InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

मोदी सरकार

Loksabha Election Results 2019- इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर

देशात मोदी सरकार येणार असल्याच्या परिणाम शेअरबाजारावरही पाहायला मिळत आहे. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीचे कौल समोर येत असून स्थिर सरकार येत असल्याच्या चिन्हानंतर शेअर बाजारात उसळी. सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार भाजपाने आघाडी घेतली आहे. मुंबईतही सर्व जागांवर भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.दरम्यान, सोमवारी व्यवहारांच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये 900 हून जास्त अंकांची उसळी घेतली. तर निफ्टीतही 200 अंकांची वाढ झाल्याचे…
Read More...

मोदी सरकार महिलांच्या बाबतीत असंवेदनशील

“मोदी सरकार महिलांच्या बाबतीत असंवेदनशील असल्यामुळे गेल्या पाच वर्षांत या सरकारने महिलांचे नाव पुढे करत केवळ घोषणा आणि जाहिरातबाजी केली. मात्र, प्रत्यक्षात महिलांसाठीच्या अनेक योजना बंद पाडल्या,’ असा आरोप आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी पुण्यात केला.“सत्तेत येण्यासाठी मोदी सरकारने 2014 च्या निवडणुकीत ज्या घोषणा केल्या, त्याची कोणतीही अंमलबजावणी केली नाही असे देखील वंदना चव्हाण यावेळी म्हणाल्या.पुणे लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र…
Read More...

आमच्या काळात तयार केलेल्या रस्त्यांवर पुढील २०० वर्ष तरी खड्डे पडणार नाही – गडकरी

मोदी सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर पुढील २०० वर्षे खड्डे पडणार नाही, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केला आहे.रस्ते तयार करताना आम्ही गुणवत्तेसोबत, कंत्राटदारांसोबत कोणतीही तडजोड करणार नाही. त्यामुळे मोदींच्या सत्ताकाळात तयार झालेले रस्ते दीर्घकाळ टिकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जे काम गेल्या ७० वर्षांमध्ये झालं नाही, ते आम्ही ५ वर्षांमध्ये केलं, असं म्हणत त्यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला लगावला. अयोध्येत पाच प्रकल्पांच्या भूमीपूजनानंतर…
Read More...

मोदींच्या ‘बजेट’मध्ये बिघाड; भारतीय सैन्यासाठी पैसेचं नाही..

भारतीय सैन्याकडे निधींची कमतरता असल्याने सैन्यातील अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग आणि टूरसाठी देण्यात येणाऱ्या भत्ते थांबविण्यात आल्याची माहिती आहे.मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी सर्वाधिक निधी दिला. संरक्षण खात्याला 3 लाख कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या २०१८ च्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी मोदी सरकारने सुमारे २ लाख ९५ हजार कोटींची भरीव तरतुद केली होती. ही रक्कम बजेटच्या एकूण रकमेच्या सुमारे १२.१० टक्के इतकी होती. मात्र, एका वर्तमानपत्रातील…
Read More...

Budget 2019: मोदी सरकारची शेतकऱ्यांना निरर्थक मदत; खात्यात फक्त ६ हजार जमा

केंद्रातील मोदी सरकार आज अंतरिम बजेट (Interim Budget 2019) सादर झाले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत असल्याने त्यांच्या ऐवजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर बजेटची जबाबदारी दिली होती.मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा बजेट आज सादर करण्यात आला. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी बजेट सादर केला. पियुष गोयल यांनी सकाळी ११ वाजता बजेट मांडण्यास सुरुवात केली. पाच लाख रुपयांपर्यंत करमुक्ती आणि शेतकऱ्यांना महिन्याला ५०० ते ६०० रुपये थेट बँक खात्यात, हे दोन या बजेटं वैशिष्ट्य राहिले.या…
Read More...

Budget 2019: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खात्यात दरवर्षी ६ हजार जमा

केंद्रातील मोदी सरकार आज आपलं अंतरिम बजेट (Interim Budget 2019) सादर करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत असल्याने त्यांच्या ऐवजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर बजेटची जबाबदारी आहे.पियुष गोयल यांनी सकाळी ११ वाजता बजेट मांडण्यास सुरुवात केली. त्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाची बजेटला मंजुरी मिळाली.  मग राष्ट्रपतींच्या सहीने या बजेटला हिरवा कंदील मिळाला. हे बजेट देशाला वैभवाकडे नेणारं आहे, ‘कमरतोड’ महागाईची कंबर तोडली, असं म्हणत पियुष गोयल यांनी बजेट सादर करण्यास सुरुवात केली.…
Read More...

‘अबकी बार ४०० के पार’

‘अबकी बार मोदी सरकार’ घोषणा देत सत्तेवर आलेल्या भाजपाने यावेळी ‘अबकी बार ४०० के पार’ ही नवी घोषणा तयार केली आहे. भाजपाने यावेळी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत एनडीएने ३३६ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये एकट्या भाजपाने २८२ जागांवर विजय मिळवला होता.भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी ४०० जागांचं टार्गेट ठेवलं आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाने नरेंद्र मोदींना एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करत ‘अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा दिली होती. माझे बाबा… आभाळमाया…
Read More...

सवर्ण आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

दहा टक्के सवर्ण आरक्षणावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सवर्ण आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयानं आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र सवर्ण आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे सवर्ण आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.मुख्यन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने १० टक्के सवर्ण…
Read More...

मोदी सरकारचे #5YearChallange पाहिलंत का ?

सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या #10yearchallange च्या धर्तीवर भाजपकडून #5yearchallenge ही नवी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहीमेच्या माध्यमातून भाजपने यूपीए सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्यांकडून #5yearchallenge हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर फोटो व मजकूर ट्विट केला जात आहेगेल्या पाच वर्षांमध्ये देशात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा, गावांपर्यंत वीज पोहोचवणे, शेतमालाच्या हमीभावातील वाढ, परकीय गुंतवणुकीचा वाढलेला ओघ, रस्ते उभारणी, गॅस कनेक्शन अशा विविध क्षेत्रांतील प्रगतीचा…
Read More...

‘मोदी सरकार आणखी काही चांगले काही करु शकेल असं वाटत नाही’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारकडून काहीही चांगलं घडेल अशी अपेक्षाच जनतेला उरलेली नाही असे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. येत्या साठ दिवसात हे सरकार आणखी काही चांगले काही करु शकेल असेही वाटत नाही. देशाची अर्थव्यवस्था मोदी सरकारमुळे धोक्यात आली आहे अशीही टीका पी चिदंबरम यांनी केली. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे.तीन दिवसांपूर्वीच पी चिदंबरम यांनी मोदी सरकारला पराभवाची चाहूल लागल्याचे म्हटले आहे. भाजपा सरकार आता पैसे खर्च करण्याच्या…
Read More...