InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

नरेंद्र पाटील

“उदयनराजेंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शुध्दीत द्यावीत”

साताऱ्यात सध्या उदयनराजे विरूध्द नरेंद्र पाटील यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका केली.उदयनराजेंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शुध्दीत द्यावी, असा टोला नरेंद्र पाटील यांनी लगावला. तसेच, आनेवाडी टोल नाक्याच्या कारणातून 2017 मध्ये झालेल्या सुरुची राड्यातील सुमारे दीडशेच्यावर कार्यकर्त्यांना पोलिसांनी हद्दपारीच्या नोटीसा काढल्या आहेत. मात्र यात उदनयराजेंना का हद्दपारीची…
Read More...

‘हिंमत असेल तर सांगा, तुम्ही म्हणाल तिथं येईन’, नरेंद्र पाटलांचे उदयनराजेंना आव्हान

साताऱ्यात झालेल्या युतीच्या सभेत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र पाटील म्हणाले की, माझ्यावर दोनदा प्राणघातक हल्ले झाले. मला आता मरणाची भीती नाही. तुम्ही मर्द मराठे आहात. तुमच्यात दम नसेल तर मला सांगा, मी तिकडं येतो, असे खुले आव्हान नरेंद्र पाटलांनी उदयनराजे यांना दिले.तसेच विकास कामांबाबत नरेंद्र पाटील म्हणाले की, टीव्ही चॅनेलवर 17 हजार कोटींचा विकास होता. पत्रकार परिषदेत 18 हजार कोटी झाला. आठ दिवसात हजार कोटी कसे वाढले हेच समजले नाही. विकास काम मोदींनी…
Read More...

साताऱ्यात उदयनराजे भोसले विरूध्द नरेंद्र पाटील यांच्यात रंगणार लढत

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातारा लोकसभा मतदार संघासाठी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांच्या विरोधात युतीकडून कोण लढणार याची उत्सुकता सर्वांच होती. मात्र आता हा सस्पेन्स संपला असून, उदयनराजे भोसले यांच्या विरोधात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे निवडणूक लढवणार आहेत.तसेच नरेंद्र पाटील शिवसेनेत देखील प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्वतःच स्पष्ट केले आहे.महत्त्वाच्या बातम्या –काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आणखी दोन नेत्यांचा भाजपमध्ये…
Read More...

शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे दौऱ्यावर असताना  दौऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला ताब्यात घेतले होते. यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे.धनंजय मुंडेंनी म्हंटले कि, मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर फडणवीस सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा…
Read More...

धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला अटक, मुख्यमंत्री आहेत धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील आणि धर्मा पाटील यांच्या पत्नी आंदोलन करू शकता अशी माहिती सुरक्षा यंत्रणाना मिळाली होती. याची खबरदारी म्हणून धर्मा पाटील यांच्या मुलाला आणि धर्मा पाटील यांच्या पत्नीला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितले.कोण आहेत धर्मा पाटीलधर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शेतकरी होते. धुळे…
Read More...

स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनांचा मंत्रिमंडळ उपसमितीकडून आढावा

स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आज मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आढावा घेण्यात आला. महामंडळाने मराठा समाजासाठी नव्या योजना सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात  झाली. यावेळी समितीचे सदस्य तथा सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे,जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष…
Read More...

महामंडळ मिळताच राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील भाजपात ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकताच जाहीर झालेल्या महामंडळ नियुक्त्यांमध्ये नरेंद्र पाटील यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पाटील हे भाजपात जाणार असल्याचे निश्चित मानले जात होते. पाटील यांनी पक्ष सदस्यत्व आणि महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
Read More...