शब्द शोधून काढायला हवा होता, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय छान आहे. त्यांनी आपला स्वतंत्र बाणा जपायला हवा होता. ‘चंपा’ हा शब्द…
Read More...

‘फसवणूक सरकार’ घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही

दिलेला शब्द न पाळणारे, सामान्यांची फसवणूक करणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही. मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. म्हातारा तर मुळीच नाही. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही, असे रोखठोक उत्तर देत…
Read More...

पूरग्रस्तना शंभर टक्के कर्जमाफी देण्याची शरद पवार यांची मागणी

राज्यात पूर परिस्थितीमुळे अभूतपूर्व नुकसान झाले आहे.  सरकारने नुकसान लक्षात घेता, या भागात शंभर टक्के कर्जमाफीचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यात केली. पाणी ओसरल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचे मोजमाप करावे आणि शेती व दुग्धव्यवसायाचे झालेले  पूरग्रस्तांना…
Read More...

सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार – मुख्यमंत्री

शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाजनादेश यात्रेतआयोजित जाहिर सभेत केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले.शेतकऱ्याचा आर्थिक विकासासाठी कोट्यवधी रुपयांची तरतुद केली.…
Read More...

- Advertisement -

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही

शिवसेना हा सतत सामान्य माणसांसाठी संघर्ष करणारा पक्ष आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी सरसकट घेतल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही, असा विश्वास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला. पीक विमा संदर्भात बोलताना ते म्हणाले की इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी मुंबईकरांनी मोर्चा काढला होता.पंधरा दिवसाच्या आतच या मोर्चाचे परिणाम दिसत…
Read More...

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण करावी. तसेच यावेळी केरळ सरकारच्या मोरेटोरियमवर रिझर्व्ह बँकेने लक्ष घालण्याची विनंती सरकारने करावी. कर्जाच्या वसूलीसाठी…
Read More...

मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा; उद्धव यांचे आवाहन

‘‘मुख्यमंत्री कोण होईल, याची मला पर्वा नाही. मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा. अन्यथा, ते सत्तेची आसने जाळून खाक करतील,’’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला.‘‘मुख्यमंत्री आमचा होणार की तुमचा होणार, याची मला पर्वा नाही. मी शेतकऱ्यांशी बांधील आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी माझे मैत्रीचे…
Read More...

अजब न्याय! दाद मागायला आलेल्या शेतकऱ्यालाच केली अटक

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ न झाल्याने दाद मागण्यासाठी विधिमंडळात आलेल्या वाशिम येथील अशोक मनवर या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित केल्यावर गदारोळ झाला.या शेतकऱ्याची तातडीने सुटका करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर…
Read More...

- Advertisement -

गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फसवी – धनंजय मुंडे

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या अखेरच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. फडणवीसांनी गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं मुंडे म्हणाले.मुंबईत माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केला.वाशीम जिल्ह्यातील अशोक मनवर नावाच्या शेतकऱ्याला…
Read More...

मतांसाठी कर्जमाफीचे आश्वासन; प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसेथे’

कर्नाटकमधील एच डी कुमारस्वामी यांच्या सरकारने शेतकऱ्यांचे मते मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कर्जमाफीचे आश्वासन दिले आणि लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर कर्जमाफी मागे घेतली, असा आरोप शेतकरी करत आहेत.दुसरीकडे कर्नाटक सरकारने हे आरोप फेटाळले आहेत. विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे. कुमारस्वामी…
Read More...