InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

निवडणुक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 24 मार्च 2019 रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला पक्क्या शाईने निशाणी केली जाते; तसेच पुनर्मतदानाच्यावेळी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याबाबत राज्य…
Read More...

यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती!

2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेत महिला मतदारांचा टक्का वाढलामुंबई : महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे.2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची नोंदणी झाली. 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला…
Read More...

विधानसभेसाठी रोहित पवार कर्जत-जामखेडमधून; धनंजय मुंडेंनी दिले संकेत

कर्जत - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून लढतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी शिक्कामोर्तब केले.धनंजय मुंडे म्हणाले, "तुमच्या मनातील उमेदवार देण्यासाठी लोकसभेसाठी पक्षाच्या उमेदवाराला या मतदारसंघातून लीड द्या. रोहित या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ "सूर्याचे पहिले किरण असा होतो' ते कर्जत-जामखेडमध्ये यावे असे वाटत असेल, तर लोकसभेसाठी आघाडी द्या.'' अशा…
Read More...

पराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, अशोक चव्हाणांची मोठी घोषणा

मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोट येथे केली. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान स्थानिक खरेदी-विक्री मैदानात सभा पार पडली. त्यावेळी चव्हाण बोलत होते.आगामी निवडणुकांमधील रणनीती संदर्भात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, की केंद्रात व राज्यात भाजप-सेनेचे सरकार आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. जनतेची फसवणूक केली. या…
Read More...

गुंडगिरी करून निवडणुका जिंकण्याचे भाजपचे तंत्र – अजित पवार

पैशांच्या जोरावर आणि गुंडगिरी करून निवडणूक जिंकण्याचे तंत्र भाजपने सध्या सुरू केले आहे. जळगाव, जामनेरमध्ये जे झाले तेच धुळ्यात होत आहे. भाजपमध्ये गुंडांना उघडपणे प्रवेश देऊन भाजपचे धुळे महापालिका निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न आहेत. गुंडांना पक्षाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर शेजारी बसविले गेल्याने भाजपची ही गुंडगिरी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.अजित पवार म्हणाले, भाजपमध्ये सध्या अनेकांना प्रवेश दिला जात असून, त्यात गुंड, माफियांचा प्रामुख्याने समावेश आहे. तुम्ही…
Read More...

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमचा निवडणुकीसाठी अर्ज

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या श्रीपाद छिंदमने अखेर निवडणुकीचा अर्ज दाखल आहे. छिंदम ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहे. छिंदमने प्रभाग 9 मधून नगर पालिकेचा अर्ज भरला आहे. अनेकांचा विरोध असतानाही छिंदमच्या उमेदवारीवर राजकीय वर्तुळात चर्चा आहे.मागच्या महिन्यापासून छिंदम या प्रभागात तयारी करत आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल घरोघरी जावून माफी मागत आहे. आपण नागरिकांच्या कामासाठीच त्या कर्मचाऱ्याला बोललो, असं सांगत आपली बाजू सावरत आहे.महत्वाच्या बातम्या –गोपीनाथ मुंडे असते तर…
Read More...

निवडणुकीच्या आखाड्यात यापुढे उतरणार नाही : शरद पवार

आता यापुढे निवडणूक लढविणार नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. बालमंदीर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘आठवणीतील पुणे‘ विषयावर प्रकट मुलाखतीत त्यांनी निवडणूक लढविण्याच्या संदर्भातील आपल्या जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. पुण्याचे नेतृत्व करायला आवडेल का, या प्रश्नाावर पवारांनी आता निवडणूक नाही, असे म्हणत आगामी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली आहे.पुण्यात शिक्षण घेताना विविध महाविद्यालयीन निवडणुका पवार पॅनेलच्या माध्यमातून लढवल्या आणि जिंकल्याही. या…
Read More...

७० वर्षांपासून लोकांचा फक्त मतांसाठीच उपयोग – प्रकाश आंबेडकर

मागील ७० वर्षांपासून ज्या लोकांनाच फक्त मतांसाठीच उपयोग केला गेला अशा लोकांना सतेत भागीदारी देण्याच्या उद्देशाने आणि लोकशाहीचे सामाजिकरण करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी या संघटनेची स्थापना केली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.धनगर, ओबीसी मधील खालच्या जाती, मुस्लीम, एस.सी या सर्व जातीतील लोकांचा काँग्रेस असो बीजेपी असो कि इतर पक्ष असो सर्वानीच मतांच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला. मात्र, त्यांना सत्तेत कधी वाटा दिला नाही. त्याच्या आरक्षणासंबंधी मागण्या असो…
Read More...

आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी

आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र भर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. असं असताना देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध आहे. आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारही जाती आधारित आरक्षणव्यवस्था रद्द करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतंय, अशी चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. 'सब का साथ सब का विकास', हे आमचं ब्रीद असून आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील, त्याला कुठलाही धक्का लागणार नाही, असं पंतप्रधान मोदींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांची आणि सरकारची भूमिका…
Read More...