InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मुंबई

मुंबईत तीन वर्षांचा मुलगा गटारात गेला वाहून

घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने एक तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बचाव पथक या चिमुकल्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.गोरेगावच्या आंबेडकरनगर येथे ही घटना घडली असून काल येथे मुसळधार पाऊस सुरु होता. त्यातच या चिमुकल्याच्या घराबाहेरील गटार उघडे होते. त्यातून पावसाचे पाणी मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, हा…
Read More...

मुंबईत महानगर पालिका, बिल्डरांचा पार्किंग घोटाळा?

मुंबईकरांना अधिकाधिक पार्किंग उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने बिल्डरांना अतिरिक्त चार एफएसआय देऊन ९३ वाहनतळांवर ५५ हजार ७४२ गाड्या पार्क होतील, असे नियोजन केले. मात्र प्रत्यक्षात आत्तापर्यंत ९३ पैकी फक्त २६ वाहनतळ पालिकेच्या ताब्यात आले असून त्यात २१,७७८ गाड्या पार्क होतील इतकी जागा मिळाली आहे.मात्र प्रत्यक्षात १४ वाहनतळच सुरू झाले असून त्यावर ८,५२६ गाड्या पार्क होऊ शकतात. पालिकेतील विरोधी पक्षांनी फक्त चार हजार गाड्यांसाठीच पार्किंग मिळाले असल्याचा दावा केला असून काही बिल्डरांनी वाहनतळ…
Read More...

मुंबई हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी (10 जुलै) सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. हार्बर रेल्वेवरील कॉटन ग्रीन स्टेशन-शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी कॉटन ग्रीन स्टेशन-शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक लोकल खोळंबल्या…
Read More...

कर्नाटकमधील ‘त्या’ आमदारांच्या मनधरणीसाठी मंत्री डी.के. शिवकुमार आज मुंबईत

कर्नाटकात स्थिर सरकार हवे आहे, असा दावा करत मागील काही दिवसांपासून आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत. या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या त्या आमदारांची भेट घेण्यासाठी कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री डी.के. शिवकुमार आज  (बुधवारी) मुंबईत येणार आहेत. शिवकुमार यांच्या भेटीमुळे आत्तापर्यंत सत्ताधारी पक्षातील दोन्ही आमदारांच्या झालेला गैरसमज दूर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मागील काही दिवसांपासून कर्नाटक मधील १० काँग्रेस आमदार हे मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या सोफिटेल हॉटेलात तळ ठोकून आहेत.…
Read More...

मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत अतिवृष्टी

मुंबईवर अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईकरासाठी हाय अलर्ट जारी केला आहे. 200 मिली पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.आज ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत बरसणारा हा पाऊस जोरदार आहे. त्यामुळे अतिमुसळधार पावसामुळे पोलिसांनी मुंबईकरांना शक्य असेल तरच घराबाहेर पडा अशा सुचना केल्या आहेत.सोमवारी…
Read More...

काँग्रेस, जेडीएसच्याआमदारांकडून गोव्याला जाण्याचा प्लॅन रद्द

कर्नाटकातील राजकीय नाट्य आता अखेरच्या टप्प्यात आलं आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील काँग्रेस, जेडीएसच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिल्यानं कर्नाटकमधील नाट्यावर पडदा पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र बंडखोर आमदार अद्यापही अडून बसले आहेत. आमदारकीचा राजीनामा देणारे बंडखोर नेते आज गोव्याला जाणार होते. मात्र त्यांनी अचानक ही योजना रद्द केली आणि मुंबईत थांबण्याचा निर्णय घेतला. सध्या मुंबईतील अज्ञातस्थळी सर्व बंडखोर आमदार वास्तव्यास आहेत. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कर्नाटकातील…
Read More...

मरिन ड्राईव्हवर 2 जण बुडाले; उंच लाटांनी दोघांना ओढले समुद्रात

मुंबईत मरिन ड्राईव्हवर 2 जण बुडाल्याचे घटना घडली आहे. मरिन ड्राईव्हवर उंच लाटा उसळल्या आहेत. लाटांची आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोघांना लाटांनी समुद्रात ओढल्याचे सांगितले जात आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नेव्ही आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे.समुद्रात उंट लाटा उसळल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. बचाव कार्यातील एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. दुपारी अडीचच्या सुमारास मोठी भरती होती. त्या वेळी एक जण लाटेबरोबर वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने धाव…
Read More...

विकेंडला समुद्रकिनारी जाणाऱ्या मुंबईकरांना हायटाईडचा इशारा

गेल्या आठवड्यातच आलेल्या सलग पावसामुळे मुंबई तुंबली होती.  मुंबईकरांच्या विकेंडही पावसात जाणार असल्याचे सकाळी झालेल्या पावसामुळे वाटु लागले आहे. आज दुपारी मुंबईच्या समुद्रात लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील अरबी समुद्रात आज दुपारी 2.44 मिनिटांनी हायटाईडचा इशारा दिला आहे. अशावेळी पाऊस असल्यास मुंबईच्या अनेक भागात पाणी साचू शकते. भरतीच्यावेळी समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.महत्वाच्या बातम्या-देशाची…
Read More...

‘मुंबईच्या सध्याच्या परिस्थितीला सरकार आणि महापालिकाच जबाबदार’

मुंबापुरीची पार तुंबापुरी केली आहे. मुंबई तुंबली असताना फक्त पाणी साचले म्हणणारे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबईला स्मार्ट सिटी बनविताना मुंबईकरांचे हाल केले जात आहेत. मुंबईच्या सध्याच्या परिस्थितीला राज्य सरकार आणि मुंबई महापालिकाच जबाबदार असल्याचा असा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे.पावसामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झाली. रस्त्यावर पाणी तुंबले आहे. नागरिकांच्या…
Read More...