InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मतदार

मतदार राजासाठी काही पण….ढोल ताशा वाजवत, गुलाबाचे फुल देऊन करण्यात आले मतदारांचे स्वागत

आज 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात देशातील 91 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी विविध गोष्टी केल्या जात असतात. उत्तरप्रदेशमधील बागपत जिल्ह्यात बडौत शहरातील एका मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांचे स्वागत चक्क ढोलताशे वाजवून तसेच मतदारांवर फुलांचा वर्षाव करून करण्यात येत आहे.मतदारांचे अशाप्रकारे करण्यात आलेल्या स्वागतामुळे, मतदार राजासाठी काही पण असेच म्हणावे लागेल.महत्त्वाच्या बातम्या –1980 च्या निवडणुकीत शिवसेनेने…
Read More...

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासाठी ३ लाख शाईच्या बाटल्या

लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात 3 लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य असा घटक बनली आहे.यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमध्ये पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा…
Read More...

महाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार

सर्वाधिक मतदार ठाण्यात; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक महिला मतदारलोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून 14 लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये सात लाख 35 हजार 597 एवढ्या महिला मतदारांची संख्या…
Read More...

मतदान जागृतीसाठी दिंडोरी तालुक्यात भव्य मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन

निवडणुकीत सातत्याने कमी मतदान होत असल्याने, भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदार संघाच्या विकासासाठी चांगले काम करणारे प्रतिनिधी निवडून देण्यासाठी तसेच मतदारांमध्ये मतदानाची जागृती करण्यासाठी दिंडोरी तालुक्यात भव्य मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीचा शुभारंभ शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी मानवाधिकार परिषदेचे हाजी शेख, नितीन…
Read More...

मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ५७ हजार मतदार

मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे मुंबई - भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दि.10 मार्च रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.   मुंबई शहर जिल्ह्यात 30 मुंबई दक्षिण- मध्य व 31 मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ असून 24 लाख 57 हजार 26 पात्र मतदार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात सोमवार, दि. 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होईल व सोमवार, दि. 23 मे  रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला…
Read More...

राज्यात सव्वा सात लाख मतदारांची ऑनलाईन नोंदणी

गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनंतर आतापर्यंत राज्यात तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज केले असून त्यापैकी 7 लाखापेक्षा जास्त नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक‍ अधिकारी कार्यालयाने दिली आहे.मतदार नोंदणी ऑनलाईन तसेच तहसील कार्यालयात अर्ज करुन (ऑफलाईन) अशा दोन पद्धतीने करता येते. ऑनलाईन अर्जांच्या बाबतीत अनेक बाबींची पडताळणी केली जाते. त्यात ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक पुरावे, छायाचित्र संगणकीय प्रणालीत अर्जदाराने…
Read More...

नरेंद्र मोदींनी केलं विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोठं आवाहन

आगामी लोकसबा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष जोरदार तयारी लागला आहे. मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाबरोबरच राजकीय पक्षांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. मतदारांचा टक्का वाढला की, निवडणूकींच्या जागांवर देखील त्याचा परिणाम होत असतो.आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदारांची संख्या वाढवण्यासाठी, विरोधी पक्षांच्या नेत्यांना ट्विट करत आवाहन केले आहे.नरेंद्र मोदींनी ट्विट केले की, 'राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि एम के स्टॅलिन…
Read More...