InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशात मोदींच्या बाजूने सायलेंट वेव – मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रात आमच्या युतीने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मागच्या वेळीस आम्ही 41 जागा जिंकल्या होत्या. यावेळेस त्याहीपेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देशात मोदींच्या नेतृत्वात एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले आहे. या देशात मोदीजींच्या बाजूने सायलेंट वेव आहे. देशातील जनता मोदींना निवडून देण्यास तयार असल्याचे दिसून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.दुष्काळासारख्या समस्यातून आपल्याला युतीचे सरकार बाहेर काढू शकेल असा विश्वास जनतेला आहे. त्यामुळेच आमच्यावर…
Read More...

सुरक्षेच्या कारणावरुन मुंबईच्या डबेवाल्यांना शाळांमध्ये प्रवेशबंदी

मुंबईतील शाळांमध्ये डबेवाल्यांना विद्यार्थ्यांसाठी मधल्या सुट्टीत डबे आणण्यास मनाई करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले असल्याचे शाळांकडून कारण सांगण्यात येत आहे.ही बंदी अयोग्य असल्याचे मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले असून, मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले आहे. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही तातडीने लक्ष घालण्यााचे निर्देश शिक्षण उपसंचालकांना दिले आहे.आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आज…
Read More...

राज्यात गंभीर दुष्काळ, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील दुष्काळामुळे तयार झालेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात शरद पवार आज सायंकाळी 8 वाजता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. यावेळी ते दुष्काळग्रस्त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडतील.‘सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह…
Read More...

सरपंचांच्या मागणीची तात्काळ दखल घेत नदी-नाल्यातील गाळ काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. 14 : गावात नदी, नाले व विहिरी आहेत, परंतु त्यामध्ये गाळ साचल्यामुळे पाणी साठा होत नसल्याच्या तक्रारी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सरपंचांनी करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या गावामध्ये गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून या जलस्त्रोताच्या ठिकाणचे गाळ काढणे व खोलीकरण करण्याचे निर्देश दिले. गाळ काढल्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटणार असल्याची प्रतिक्रियाही यावेळी या सरपंचांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील…
Read More...

नागरिकांशी संवाद साधून परिणामकारकपणे दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर व वाशिम जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिज यंत्रणेद्वारे संवाद साधून दुष्काळी उपाययोजना करताना प्रशासनाने नागरिकांशी अधिकाधिक संवाद ठेवावा. प्रशासनाने लोकांमध्ये राहून उपाययोजना केल्यास त्या अधिक परिणामकारकतेने राबविता येतील, त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.गेल्या सहा दिवसांपासून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह जिल्हास्तरावरील…
Read More...

मराठवाड्यातील दुष्काळ सदृश प्रश्नी पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सिंचन अनुशेष आणि पाण्याची तूट भरून काढण्यासाठी मराठवाड्याला राज्यातील अन्य धरणांतून पाणी द्यावे, तसेच अनुशेष अनुदान तातडीने देऊन दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.येत्या दहा वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील सिंचन सरासरी बरोबर येण्यास, मराठवाड्याला 150.185 टीएमसी पाणी इतर खोऱ्यातून स्थलांतरीत करणे आवश्यक आहे.मराठवाड्याचा 8.4 टक्के भाग कृष्णा खो-यात येत असल्यामुळे उस्मानाबाद व बीड…
Read More...

‘काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा’, मुख्यमंत्र्यांची टीका

महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामतघर आणि डोंबिवली येथे प्रचारसभा घेतली. यावेळी फडणवीसांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसचे घोषणापत्र हे कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.एका व्यक्तीवर एक लाखाचे कर्ज होते. ते फेडण्याकरिता त्याने चार कोंबड्या खरेदी केल्या. त्यांच्यापासून चार अंडी मिळाली. त्यांची पिले वाढत जाऊन पसारा वाढल्यावर ६४० कोंबड्या विकून एक लाखाचे कर्ज फेडणार, अशी स्वप्ने त्या व्यक्तीने पाहिली.…
Read More...

घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता घराणेशाही कशी चालते ?- रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी त्यांचे बंधू रोहित पवार सध्या अनेक ठिकाणी बैठका घेत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.रोहित पवार म्हणाले की, घराणेशाहीचा आरोप करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विखे आणि मोहिते घराणं कसं काय चालतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.मुख्यमंत्र्याच्या भाषणावर टाळ्या पिटणाऱ्या विखे आणि मोहिते पाटलांना त्यांच्या वडीलांनी आणि आजोबांनी केलेल्या कामाचा विसर पडलाय असा टोला रोहित…
Read More...

रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका; रणजितसिंहांच्या भाजपप्रवेशाबद्दल केलं मोठं विधान

रोहित पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वेळ साधत फेसबुक पोस्ट केली आहे.  'मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना' असं म्हणत त्यांनी तिकिटासाठी भाजपमध्ये जाणाऱ्या राजकारण्यांवर आणि त्यांना आयात करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.या योजनेचं वैशिष्ट्य सांगतांना ते म्हणाले , “मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना”, अशी एक नविन योजना आचारसंहितेच्या काळात सुरू करण्यात आली आहे. कालपर्यन्त असणारी विचारधारा, राजकिय आरोप एक क्षणात नष्ट करत…
Read More...

शरद पवारांना धक्का, विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार

विजयसिंह मोहिते पाटील बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांचे पुत्र रणजीतसिंह पाटील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या  मेळाव्यात आज ही घोषणा केली. रणजीतसिंह मोहिती पाटील यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं. बुधवारी 12.30 वाजता वानखेडे स्टेडियमवरच्या गरवारे क्लब मध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती रणजीतसिंह यांनी दिली. तर रणजीतने केलेल्या घोषणेला माझी सहमती आहे असं विजयसिंह मोहिती पाटील म्हणाले.यावेळी…
Read More...