InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

पोलीस

मिठी मारण्यास नकार दिल्याने एकाला चाकूने भोसकले

एका किरकोळ गोष्टीवरून एका मित्राने दुसऱ्याच्या पोटात चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमधील मवल्ली येथे रविवारी घडली आहे. शोएब पाशा आणि नबी मवल्ली अशी त्यांची नावे आहेत. यातील शोएबवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खूप दिवसांनी मित्र भेटल्याने आनंदात नबीने शोएबला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण नबीच्या अंगातून घामाची दुर्गंधी येत असल्याचे सांगत शोएबने त्याला ढकलून दिले. शोएबचे हे वागणे नबीच्या जिव्हारी लागले.तरीही त्याने हसण्यावरी नेत पुन्हा नबीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण शोएबने…
Read More...

लहान मुलांची तस्करी करणाऱ्या पोलिसांच्या बेड्या

गरीब कुटुंबातील बालके दत्तक देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांना अवैधरीत्या विकणाऱ्या महिलांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या चेंबूर कक्षाने बेडय़ा ठोकल्या. या टोळीकडून बालके विकत घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींच्या तावडीतून सुटका केलेल्या दोन बालकांना सध्या बालसुधारकगृहात ठेवण्यात आले आहे.सुनंदा मसाने (३०), सविता साळुंखे-चव्हाण (३०), भाग्यश्री भागवत कोळी (२६) आणि आशा ऊर्फ ललिता जोसेफ (३५) अशी टोळीतील महिलांची नावे आहेत. तर अमर देसाई आणि भाग्यश्री कदम (४२) हे बालकांचे खरेदीदार आहेत.गुन्हे…
Read More...

खासगी गाडीवर ‘पोलीस’ आता पोलीस लिहता येणार नाही

कोणत्याही खासगी गाडीवर 'पोलीस' असे लिहू शकत नाही किंवा पोलिसांचे चिन्ह लावू शकत नाही असा निर्णयाचा उच्च न्यायालयाने दिला आहे. ठाण्यातील अभ्यासक सत्यजित शहा यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. आणि आता न्यायालयाच्या निर्णयाचे शहा तसेच सर्व नागरिकांनी स्वागत केले आहे.दुधवाल्याच्या गाडीवर तसेच जेवण घेऊन येणाऱ्या एखाद्या डिलीव्हरी बॉयच्या गाडीवरसुद्धा पोलीस असे लिहिलेले असते. किंवा पोलिसांचे चिन्ह लावलेले असते. याला काय समजायचे ? असा विचार ठाण्यातील समाजसेवक आणि अभ्यासक सत्यजित शहा यांच्या मनात…
Read More...

एम जे कॉलेजमध्ये दुचाकी पार्क करण्यावरून एकाची हत्या

जळगाव- मुळाजी जेठा महाविद्यालय परिसरात दुचाकी पार्क करण्याच्या कारणावरून असोदा येथील मुकेश सपकाळे याचा काही तरुणांसोबत वाद झाल्याने तरुणांनी या विद्यार्थ्याला मारहाण करत चॉपरने वार केले. यामुळे तरुण गंभीर जखमी झाला. काही विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यृ झाला. या घटनेमुऴे परिसरात खळबळ उङाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.महत्वाच्या बातम्या –पुणे दुर्घटना: इमारतीची संरक्षण भिंत कोसळून 15 ठार, बिल्डर्सला…
Read More...

पुणे दुर्घटना: इमारतीची संरक्षण भिंत कोसळून 15 ठार, बिल्डर्सवर गुन्हा

पुणे- कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. आल्कन स्टायलस सोसायटीच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्यांच्या खोल्यावर रात्री दोनच्या सुमारास आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असल्याने खालच्या बाजूला असलेल्या खोल्यांवर भिंतीचा ढिगारा पडला. त्याखाली दबून 15 कामगारांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये 4 महिला आणि 2 मुलांसह 15…
Read More...

रायगडात हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश

रायगड - एका हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग रॅकेटचा रायगड पोलीसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 5 महिलांसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वेश्‍या व्‍यवसायासाठी आणलेल्‍या 7 मुलींची रवानगी कर्जतच्‍या सुधारगृहात करण्‍यात आली आहे. यामध्‍ये सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या मुली असल्‍याची माहिती मिळाली आहे. महत्‍वाचे म्‍हणजे आरोपींकडे 26 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्‍याची बाजारातील किंमत अडीच लाख रूपये इतकी सांगितली जाते.आरोपींना न्यायालयात हजर केले असता 3 जुलै…
Read More...

दारव्हा मार्गावर भोयर शिवारात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

यवतमाळ- शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या भोयर शिवारातील गिट्टी खदानीजवळ प्रेमीयुगुलाने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार (ता.6) सकाळी समोर आली. दीपक जाधव (वय-21, रा. कमलेश्वर मंदिर, परिसर, लोहारा) या तरुणाचा मृतांमध्ये समावेश आहे. मृत मुलगी ही अल्पवयीन असून तिचे नाव गोपनिय ठेवण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.3) अल्पवयीन मुलगी ग्रंथालयात जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिची…
Read More...

पालखी बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसाला अज्ञात वाहनाने चिरडले

पुणे-  येथील फातिमानगरमध्ये क्रोम मॉल चौकात भीषण अपघात झाला असून पालखी बंदोबस्त लावण्यासाठी निघालेल्या लष्कर पोलिसाचा अपघाती मृत्यू झाला आहे. मिलिंद मकासरे असे मृत पोलिसाचे नाव आहे. पहाटे 5 वाजता ही घटना घडली.पालखी बंदोबस्त लावण्यासाठी लष्कर पोलीस स्टेशनचे डीओ मिलिंद मकासरे हे जात होते. फातिमानगरातील क्रोम मॉल चौकात त्यांच्या डोक्यावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने मकासरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.महत्वाच्या बातम्या -…
Read More...

पियुष रामगडे मृत्यू प्रकरणाला नववळण

वर्धा | जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात 17 जानेवारीला पियुष रामगडे या 16 वर्षीय बालकाचा शरीरापासून धळ वेगळे झालेला मुत्यदेह रेल्वे पटरीवर आढळला होता. या घटनेने शहरात एकच खळब उडाली होती. मात्र पियुषने आत्महत्या केली की त्याच्या सोबत घातपात झाला या चर्चा शहरात उधाण आले होते. आता पियुषचे वडील गुरूदेव रामगडे यांनी पियुषची आत्महत्या नुसुन त्याची हत्या झाल्याची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.17 जूनला सकाळी घरून गेलेल्या पियुष रामगडे यांचा मृतदेह…
Read More...

बंदुकीचा धाक दाखवून मनसेच्या नगसेवकाचं अपहरण

अहमदनगर  : शिर्डी नगरपंचायतचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे अपहरण झाल्याची घटना सोमवारी रात्री घडल्याने खळबळ उडालीय. अपहरण कर्त्यांनी कोते यांना पहाटे शनी शिंगणापूर जवळ सोडून दिल्यानंतर ते पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या निवडी आगोदर हि घटना घडल्याने शिर्डीत खळबळ उडाली आहे.मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते आपल्या मित्रांसोबत पुण्याला जात असताना प्रवरानगर फाट्याजवळील ही घटना घडली. हॉटेल ग्रीनपार्क येथे चहा पिण्यासाठी कोते थांबले होते. त्यावेळी त्यांच्या टाटा व्हिस्टा गाडीजवळ…
Read More...