InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘अखेरपर्यंत टीम इंडियाने जी झुंज दिली, ते पाहून बरं वाटलं’; मोदींनी दिल्या टीम इंडियाला…

आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली. टीम इंडियाच्या पराभवावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली. हा परिणाम निराशाजनक आहे, मात्र, अखेरपर्यंत टीम इंडियाने जी झुंज दिली, ते पाहून बरं वाटलं, असं मोदी म्हणाले.https://twitter.com/narendramodi/status/1148959096831217665ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर काल (9 जुलै) न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या…
Read More...

देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य – मोदी

काहीजण भारताच्या सामर्थ्यावर संशय घेत आहेत. त्यांना असं वाटतंय की भारत मोठी उंची गाठू शकत नाही, त्यामुळेच आम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले असून सध्या सगळीकडे याचीच चर्चा सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे जाहीर सभेत बोलताना म्हटलेमोदी म्हणाले, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काल टीव्हीवर आणि आज वर्तमानपत्रांमधून तुम्ही भारताच्या ५ ट्रिलिअन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या ध्येयाबाबत ऐकले-वाचले असेल. सर्वत्र सध्या याचीच चर्चा सुरु आहे. ५…
Read More...

‘एक आमदार कमी झाल्याने फरक पडणार नाही’; त्या आमदाराच्या वागणुकीवर मोदींचा संताप

अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण करणाऱ्या युवा आमदाराला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलेच झापले आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आमदार आकाश विजयवर्गीय याने गुंडगिरी करत अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद भाजपच्या संसदीय कार्यकारिणीच्या बैठकीत उमटले.आकाश विजयवर्गीय यांची ही वर्तणूक चांगली नाही. अशा गोष्टी यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे मोदींनी म्हटले आहे. आपल्या मनात वाटेल तसे वागले जात आहे. अशा गोष्टींचे समर्थन होऊच शकत नाही. खासदारांचा मुलगा असो…
Read More...

दिल्लीत मोदींने केले डॉ. अमोल कोल्हेंचे कौतुक…

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे नवे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केलेल्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेलेल्या अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचं लक्ष्य वेधून घेतलं.डॉ. अमोल कोल्हे यांनी भाषणाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केल्याचं पाहायला मिळालं. डॉ. कोल्हे यांनी भाषणात केलेली  विषयांची मांडणी आणि वक्तृत्वशैली यामुळे त्यांचं कौतुक झालं. पंतप्रधान…
Read More...

‘वन नेशन वन इलेक्शन’ ला कॉंग्रेसचा नकार, मात्र मिलिंद देवरांचं समर्थन

देशात सध्या 'एक देश एक निवडणूक' या विषयावरुन चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीला बहुतांश विरोधी पक्षातील नेत्यांनी बहिष्कार घातला होता.काँग्रेसनेही एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी वन नेशन वन इलेक्शनचं समर्थन केलं आहेमिलिंद देवरा यांनी पत्र लिहून एक देश एक निवडणूक यावर भाष्य करत केंद्र सरकारच्या या प्रस्तावावर चर्चा करणं योग्य आहे. 1967 सालीही…
Read More...

देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत पाच लाख कोटींची करण्याचे उद्दिष्ट.

देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत पाच लाख कोटींची करण्याचे उद्दिष्ट आव्हानात्मक असले तरी साध्य करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या बैठकीत शनिवारी केले.देशाचा आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी जिल्हा पातळीपासून प्रयत्न करण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली. नीती आयोगाच्या पाचव्या बैठकीत पंतप्रधानांनी देशाच्या विविध भागांतील दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला.
Read More...

‘भारत पुन्हा जिंकला’, मोदींची ऐतिहासिक विजयावर पहिली प्रतिक्रिया!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा ऐतिहासिक असा विजय मिळवला. सर्व विरोधक एकत्र आले असताना देखील मोदींनी पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे.2014च्या यशानंतर मोदींनी 12च्या सुमारास ट्विटवरून पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे मोदी यावेळी काय बोलतात यासाठी सर्वजण त्यांच्या ट्विटवर नजर ठेवून होते. अखेर मोदींनी दुपारी 3च्या सुमारास ट्विटकरुन प्रतिक्रिया दिली.https://twitter.com/narendramodi/status/1131488026247323648महत्त्वाच्या बातम्या –महाराष्ट्रातील…
Read More...

निवडणूक काळात काश्मीर पेक्षा जास्त हिंसा पश्चिम बंगालमध्ये – मोदी

पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी म्हणाले, पश्चिम बंगालच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमधल्या निवडणुका जास्त शांततापूर्ण झाल्या. हिंसा आणि दहशतवाद म्हटल्यास पहिलं नाव काश्मीरचं येतं. परंतु काश्मीरमधल्या पंचायत निवडणुकीतही एवढी हिंसा झालेली नाही. तर दुसरीकडे बंगालच्या पंचायत निवडणुकीत शेकडो लोक मारले गेले आहेत. मोदी न्यूज 18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.हिंसा आणि दहशतवादाचा विषय आल्यास काश्मीरचं नाव…
Read More...

पंतप्रधान मोदींच्या ‘रडार’ विधानावर, राज ठाकरेंनी साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ढगाळ वातावरण असल्यानं पाकिस्तानच्या रडारमध्ये आपण दिसणार नाही', असे विधान केले होते. या वक्तव्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींची खिल्ली उडवली आहे.'आज सकाळी युनायटेड नेशन्समध्ये एक ठराव झाल्याचं मला कळलंय. या ठरावानुसार असं ठरलंय की, ज्याला कुणाला युद्ध करायचं असेल, त्याने पावसाळ्यात करावं. पाऊस मध्ये येईल, ढगही येतील, त्यामुळे रडारमध्ये काही येणार नाही, तुमचं काम होईल आणि त्या देशाला कळणारही नाही कुणी बॉम्ब टाकला ते. या शोधाचे मूळ शास्त्रज्ञ आहेत,…
Read More...

मी लष्करात असताना 100 पेक्षा जास्त सर्जिकल स्ट्राइक झाले – अमरिंदर सिंग

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या दाव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सिंग यांनी भाजपाच्या त्या दाव्याचा हवाला देत भाजपावर शरसंधान साधलं आहे. मोदी म्हणतात, सीमेपलिकडे जाऊन पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. पण मोदींना इतिहास माहीत करून घेण्याची गरज आहे.एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सिंग म्हणाले, भाजपाला इतिहासाची माहिती नाही. ज्याला लष्कराचा इतिहास माहिती आहे. त्याला माहितीच असेल की, आधीही बऱ्याचदा सर्जिकल स्ट्राइक झाले…
Read More...