InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

नितीन गडकरीं

‘निवडणुकीपूर्वी एका पक्षाशी युती आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत ही बाब लोकशाहीसाठीही मारक’

निवडणुकीत युती असलेल्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षाशी आघाडी करून सत्ता स्थापन करणं लोकशाहीसाठी घातक आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रातील काँग्रेस-शिवसेनेचं आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. आगामी काळात शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे. निवडणुकीपूर्वी एका पक्षाशी युती करायची आणि…
Read More...

आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही – नितीन गडकरी

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर केंद्रीय…
Read More...

उद्धव ठाकरे यांना गडकरींनी दिल्या शुभेच्छा

उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना शपथ दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला. उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत असून, नितीन गडकरी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.…
Read More...

‘कर दिया ना क्लीन बोल्ड’; नवाब मलिक यांचा टोला

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध केलेलं बंड फसलं आहे. यानंतर आता महाविकासआघाडीचे नेते भाजपाला चिमटा काढायची एकही संधी सोडत नाहीयेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टोला लगावला आहे.क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असं नितीन गडकरी म्हणाले होते.…
Read More...

- Advertisement -

महाशिवाघाडीचे सरकार स्थापन जरी झालं तरी ते टिकणार नाही – नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात स्थापन होत असलेल्या महासेनाआघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारधारेत मतभिन्नता आहे, त्यामुळे हे सरकार स्थापन जरी झालं तरी ते टिकणार नाही, असं नितीन गडकरी म्हणाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी ही संधीसाधू आघाडी आहे. ही आघाडी…
Read More...

सुखी जीवन जगण्यासाठी भविष्याची चिंता सोडणे आवश्यक – नितीन गडकरी

सुखी जीवनाचा एक मार्ग म्हणजे भविष्याची कोणतीही चिंता न करणे असा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. मला काय मिळेल, माझे काय होईल याची काळजी न करता बिनधास्त जगणे हाच खरा सुखी जीवनाचा मार्ग असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.नागपुरात पंचांगकर्ते राजंदेकरकृत महाराष्ट्रीय पंचांग प्रकाशन सोहळ्याचं आयोजन केलं होतं, त्यात ते बोलत होते.…
Read More...

‘आपल्या देशात चमच्यांना कमी आहे का?’

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी प्रशासकीय कामकाज आणि राजकीय कामाच्या पद्धतींवर अगदी खुलेपणाने आपली मतं व्यक्त करत असतात. आता त्यांनी बांबूच्या चमच्यांच्या आयातीवरुन पुन्हा एकदा खुशामत करणाऱ्यांवर कटाक्ष टाकला. यावेळी गडकरींनी एकदा आपण देशात चमच्यांना कमी आहे का? असं विनोदाने विचारल्याची आठवण सांगितली.नितीन गडकरी म्हणाले, “आपल्या देशात…
Read More...

रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवा दंडात 20 टक्के रक्कम मिळवा – नितीन गडकरी

पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीमधील किस्सा सांगत अवैद्य वाहतूक करणाऱ्या मोटारीवर कश्या प्रकारे नियंत्रण आणता येईल हे सांगितलं. ते सिम्बॉसिस येथे कार्यक्रमासाठी आले होते तेव्हा ते बोलत होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले दिल्लीत माझ्या कार्यल्याच्या इथे मोटार पार्क करण्याची व्यवस्था नाही त्यामुळं अनेक वाहन…
Read More...

- Advertisement -

‘कुठलं सरकार बनवणं किंवा कुणाला मुख्यमंत्री बनवणं हे उद्दिष्ट नाही’

आपल्या संघटनेचं उद्दिष्ट साफ आहे. कुठलं सरकार बनवणं किंवा कुणाला मुख्यमंत्री बनवणं नाही, तर या राष्ट्राचं पुनर्निर्माण आहे. संपूर्ण समाज बदलवणं आहे’ असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिवराव देवधर यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पुण्यात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून…
Read More...

मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेवर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आलं. नितीन गडकरी यांचा शिवसेना पक्षप्रमुख यांच्यासोबत असलेला संवाद आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या विरोधी पक्षांतील नेत्यांसोबत असलेले संबंध लक्षात घेता, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं…
Read More...