InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

टीका

‘शेठ,पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल’; सामनातून पंतप्रधान मोदींवर निशाणा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा ‘कावा’ होता. पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा…
Read More...

‘संज्याला रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड द्यायला पाहिजे’; निलेश राणे यांची टीका

राज्यसभेतील शिवसेना खासदारांची आसनव्यवस्था बदलण्यात आली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. बुधवारी राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना राऊत यांनी यासंदर्भात पत्रही पाठवले आहे. यावरुनच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “संज्याला रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड द्यायला…
Read More...

‘बरं झालं युती तुटली’, तरुण भारतमधून टीकास्र

हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे एकमेकांचे मित्र बनलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील युती मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर तुटली आहे. दरम्यान, भाजपा आणि शिवसेनेमधील तीस वर्षे जुनी युती तुटल्यानंतर संघाशी संबंधित असलेल्या तरुण भारत या वृत्तपत्रामधून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तीन दशकांपर्यंत चाललेली भाजपा आणि शिवसेनेमधील युती…
Read More...

‘संजय राऊत गल्लीतल्या त्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखा’; निलेश राणे यांची टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून आणि सकाळी 9.30 वाजताच्या पत्रकार परिषदांमधून भाजपची झाडाझडती घेण्याचा नित्यनियम सुरु ठेवला असतानाच, भाजपवासी झालेले माजी खासदार निलेश राणे यांनीही राऊतांवर एकेरी भाषेत ‘ट्वीटहल्ला’ करण्याची सवय मोडलेली नाही. ‘संजय राऊत वॉचमनशी हुज्जत घालणाऱ्या कुस्क्या म्हाताऱ्यासारखे आहेत’ अशी टीका निलेश राणे…
Read More...

- Advertisement -

‘अशी समीकरणं देशभरात अनेकवेळा घडली आहेत’; खडसेंचा भाजपला उपरोधिक टोला

शिवसेना आणि भाजपच्या महायुतीला जनतेने भरभरून मत दिले आहे. मात्र, तरीही आपसातील वादामुळे युतीचे सरकार स्थापन होत नसल्याने हा जनाधाराचा अपमान आहे. अशा शब्दात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे.भाजपला 104 जागा मिळून सुद्धा ते विरोधी पक्षात बसतील तर शिवसेना, काँगेस आणि राष्ट्रवादी सारख्या पक्षांना…
Read More...

‘तिकीट का कापलं हे विचारायला गेले असतील’; अजित पवार यांची विनोद तावडेंवर टीका

भाजप नेते विनोद तावडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत टीका केली आहे. विनोद तावडे विधानसभा सदस्य नाहीत. जी व्यक्ती विधानसभेचा सदस्य नाही, सभागृहाचा जो प्रमुख नेता होणार आहे, त्याला मत देऊ शकत नाही, असा नेता राज्यपालांशी भेटून चर्चा कशी करु शकतो, असं अजित पवारांनी म्हटलं.…
Read More...

हर्षवर्धन पाटलांना ‘दे धक्का’, इंदापूरमधून दत्तात्रय भरणेंची राष्ट्रवादी पुन्हा

इंदापूरमधून भाजपने हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, राष्ट्रवादीने इंदापूरचा गड राखला असून येथून दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला आहे. शरद पवारांनी इंदापूर मतदारसंघात सभा घेऊन हर्षवर्धन पाटील यांच्याशी मी संपर्क साधल्याचं सांगतिलं होतं. तसेच, दत्तात्रय भरणेंना विजयी करण्याचं आवाहनही इंदापूरकरांना केलं होतं. पवारांच्या झंझावती…
Read More...

विकासाला कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही – ज्योतिरादित्य सिंधिया

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे विकास, प्रगती, विचारधारा असणारे नेते आहेत. तलवारीला घासल्याशिवाय पात्याला धार नाही, त्याप्रमाणे विकासाला कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया  यांनी केले. भोकर मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अशोक…
Read More...

- Advertisement -

25 तारखेला मातोश्रीसमोर येऊन कायमचं तोंड बंद करेन – नारायण राणे

निवडणूक होऊ दे त्यानंतर मातोश्री समोर येऊन तोंडं कायमची बंद करेन असा इशारा भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राणे गप्प बसतील असे कोणाला वाटत असेल तर तसे होणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यातील तीनही जागा भाजपच्या असतील असा विश्वास व्यक्त केला. सावंतवाडीतल्या…
Read More...

कागदाचं विमानही न बनवणाऱ्यांना,विमान बनवण्याची परवानगी दिली – शरद पवार

कागदाचं विमानही ज्यांनी बनवलं नाही त्यांना विमान बनवण्याची परवानगी दिलीय अशी टीका पवारांनी रिलायन्सचं नाव न घेता केली. हिंदुस्तान एअरॉनॉटीक्स लिमिटेड कंपनीत कामगारांचा देशव्यापी बेमुदत संप सुरू आहे. संपाचा आज पाचवा दिवस आहे. तिथे जाऊन शरद पवारांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने एचएएलबाबत योग्य निर्णय घेतले नाहीत अशी टीका शरद…
Read More...