InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

दुष्काळ

कृत्रिम पावसाचा प्रयोग करणासाठी यंत्रणा सज्ज- कृषीमंत्री अनिल बोंडे

पावसाळा सुरु होऊनही राज्यात दुष्काळाची स्थिती ‘जैसे थी’ असल्याचं चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनं कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप राज्यात कोठेही कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरु झालेले नाहीत. कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी रडार सज्ज असून फक्त ढगांची वाट पाहात असल्याचं सांगितलं. तसंच या पावसाची सुरुवात मराठवाड्यातून…
Read More...

मुंबईवर पाणीकपातीचं संकट

मुंबई-  राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी पावसाचा काही पत्ता नाही. त्यामुळे राज्यातील जनता आणखी हवालदिल झाली आहे. दिवसेंदिवस पावसाचं आगमन लांबणीवर पडत असून त्यामुळे चिंतेत आणखी भर पडत आहे. धरणांनी देखील तळ गाठला असून पाणीसंकट वाढताना दिसत आहे. राज्यात दुष्काळ असल्यानं पावसाकडे सर्वाचं डोळे लागून बसले आहेत. धरणांमधील पाणीसाठी देखील सपाट्यानं खाली…
Read More...

एका दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या’ – सुप्रिया सुळे

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाण्याच्या गंभीर समस्येबाबत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत आवाज उठवला. सन 2018 मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून यंदाही 2019 मध्ये मान्सुन येण्यास विलंब झाल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी मिळेना झाले आहे.महाराष्ट्रातील…
Read More...

शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका; कृषिमंत्र्याचे शेतकऱ्यांना आवाहन

राज्यात सध्या पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थितीचं संकट शेतकऱ्यांवर उभं राहिलं आहे. कृषिसंकट राज्यावर ओढावलं आहे ही खरी परिस्थिती आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आत्तापर्यंत 19 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. उर्वरित रक्कम येणाऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे असा दावा राज्याचे कृषीमंत्री…
Read More...

- Advertisement -

कॉंग्रेस आमदाराचा वर्ध्यात ‘झिंगाट डान्स’

राज्यात एकीकडे दुष्काळ परिस्थिती असल्याने सभागृहात विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत असताना त्यांच्यातील एक नेता खासगी कार्यक्रमात डान्स करण्यात मश्गुल असल्याचं दिसत आहे.वर्धा जि्ह्यातील आर्वी येथील काँग्रेस आमदार अमर काळे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून, यावेळी राज्यात दुष्काळासारखी भीषण परिस्थिती असल्याचं विसरुन ते लग्नाच्या कार्यक्रमात डान्स…
Read More...

वर्ध्यात कर्जापोटी आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

वर्धा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र संपण्याचे नाव घेत नसून सततची नापिकी व दुष्काळाने होरपळलेला शेतकरी वाढत्या कर्जाला कंटाळून स्वतःची जीवनयात्रा संपवत आहे. काल पुन्हा एका शेतकऱ्याने कर्जाच्या पोटी आत्महत्या केल्याची घटना मांडगाव येथे उघडकीस आली आहे.मांडगाव येथील मंगेश उत्तम पाहुणे (वय ३९ वर्षे) यांनी आपल्या स्वतःच्या राहत्या घरी दुपारच्या…
Read More...

कृषी क्षेत्राची पिछेहाट तरीही ०.४ टक्के वाढ अपेक्षित

दुष्काळामुळे राज्याचा कृषी विकास दर ०.८ टक्क्यांवरून तब्बल उणे आठ टक्क्यांवर घसरला असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.एकाबाजूला कृषी क्षेत्राची पिछेहाट होत असताना दुसऱ्या बाजूला कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात ०.४ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजानुसार राज्याच्या…
Read More...

विजयाची धुंद; दुष्काळाकडे दुर्लक्ष

राज्यात भीषण दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना मंत्री दुष्काळी पर्यटनात मग्न असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.दुष्काळाच्या पाहणीसाठी विदर्भात आलेले शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ तीव्र आहे. त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कुठे…
Read More...

- Advertisement -

 दुष्काळी संकटाचे राजकारण शिवसेना करणार नाही- आदित्य ठाकरे

दुष्काळी संकटाचे राजकारण शिवसेना कधीही करणार नाही. दुष्काळात भरडलेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पीडित शेतक ऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे…
Read More...

राज्यात सहा हजार टँकर्सद्वारे साडेपंधरा हजार गावांना पाणी

राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 13 टक्के साठा शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून 4920 गावे व 10506 वाड्यांमध्ये 6209 टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यात शेळ्या-मेंढ्यांसह मोठ्या व लहान जनावरांसाठी दीड हजार चारा…
Read More...