InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

चक्रीवादळ

‘वायू’चा ‘यु टर्न’, गुजरातला न जाता समुद्राच्या दिशेने प्रस्थान

तीव्र गतीने गुजरातच्या दिशेने झेपावणाऱ्या वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर न धडकता समुद्राच्या दिशेने वळले आहे. भारतीय हवामान विभागाने ही दिलासा देणारी माहिती दिली आहे.दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यापासून संरक्षण व्हावे या दृष्टीने गुजरात सरकारने पूर्वतयारी केली असून, सुमारे ३ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ पोरबंदर आणि द्वारका…
Read More...

‘वायू’ ला टक्कर देण्यासाठी लष्कर तैनात

वायू चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या काही भागांमध्ये धडकण्यापुर्वी त्याला टक्कर देण्यासाठी लष्कराने तयारी केली आहे.सागरी किनाऱ्यावरील सुमारे २.१५ लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.सौराष्ट्र आणि कच्छ क्षेत्रांतील सखल भागात राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून या भागांतील बंदरे आणि विमानतळांवरील परिचालन स्थगित करण्यात आले आहे.या चक्रीवादळाने ‘अतिशय तीव्र’ स्वरूप धारण केल्यामुळे, तसेच…
Read More...

गुजरातमध्ये हाय अलर्ट; शाळा- महाविद्यालये बंद

वायू’ चक्रीवादळ 13 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश शहा यांनी दिले. तसेच यादरम्यान वीजसेवा, दूरसंचार सेवा आणि पिण्याच्या पाण्याची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले.दरम्यान, शाह यांनी आपात्कालिन नियंत्रण कक्षाला 24 तास अलर्ट…
Read More...

चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता

अरबी समुद्रात रविवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ते आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे़. या कमी दाबाच्या पट्ट्याने आता दिशा बदलली असून ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे.या चक्रीवादळाचे १२ जून रोजी तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. १३ व १४ जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे़.सोमवारी सकाळी हा कमी दाबाचा पट्टा लक्षद्वीपच्या अमिनी दिवीपासून २५० किमी, मुंबईपासून ७६० किमी तर गुजरातच्या वेरावळपासून ९३० किमी अंतरावर होता़. मंगळवारी त्याचे चक्रीवादळात…
Read More...

जाणून घ्या कशी ठरतात चक्रीवादळांची नावं

अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळांची नावं 1953 पासून ठरण्यास सुरुवात झाली आहे. हिंद महासागर क्षेत्रातील आठ देशांनी भारताच्या मागणीनुसार या चक्रीवादळांचं 2004 पासून नामकरण करण्याची व्यवस्था करून दिली. या आठ देशांमध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंकेचा समावेश आहे. प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी 8, अशी 64 नावे ठरवून दिली आहेत. भारतानं अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावं सुचवलेली होती. आतापर्यंत चक्रीवादळांची 64 नावे ठेवण्यात आली आहेत.…
Read More...