InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

किसान सभा

शेतकऱ्यांसाठी राज्यभर रस्त्यावर आंदोलन करणार- अजित नवले

मोदी सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रमुख पिकांच्या किमान आधार भावात अत्यंत केविलवाणी वाढ करून शेतक-यांच्या जखमांवर पुन्हा एकदा मीठ चोळले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रमुख पिकांना दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. मात्र निवडणुका संपताच मोदी सरकारने शेतक-यांना आपला खरा चेहरा दाखवत आधार भावात सातत्याने भरीव वाढ करण्याच्या आपल्या घोषणेला हरताळ फासला आहे असा आरोप किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला आहे.यंदाचे जाहीर…
Read More...

विश्वासघात होणार नाही यासाठी दक्षता घेणे आवश्यक : किसान सभा

मुंबई - गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या मागणीसाठी गेली चार दिवस रस्त्यावर उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनास यश मिळाले आहे. मात्र, घोषणांची अंमलबजावणी झाली नाही. पूर्वानुभव पहाता यावेळी असा विश्वासघात होणार नाही यासाठी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता उपाय म्हणून कंपन्यांना अनुदानाचा निर्णय झाला आहे. मात्र, प्रश्न मुळातून सोडविण्यासाठी दीर्घकालीन…
Read More...

एक जूनपासून राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची हाक !

पालघर: शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात एक जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या ज्वलंत मागण्यांसाठी १ जून २०१७ रोजी राज्यात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. दुधाला किमान २७ रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी पुन्हा एकदा लढा देणार आहेत.जिल्ह्यात तहसील कार्यालयांमध्ये खाटी जनावरे बांधून आणि सरकारच्या दगडी पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून प्रहार, किसान सभा आणि लाख गंगा आंदोलक लढण्यास तयार झाले आहेत. यावेळी डॉ. अजित नवले, आ. बच्चू कडू,…
Read More...

या रक्ताळलेल्या पावलांनी रस्ता देखील रडला असेल ( भाग दुसरा )

रात्र झाली होती सगळे खूप दमलेले होते गावाकडं काय चालू असलं याची विचारपूस सुरू होती. मीही त्यांच्या गप्पा ऐकण्यात दंग झालो होतो मी मोबाईल बंद केला होता. कुठला संपर्क नव्हता. मस्त जीवन वाटत होतं आता सगळे झोपण्याच्या तयारीला लागले कारण सगळ्यांना पहाटे 5 ला उठून मुंबई कडे निघाचं होत. मी खूप दमलो होतो मलाही झोप आली होती, राजू सुशांत ओबी इंजिनिर महेश ड्रायव्हर विनोद पाटील गप्पा मारत बसलो होते. त्या दिवशीच्या मुक्कामी खूप धमाल या टोळी ने केली मज्जा ही खूप अली पण अवघ्या मोर्चात पाटलाची 100 ची नोट लक्षात…
Read More...

शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचा सरकारचा दावा

मुंबई: मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश येताना दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत, शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.किसान लाँग मार्चच्या आंदोलकांच्या १२ जणांच्या शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यातील बैठक आज दुपारी तब्बल तीन तास चालली. ही बैठक विधानभवनातील सचिवालयात पार पडली. आंदोलक मोर्चेकरांकडून आमदार जे पी गावित, अजित नवले, अशोक ढवळे यांच्यासह धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अजित पवार, राधाकृष्ण…
Read More...

महामोर्चातील ९५ टक्के मोर्चेकरी शेतकरी नाहीत- देवेंद्र फडणवीस

मुंबई: सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्यांसाठी निघालेला शेतक-यांचा महामोर्चा आज आझाद मैदानावर पोहोचला. सरकारने देखील उशिरा का होईना मंत्री गटाची स्थापना करत शेतकरी आंदोलकांशी चर्चा आज केली. दरम्यान चर्चेआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामोर्चातील ९५ टक्के मोर्चेकरी हे तांत्रिकदृष्ट्या शेतकरी नसल्याचं म्हटलं होत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना लक्ष केल्या जात आहे.देवेंद्र फडणवीस विधानसभेत निवदेन देतांना म्हणाले, महामोर्चा घेऊन आलेल्यांपैकी ९० ते…
Read More...

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा संघर्ष वणव्यासारखा पसरेल- शरद पवार

मुंबई: आज जी अस्वस्थता शेतकऱ्यांमध्ये दिसते, ती आता रस्त्यावर दिसू लागली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हीच अस्वस्थता असून आजच्या राज्यकर्त्यांना शेती, शेतकरी आणि अर्थव्यवस्थेची आस्था नाही. कर्जमाफीचा मुद्दा देशभरात ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनी सोबत बोलतांना स्पष्ट केले.भाजपा सरकारने घोषणा खूप केल्या, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. यामुळेच उपेक्षित वर्ग आज मुंबईत चालत आला. आता…
Read More...

मंत्र्यांच्या डोक्यात चढली सत्तेची नशा – सुप्रिया सुळे

जळगाव: मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची नाश गेली आहे जनता याची नोंद घेऊन योग्य वेळी उत्तर नक्कीच देईल. अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.कर्जमाफी आणि बोंडआळीच्या मदतीची चौकशी करण्यासाठी बँकांच्या चकरा मारण्याऐवजी शेतात राबा असा अजब सल्ला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. तसेच या वक्तव्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी देखील पाठपुरवठा केला. कापसाला भाव मागण्यापेक्षा शास्त्रोक्त…
Read More...

भाजपच्या खासदाराने शेतकऱ्यांची केली ‘माओवादाशी’ तुलना

नवी दिल्ली: आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांविषयी भाजप खासदारानं माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल, असे विधान केले आहे. शेतकऱ्यांची थेट माओवादाशी तुलना मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी केली आहे. त्यामुळे पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.अनवाणी पायाने शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च काढला आहे. मात्र त्यांची दखल न घेता. भाजप खासदाराने त्यांची तुलना थेट माओवादाशी केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न योग्यच आहेत, मात्र यानिमित्तानं…
Read More...