InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

धनंजय मुंडे

अजब न्याय! दाद मागायला आलेल्या शेतकऱ्यालाच केली अटक

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ न झाल्याने दाद मागण्यासाठी विधिमंडळात आलेल्या वाशिम येथील अशोक मनवर या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित केल्यावर गदारोळ झाला.या शेतकऱ्याची तातडीने सुटका करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली, तरी सरकारकडून बँक खात्यात रक्कम जमा न…
Read More...

गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फसवी – धनंजय मुंडे

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या अखेरच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. फडणवीसांनी गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं मुंडे म्हणाले.मुंबईत माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केला.वाशीम जिल्ह्यातील अशोक मनवर नावाच्या शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर मुंबईत बोलवून कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले होते. त्याच शेतकऱ्यांला अद्याप कर्जमाफी मिळाली नाही.मनवर हे एकमेव शेतकरी नसून…
Read More...

NPA चा बागुलबुवा कशाला; धनंजय मुंडेंंची आक्रमक भूमिका

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज विधानपरिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली.शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्ज माफीपासून लाखो शेतकरी वंचित आहेत. रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीला सुरवात झाली असताना आणि शेतकऱ्याला पीक कर्जाची नितांत आवश्यकता असताना बँकांनी NPA चा बागुलबुवा उभा करून पिककर्जाला नकार देत असल्याचा आरोप त्यांनी केला.पूर्वमशागतीच्या तयारीसाठी हेक्टरी २५ हजाराची मदत, वादळ, गारपीठीमुळे नुकसान झालेल्या फळबागांना हेक्टरी १ लाख आणि अन्य पिकांसाठी हेक्टरी…
Read More...

फोडाफोडीचे मंत्रालय स्थापन करून महाजनांकडे कारभार द्या- मुंडे

प्रशासकीय आणि पोलीस बळाच्या जोरावर दबाव टाकणे आणि फोडाफोडी करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. मुख्यमंत्र्यांनी फोडा-फोडीचे मंत्रालय स्थापन करून त्याचा कारभार महाजन यांच्याकडे द्यावा, अशा खोचक शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टिका केली आहे.विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी महाजन नेहमीच प्रयत्नशील असतात. असंही ते या वेळी म्हणाले.सत्तेत येण्यापूर्वी फडणवीस यांनी अनेक आश्वसने दिली होती.…
Read More...

….त्यामुळे विधान परिषदेतही विरोधी पक्षनेताच नसेल- सुरेश धस

जगमित्र साखर कारखानप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश  दिले असूनदेखील आमदार सुरेश धस यांनी मुंडेविरोधात वक्त्व्य केले आहे.गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होतील, असे बोलत त्यांनी मुंडे यांना चिमटा काढला आहे.धस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना मुंडे यांच्यावर टीका केली. “यंदाचे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे गुन्हा दाखल होताच फरार होतील.…
Read More...

कोर्टाची दिशाभूल करून याचिका दाखल – धनंजय मुंडे

अंबाजोगाईमधील पुस येथील जगमित्र शुगर मिल्ससाठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमीन कोणाचीही फसवणुक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र शेतकऱ्यांना व बँकांना ५,४०० कोटी रूपयांना बुडवणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांच्या प्रकरणांचा पाठपुरावा केल्याने त्यांचे जावई राजाभाऊ फड यांच्याकडून राजकीय सूडबुध्दीने याचिका दाखल करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. फड यांनी कोर्टाची दिशाभूल करून माझ्याविरुद्ध आदेश प्राप्त करून घेतले, असा दावाही त्यांनी केला.सरकारी…
Read More...

CBSE आणि ICSEचे महत्त्व वाढवण्यासाठी दहावीचा निकाल घसरवला- धनंजय मुंडे

राज्य शिक्षण मंडळाने असे २० गुण कमी केल्याने CBSE आणि ICSE च्या तुलनेत राज्य बोर्डाचे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी स्पर्धेत कसे टिकतील? असा सवाल धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला.उपस्थित करताना  मुठभर खाजगी संस्थाचालकांची मक्तेदारी असलेल्या व भरमसाठ फी घेणाऱ्या CBSE आणि ICSE बोर्डाचे महत्त्व वाढवण्याचा शिक्षणमंत्र्यांचा हा डाव तर नाही ना? असा सवाल मुंडे यांनी केला आहे.दहावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी घसरण झाल्याने यावर विविध स्तरातून चर्चा सुरु झाली आहे.…
Read More...

धनंजय मुंडेंनी स्वतःच बीडमधील राष्ट्रवादी यशस्वीपणे संपवली – पंकजा मुंडे

धनंजय मुंडेंनी स्वतः काही कमावलेलं नाही. त्यामुळं राष्ट्रवादीच्या मतांचं श्रेय त्यांनी घेऊ नये. जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्यांनी यशस्वीपणे स्वतःच संपवली आहे, असे म्हणत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.एक्झिट पोलचे आकडे समाधान आणि आनंद देणारे आहेत. आम्ही अंदाज वर्तवले त्याहून चांगले अंदाज देशभरातले दिसत आहेत.असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.पंकजा मुंडे म्हणाल्या की, 2014 नंतर बीड जिल्ह्यात पक्षावर नसेल पण मुंडे साहेबांवर प्रेम करणारांनी त्यांना…
Read More...

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेत एंट्री; राष्ट्रवादीला धक्का

गेली तीन वर्षे पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बुधवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज होते. तसेच, पक्षात आपली घुसमट होत होती, असे सांगत त्यांनी टीकाही केली होती.बीडमधील एका कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. असे असेल तरी…
Read More...

आचारसंहितेदरम्यान घाईघाईने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचं कारण काय; धनंजय मुंडेंचा सवाल

धनंजय मुंडेंनी कायमच सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रश विचारला आहे की, ‘मुख्य सचिवांची सप्टेंबरपर्यंत मुदत असताना आचारसंहितेदरम्यान घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली? जनतेला उत्तर द्या असे म्हणत, बदल्यांवर धनंजय मुंडेंनी ट्विट करून सरकारच्या इराद्यावर प्रश्न उपस्थित केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ‘लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही. असं, अप्रत्यक्षपणे…
Read More...