InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

जयंत पाटील

जागावाटपाबाबत अजुन निर्णय झाला नाही – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली. जागावाटपाबाबत या बैठकीत फॉर्म्युला ठरणार होता मात्र त्याबाबत अजुन निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. घटक पक्षांनी जागांची मागणी केल्याने त्यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसेबाबत या बैठकीत चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांनी आपल्या दिल्ली भेटीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती.…
Read More...

अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

राज्य सरकारच्या विविध योजनांचा राज्यात बोजवारा उडाला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवेदनामध्ये विविध मुद्द्यांना स्पर्श करत समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. 'केंद्र सरकारने लोकसभा…
Read More...

जयंत पाटील यांच्या विरोधात मीच निवडणूक लढणार – सदाभाऊ खोत

रयत क्रांती संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तेरा जागांची मागणी केली आहे. काही जागांवर आमच्याकडे उमेदवार तयार आहेत. पण मतदारसंघ कोणते मिळतात याच्या प्रतीक्षेत आहोत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावर आम्ही दावा केला असून तो आम्हालाच मिळणार. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात मीच निवडणूक लढणार आहे, अशी घोषणा  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना केली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला दोनशेहून अधिक…
Read More...

शेतकऱ्यांना कांदा अनुदान कधी मिळणार? – जयंत पाटील

कांदा अनुदानावरून एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात सरकारवर पुन्हा लक्ष केले आहे. अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले कांदा अनुदान ४ महिने १५ दिवस उलटून देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेले नाहीत, असे जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हंटले आहे.राज्यातील कांदा उत्पादक अत्यंत हलाकीच्या आणि अडचणींचा सामना करत असताना देखील राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली पाहायला मिळत नसल्याने आमदार जयंत पाटील यांनी युती सरकारला खडेबोल सुनावले आहेत.राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक…
Read More...

मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा ‘गोंधळलेला अर्थसंकल्प’; जयंत पाटलांची टीका

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट होत. या बजेटवर विरोधकांकडून आता जोरदार टीका केली जात आहे. देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प हा 'गोंधळलेला अर्थसंकल्प' वाटतो. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1147066078876463109ते म्हणाले, 'नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे याची स्पष्टता त्यात नाही. खरं तर आधीच असलेल्या शेतीशी…
Read More...

तिवरे धरण दुर्घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच – जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिपळूणमधील तिवरे धरण दुर्घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडली असल्याचा आरोप केला आहे. पाटील यांनी ट्विट करत सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करुनही दुरुस्ती न झाल्यामुळे गावं पाण्याखाली असून लोक बेपत्ता आहेत. अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर सरकार जागे होणार आहे? असा गंभीर सवाल जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फुटले असून धरणाच्या पाणलोट…
Read More...

देवस्थानच्या जमीनीच्या गैरव्यवहारात महसूलमंत्र्यांचा हात- जयंत पाटील

मुंबई - पुण्याजवळील केसनंद गावातील भूखंडाबाबतीत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बिल्डरचा फायदा करून देण्यासाठी निर्णय घेतला आणि राज्य सरकारचे 42 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.राज्याच्या महसूल मंत्र्यांनी पुण्याजवळील केसनंद गावातील देवस्थानच्या जमीनला बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली. देवस्थान जमीनीचा कोणताही शासकीय नजराणा न भरता जमीन हस्तांतरित करता येत नाही.…
Read More...

‘चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा’; जयंत पाटलांचा आरोप

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी भुखंड घोटाळ्याचे आरोप केल्याने खळबळ उडाली. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले त्यामुळे बिल्डर हिताचे निर्णय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज केली.काय आहे नेमकं प्रकरण?पुण्यातील मौजे बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी एक भूखंड राखीव होता. शिवप्रिया रिअ‍ॅलिटर्सचे उमेश वाणी यांनी खेळाच्या मैदानाची ही जागा…
Read More...

टँकरद्वारे राज्याला पाणीपुरवठा करावं लागतो, लाज वाटायला हवी- जयंत पाटील

दुष्काळामध्ये तुम्ही राज्यात ६ हजार ५९७ टँकरद्वारे राज्याला पाणीपुरवठा करत होता ही काय भूषणावह गोष्ट आहे का ? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ‘राज्याला दुष्काळमुक्त करू’ असं म्हणून तुम्ही सत्तेत आला होतात आणि आता पाच वर्षांनी तुम्हाला राज्याला ६ हजार टँकर रोज द्यावे लागत आहेत. कशासाठी स्वतःची पाठ थोपटून घेताय ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारला केला आह.हे बजेट केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं बजेट आहे. ‘ऋण काढून सण साजरा करू नये’ असं…
Read More...

अर्थसंकल्प ट्विटची सायबर सेलमार्फत चौकशी करा- विरोधकांची मागणी

मंगळवारी दुपारी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला होता.अर्थसंकल्प सादर करत असताना त्यातील मुद्दे हे सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विट अकाऊंटवर टाकण्यात येत होते. त्यावेळी विरोधकांनी गोंधळ घालत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फोडला असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर आज (बुधवारी) विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निषेध करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.तसेच अर्थसंकल्प सादर होत…
Read More...