InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

बेरोजगारी

केंद्र सरकार बेरोजगारीडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे – पी. चिदंबरम

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी सत्ताधारी भाजपावर देशातील बेरोजगारीच्या प्रश्नावरून निशाणा साधला. बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मात्र केंद्र सरकार याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा त्यांनी आरोप केला. राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते.चिदंबरम म्हणाले, की देशातील उच्चशिक्षीत तरुणवर्गाला सध्या बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शिक्षण घेवूनही अनेकांच्या हाताला काम नाही. खलाशी पदाच्या ६२,९०७ जागांसाठी ८२…
Read More...

भारतात सर्वात कमी बेरोजगारी; ILO रिपोर्टचा दावा

सरकार रोजगार निर्मितीत कमी पडलं. तरूणांची फसवणूक झाली असे एक ना अनेक आरोप सरकारवर केले जात आहेत. तर, बेरोजगारांची वाढती संख्या पाहता सरकारपुढे रोजगाराच्या संख्येत वाढ करणं हे मोठं आव्हान आहे. दरम्यान, ILOनं दिलेल्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात कमी बेरोजगारी असल्याचं म्हटलं आहे.भारतात असलेली बेरोजगारी ही इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली. भारतात बेरोजगारीचा दर हा 3.5 टक्के, चीनमध्ये बेरोजगारीचा दर 4.7 टक्के आणि…
Read More...

बेरोजगारीपाठोपाठ पाण्याअभावी मेळघाटकरांचे स्थलांतर

मेळघाटातील ४ हजार ४५२ कुटुंबांतील १४ हजार ८० लोक मेळघाटबाहेर गेले आहेत. त्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ८ हजार ५०८ बालकांचा समावेश आहे. बेरोजगारी पाठोपाठ पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांनी हा पवित्रा घेतला आहे.मेळघाटातील २७ नळयोजनांसह २४७ हँडपंप बंद पडले आहेत. यात धारणी तालुक्यातील १८९ हँडपंप व सात नळयोजना आणि चिखलदरा तालुक्यातील ५८ हँडपंपांसह २० नळयोजना बंद आहेत.मेळघाटातील धारणी तालुक्यातील २७, तर चिखलदरा तालुक्यातील १४ अशा एकूण ४१ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, १३ बोअरवेलसह ५९…
Read More...

आम्ही सत्ते आल्यावर 2020 पर्यंत 22 लाख सरकारी नोकऱ्या देऊ, राहुल गांधी यांचे आश्वासन

गरीबांच्या खात्यात दरवर्षी 72 हजार रूपये जमा करायच्या योजनेनंतर आता 31 मार्च 2020 पर्यंत 22 लाख तरूणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे.यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत माहिती दिली. राहुल गांधी यांनी ट्विट केले की,सध्या जवळपास 22 लाख सरकारी पदे रिक्त असून जर भविष्यात काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर 31 मार्च 2020 पर्यंत ही सगळी पदे भरली जातील.https://twitter.com/RahulGandhi/status/1112392824530616320महत्त्वाच्या बातम्या –राहुल…
Read More...

आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये : नितीन गडकरी

तरुणांची वाढती बेरोजगारी, शेतीमालाला न मिळणारा बाजार भाव या कारणांमुळे आरक्षणाची मागणी पुढे येत आहे. आरक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांचे विचार जाणून घेऊन पावले उचलली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामी लक्ष घालत आहेत, अशी राज्य सरकारची पाठराखण करत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षण आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम कोणी करू नये, असे वक्तव्य केले आहे.ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारकडून विविध कार्यक्रम आखले जात आहेत. मात्र, शेवटी गरीब गरीब असतो. तो कोणत्या…
Read More...