InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

पेरणी

नवनीत राणा यांनी शेतात जाऊन केलेली पेरणी वादात

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतात जाऊन केलेली पेरणी वादात सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर त्यांनी पेरणी केल्याने त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. नवनीत राणा यांनी सोमवारी, 8 जुलैला पेरणी केल्याप्रकरणी वनविभागाने धारणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. मेळघाट दौऱ्यादरम्यान सेमाडोह येथील सन्नू रामलाल चव्हाण यांच्या जमिनीवर पेरणी केली. त्या स्वत: अन्य शेतमजुरांसह जमिनीत बियाणे टाकत असल्याचे चित्रीकरण व्हायरल झाले. पण, या जमिनीवर पेरा…
Read More...

फरताडे दांपत्याकडे बैलजोडी नसल्याने स्वत:ला तिफणीला जुंपून पेरणी

दुष्काळामुळे बैलजोडी विकली; मात्र आता पैसे नसल्याने स्वतःला तिफणीला जुंपून घेत सोयाबीनची पेरणी करायची वेळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील फरताडे कुटुंबियांवर आली आहे. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगरूळ या गावचे रहिवासी असलेल्या फरताडे कुटुंबीयांकडे असलेली जेमतेम कोरडवाहू शेती आणि बिकट आर्थिक परिस्थिती, मुलीच्या लग्नात काढलेल्या कर्जाची परतफेड यामुळे त्यांच्यावर आपली जिवापाड जपलेली बैलजोडी विकायची वेळ आली. आता ते कसाबसा आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.यंदा उशिरा का…
Read More...

पेरणी करताना विजेच्या धक्क्याने बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू, मुलाला साहेब करण्याचं स्वप्न अधुरं 

उस्मानाबादेत जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोर्डा येथील रामेश्वर मनोहर शेळके या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शनिवारी  पेरणी सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली. त्यामध्ये बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू झाला.रामेश्वर शेळके हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी शेतीसोबतच ते मजुरीचे कामही करतात. दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीची लगबग सुरु आहे. चार पैसे मिळावेत यासाठी बोर्डा येथीलच अनंत भगवान शेळके यांच्या शेतात  पेरणीच्या कामासाठी ते गेले होते. यावेळी ही दुर्घटना…
Read More...

लातुरात पेरणीला सुरुवात

लातूर - राज्यात मन्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. लातूर, अहमदपूर, चाकूर, उदगीर, अहमदपूर या भागात शेतकरी पेरण्या करू लागल्या आहेत. एकूण क्षेत्रफळापैकी फक्त ०२ टक्के पेरण्या अद्याप झाल्या आहेत. त्यामुळे बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली असून लातूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात यावर्षीही दुष्काळाच…
Read More...

वाशीमच्या शेतकऱ्याने दोन एकरांवर केली दगडांची पेरणी

वाशीम - बी-बियाण्यांसाठी शेतकऱ्याने किडनी देण्याची तयारी दाखवल्याची घटना ताजी असतानाच आता मालेगाव तालुक्यातील वसारी येथील अरुण लादे या शेतकऱ्याने पेरणीसाठी पैसे नाहीत म्हणून चक्क दगडांची पेरणी केली आहे. एवढे दिवस वरुणराजाची प्रतीक्षा करणारा बळीराजा आता पेरणीच्या चिंतेने ग्रासलेला आहे. पाऊस पडला पण पेरायचं कसं आणि काय? हा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे. दगडांची पेरणी करून शेतकरी अरुण लादे यांनी शासनावर आपला रोष व्यक्त केला आहे. आता तरी मुख्यमंत्री साहेबांना जाग यावी, अशी अपेक्षा त्यांनी…
Read More...

२२ ते २६ जून राज्यात वादळी पाऊस; पेरणीची घाई करू नये- कृषी विभाग

मान्सूनचे आगमन  २२ ते २५ जून दरम्यान बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.२६ तारखेनंतर या सर्व भागांमध्ये पावसात परत एकदा खंड आढळून येईल, जो किमान आठवडाभर तरी राहणार असल्याचे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि २६ नंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन…
Read More...

पावसाचा मराठवाड्यात ब्रेक, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

 टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सर्वत्र अतिवृष्टीचे सावट आहे मात्र मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात मात्र पावसाने ब्रेक लावल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे.जूनच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. जुलै महिन्याला सुरवात झाली असून पावसाने अजूनही मराठवाड्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात 49 लाख 11 हजार हेक्टरवर खरीपाची…
Read More...

पाऊस धो-धो कोसळेल पण शेतकऱ्यांनी ‘ही’ काळजी नक्कीच घ्यावी !

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सरासरी 102 टक्के पावसाची शक्यता असून काही काळ पावसात खंड जाणवेल असा अंदाज कृषी हवामान शास्रज्ञ आणि अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. गेल्या काही वर्षातील हवामानाची स्थिती सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग, आद्रता अशा विविध घटकांचा अभ्यास करून साबळे यांनी मान्सून मॉडेल विकसित केल आहे. राज्यभरातल्या विभागवार हवामान सेंटर वरून साबळे डेटा गोळा करून अंदाज व्यक्त करत असतात.शेतीचा विचार करता यंदा पाऊस चांगला असला तरी शेतकऱ्यांनी चांगला ओलावा असल्याशिवाय पेरण्या करू…
Read More...

पेरणीयोग्य पावसाशिवाय पेरण्या करू नयेत

मुंबई : मान्सूनचे केरळात आगमन झाले असले तरी अद्याप तो महाराष्ट्रात आलेला नाही. त्याचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतरसुद्धा पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.१ जूननंतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळतील, असा अंदाज आहे. परंतु कमाल तापमान अधिकच असेल. या कालावधीत मुंबई आणि कोकणात ढगाळी वातावरण आणि किरकोळ पाऊस पडेल. या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळ आणि वीजांपासून नागरिकांनी आपले संरक्षण करावे आणि पुरेशी खबरदारी घ्यावी,…
Read More...