InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

गारपीट

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे ढग ; बळीराजा चिंतेत

टीम महाराष्ट्र देशा : उन्हाला सुरुवात होत नाही तेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची ढग महाराष्ट्रावर जमा झाले आहेत.राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात 14 मार्च म्हणजे उद्यापासून पाऊस पडेल, असा अंदाज आहे.या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मोहोराचं नुकसान होऊ शकतं, तसंच गहू आणि ज्वारीची कापणी त्वरित करावी, अशी सूचना आयएमडीनं केलीये.उद्या 14…
Read More...

मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात निर्जीव पुतळे बसले आहेत का ? – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा - धर्मा पाटील या वयवृद्ध शेतकऱ्याने न्याय मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली. मंत्रालयाचे आत्महत्यालय झाले आहे. सरकारने यातून मार्ग काढण्याचे सोडून मंत्रालयात जाळ्या लावल्या. हे सरकारच पूर्ण फाटलं आहे कुठे कुठे ठिगळं लावणार?अशी सरकारवर जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात बोलताना केली. हे सरकार लोकांच्या समस्यांबाबत गंभीर नाही. लोकांचे कोणतेही प्रश्न मार्गी लावले जात नाहीत. सभागृह चालू दिले जात नाही. मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत. मंत्रालयातील…
Read More...

बळीराजाच्या चिंतेत वाढ ; राज्यात पुन्हा गारपीट होण्याचा अंदाज

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.गेल्या महिन्यात 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा, विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं.दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच्या प्रभावामुळे येत्या बुधवारी म्हणजेच 7…
Read More...

धक्कादायक:गारपिटीत मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करण्याचे आदेश

जालना - गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा, असे तुघलकी फर्मान जालना जिल्ह्यातील तलाठ्याने काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती आ. माणिकराव ठाकरे आदी नेत्यांनी आज वंजार उम्रज, थार, जामवाडी आदी गारपीटग्रस्त गावांची पाहणी केली त्यावेळी ही धक्कादायक बाब समोर आली.https://twitter.com/AshokChavanINC/status/964059831521853440जालना…
Read More...

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना निकषानुसार मदत – पांडुरंग फुंडकर

मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाडयामध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. काल पर्यंत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे साधारण: १ लाख ९०हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सुमारे 1800 गावांचा त्यात समावेश आहे. पुढील दोन दिवसात पंचनाम्याबाबत अंतिम अहवाल अपेक्षित आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाकडे 200 कोटी रुपयांची मदत देण्याबाबत विनंती करण्यात…
Read More...

यवतमाळच्या शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच

यवतमाळ / संदेश कान्हु : यवतमाळ जिल्हा हा व्हाइट सिटी म्हणून ओळखला जात होता मात्र कांही वर्षात ही ओळख पुसल्याजाऊन यवतमाळ जिल्ह्यची नवी ओळख महाराष्ट्र भर झाली आहे ती म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्य. एकेकाळी समृद्ध असलेल्या याच जिल्ह्यत आजवर अनेक शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारी पना आसमानी व सुलतानी संकटामुळे आत्महत्या केली. आत्महत्येच्या सुरुअसलेल्या या सत्रामुळे अनेक कुटुंब आज पोरके झाले आहेत. शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी अनेक प्रयत्न होतांना दिसतात मात्र नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांच्या पिच्छा…
Read More...

बरबाद झालेल्या शेतकऱ्यांना झटपट मदत कशी देता येईल याचा सरकाने विचार करावा

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे. त्यामुळे पंचनामे आणि सर्वेक्षण इत्यादी सरकारी सोपस्काराच्या जंजाळात न अडकता या शेतकऱ्यांना झटपट मदत कशी देता येईल याचा सरकाने विचार करावा असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी…
Read More...

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा संताप अनावर ; नागपूर-अमरावती रस्त्यावर आक्रमक रास्ता रोको

टीम महाराष्ट्र देशा: कापसावरील बोंडअळीच्या हल्ल्यानंतर आता भयंकर गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने मराठवाडा-विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. डूख धरून बसल्याप्रमाणे निसर्ग प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतो आहे. सरकार मात्र पंचनामे आणि सर्वेक्षण इत्यादी सरकारी सोपस्काराच्या जंजाळात अडकल आहे यामुळे शेतकऱ्याचा संताप आता उफाळून आला आहे. गारपिटीनं नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे तातडीनं करा आणि नुकसान भरपाई द्या. या मागणीसाठी नागपूर-अमरावती रस्त्यावर…
Read More...

घ्या आता ! नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी वाचा ‘हनुमान चालीसा’ ; भाजप नेत्याचा अजब सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्यातील शेतकरी अवकाळी गारपीट झाल्याने चिंतातूर आहे. निसर्गाने तोंडचा घास पळवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे अशातच आता भाजपचे नेते रमेश सक्सेना यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम केल आहे. शेतकऱ्यांना मदत देणे सोडून अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी हनुमान चालिसा वाचण्याचा अजब सल्ला दिला आहे."सर्व गावातील शेतकऱ्यांनी रोज एक तास सामूहिकरित्या हनुमान चालिसा वाचावी, जेणेकरुन नैसर्गिक आपत्ती ओढवणार नाही. हनुमान चालिसा वाचल्यास गारपीट…
Read More...

गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करा- धनंजय मुंडे

औरंगाबाद : अचानक आलेल्या गारपीटीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांना अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. यात सर्वाधिक नुकसान जालना जिल्ह्यात झाले आहे. या जिल्ह्यात  झालेल्या गारपिटीत शेतात काम करण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. जालना पाठोपाठ बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील काही गावे गारांच्या तडाख्यात सापडली. गारपिटीने रब्बी ज्वारी, हरभरा, गहू आदी रब्बी पिकांसह द्राक्ष, संत्रा आणि मोसंबीच्या बागांचे प्रचंड नुकसान…
Read More...