यवतमाळ – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Sat, 18 May 2019 05:52:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.2.1 https://inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1-32x32.jpg यवतमाळ – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 148314367 यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल https://inshortsmarathi.com/fraud-case-registered-against-17-including-madan-yerawar-yavatmal/ Sat, 18 May 2019 05:52:46 +0000 https://inshortsmarathi.com/?p=67283

बनावट कागदपत्र तयार करुन भूखंड बळकावल्याप्रकरणी यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 11 कोटी रुपये किंमतीच्या वादग्रस्त भूखंड खरेदी-विक्री प्रकरणात हा गुन्हा नोंदविला गेला. आयुषी किरण देशमुख यांनी या प्रकरणी आधी पोलिसात फिर्याद दिली. परंतु राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हा नोंदविणे टाळल्याचा त्यांचा आरोप आहे. म्हणून आयुषी यांना न्यायालयात धाव […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल InShorts Marathi.

]]>

बनावट कागदपत्र तयार करुन भूखंड बळकावल्याप्रकरणी यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 11 कोटी रुपये किंमतीच्या वादग्रस्त भूखंड खरेदी-विक्री प्रकरणात हा गुन्हा नोंदविला गेला.

आयुषी किरण देशमुख यांनी या प्रकरणी आधी पोलिसात फिर्याद दिली. परंतु राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हा नोंदविणे टाळल्याचा त्यांचा आरोप आहे. म्हणून आयुषी यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली.

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे हे यात प्रमुख आरोपी आहेत. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 156 (3) अन्वये प्रकरण न्यायालयात आल्यास सहसा न्यायालय पोलिसांना प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देते. परंतु 11 कोटी रुपये किंमतीच्या 9241 चौरस फूट जागेच्या या प्रकरणात थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल InShorts Marathi.

]]>
67283
महाराष्ट्रातही पावसाचे थैमान; यवतमाळमध्ये ९०० घरांची पडझड https://inshortsmarathi.com/yavatmal-rain/ Sat, 18 Aug 2018 17:30:37 +0000 https://inshortsmarathi.com/mt/?p=46342 rain in yavatmal

यवतमाळ – महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला येथेही गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे थैमान सुरूच आहे. यवतमाळ येथे पावसामुळे तब्बल 900 घरांची पडझड झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर गोंदियालाही चक्रीवादळाने झोडपले आहे. गोंदियातील देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथे तब्बल 30 घरांचा काही भाग अणि छत चक्रीवादळामुळे कोसळले. छत कोसळल्याने एका बैलाचा मृत्यू झाला तर […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्रातही पावसाचे थैमान; यवतमाळमध्ये ९०० घरांची पडझड InShorts Marathi.

]]>
rain in yavatmal

यवतमाळ – महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला येथेही गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे थैमान सुरूच आहे. यवतमाळ येथे पावसामुळे तब्बल 900 घरांची पडझड झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर गोंदियालाही चक्रीवादळाने झोडपले आहे. गोंदियातील देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथे तब्बल 30 घरांचा काही भाग अणि छत चक्रीवादळामुळे कोसळले. छत कोसळल्याने एका बैलाचा मृत्यू झाला तर काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्रातही पावसाचे थैमान; यवतमाळमध्ये ९०० घरांची पडझड InShorts Marathi.

]]>
46342
अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज : चंद्रकांत पाटील https://inshortsmarathi.com/prepare-the-mechanism-to-combat-heavy-rain-and-natural-disaster/ Wed, 11 Jul 2018 10:56:00 +0000 https://maharashtradesha.com/?p=40589

नागपूर : राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 9 जुलै या कालावधीत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मुंबई व मुंबई उपनगर वगळता राज्यात आज अखेरपर्यंत 390 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 189 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 1 जून ते 9 जुलै 2018 अखेर […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज : चंद्रकांत पाटील InShorts Marathi.

]]>

नागपूर : राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 9 जुलै या कालावधीत सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मुंबई व मुंबई उपनगर वगळता राज्यात आज अखेरपर्यंत 390 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 189 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 1 जून ते 9 जुलै 2018 अखेर राज्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी मंत्रालय नियंत्रण कक्ष तसेच सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, कोस्टगार्ड, नागरी संरक्षण दले, भारतीय सेना, विविध महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आवश्यकतेप्रमाणे आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

पाटील यावेळी म्हणाले, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यात 66 ठिकाणी पाणी साचले होते. अशा ठिकाणी 152 पंपाद्वारे पाणी उपसा करण्यात आलेला आहे. 15 बस मार्ग बदलून इतरत्र वळविण्यात आले. वसई येथे राजावली, तिवरी, सातीवली व मिठागर परिसरात पाणी साठल्याने अंदाजे 300 लोकांना पाण्याचा वेढा पडला होता. तेथील नागरिकांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी पाठविण्यात आली असून त्यांच्याकडून अंदाजे 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्याप्रमाणे विरार व नालासोपारा येथे बडोदा एक्सप्रेस तसेच शताब्दी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रूळावर पाणी साचल्याने उभ्या आहेत. या रेल्वेतील प्रवाशांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व स्थानिक प्रशासनामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत अंदाजे 700 प्रवाशांना रेल्वेमधून बाहेर काढण्यात आले आहे. या प्रवाशांची स्थानिक वाहतूक करण्याची वसई-विरार महानगरपालिका, राज्य परिवहन मंडळ व खासगी बसेसमार्फत सोय करण्यात आली आहे. वसई येथे मिठागर परिसर आणि रेल्वेतील अडकलेल्या प्रवाशांसाठी स्थानिक प्रशासनामार्फत खाद्यपदार्थ पुरविण्यात येत आहेत.

राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, नागपूर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, अहमदनगर, सातारा, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात 1 जून ते 9 जुलै या कालावधीत त्या त्या जिल्ह्यातील सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उर्वरित नाशिक (64.5 टक्केस) धुळे (95.1 टक्कें), नंदूरबार (66.6 टक्केव), जळगाव (78.6 टक्के5) पुणे, कोल्हापूर (70.9 टक्केि), औरंगाबाद (69.2 टक्केु), जालना (78.1 टक्के) बीड (86.5 टक्केव), उस्मानाबाद (98.4 टक्केर) (78.1 टक्के ), बुलढाणा (62.5 टक्केव), गोंदीया (91.3 टक्केक), सोलापूर(61.3 टक्केण) या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळता राज्याचा आज अखेर पाऊस 390.4 मि.मि. एवढी नोंद झाली आहे.

राज्यातील एकूण तालुक्यांपैकी 189 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त, 92 तालुक्यात 75-100 टक्के, 59 तालुक्यात 50-75 टक्के व 13 तालुक्यात 25-50 टक्के पाऊस पडला आहे. सरासरीच्या 25 ते 50 टक्के0 पाउस पडलेले 13 तालुके बुलढाणा (जळगाव-जामोद, संग्रामपूर, नांदुरा, देउळगावराजा, सिंदखेडराजा), जळगाव (जळगाव), जालना (जाफराबाद) औरंगाबाद (खुलताबाद), सांगली (तासगाव), सोलापूर (दक्षिण सोलापूर, पंढरपूर, सांगोला, करमाळा) या जिल्ह्यातील आहेत.

राज्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण 62 व्यक्तींचा बुडून, वीज पडून इत्यादींमुळे मृत्यू झाला असून 63 जनावरे दगावली आहेत. उत्तर व दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांना विविध माध्यमातून पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत, काही ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले व वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्याची दक्षता घेण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागपूर, पालघर, मुंबई व पुणे येथे अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी “राष्ट्रीय आपत्ती व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचा” वापर करण्यात आला. वसई येथील चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना सोडविण्यासाठी वायूदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे बाधित व्यक्तींना नियमानुसार शासकीय मदत देण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावर करण्यात येत आहे.

मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा, पालघर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असून सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत मुंबई शहर येथे 74.23 मि.मि. व मुंबई उपनगर जिल्ह्यात 47.53 मि.मि. पाउस झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई व पालघर येथे दुपारी चार वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत अनुक्रमे 248.7 मि.मि. व पालघर येथे 199.2 मि.मि. इतका पाऊस पडला असून सध्याही पाऊस सुरु आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस व तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजाची माहिती सोबत जोडली आहे.

पावसामुळे उद्भवणा-या आपत्तीजन्य परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी मंत्रालय नियंत्रण कक्ष व सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, कोस्टगार्ड, नागरी संरक्षण दले, भारतीय सेना, विविध महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आवश्यकतेप्रमाणे आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे पाटील यांनी सांगितले.

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज : चंद्रकांत पाटील InShorts Marathi.

]]>
40589
दुष्काळावर मात करत पार पडले ‘पिप्सी’ चे शुटींग’ https://inshortsmarathi.com/shooting-of-peepsi-overcoming-drought/ Wed, 04 Jul 2018 12:48:56 +0000 https://maharashtradesha.com/?p=39458

टीम महाराष्ट्र देशा : ‘अ बॉटल फूल ऑफ होप’ अशी टॅगलाईन असणारा ‘पिप्सी’ हा आशयघन सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाचे सौरभ भावे यांनी लिखाण केले आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ हा सिनेमा महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर आधारित आहे. त्यामुळे, सिनेमा वास्तवदर्शी होण्यासाठी ‘पिप्सी’ […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दुष्काळावर मात करत पार पडले ‘पिप्सी’ चे शुटींग’ InShorts Marathi.

]]>

टीम महाराष्ट्र देशा : ‘अ बॉटल फूल ऑफ होप’ अशी टॅगलाईन असणारा ‘पिप्सी’ हा आशयघन सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाचे सौरभ भावे यांनी लिखाण केले आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ हा सिनेमा महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर आधारित आहे. त्यामुळे, सिनेमा वास्तवदर्शी होण्यासाठी ‘पिप्सी’ सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भात करण्यात आले आहे. यवतमाळ येथील अरणी तालुक्यात एन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण झाले असल्यामुळे, चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण युनिटला दुष्काळाचा तडाका सोसावा लागला होता.

पाण्याची कमतरता, चाहुबाजूस केवळ सुकलेले रान आणि ३५ डिगरीहून अधिक तापमान असणाऱ्या या भागात बालकलाकारांसोबत चित्रीकरण करणे आव्हानास्पद होते. कारण प्रचंड उन्हामुळे मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशीच्या घशाला चित्रीकरणादरम्यान सतत कोरड पडत होती. तसेच अतिउष्णतेमुळे त्यांची तब्येतदेखील बिघडण्याची दाट शक्यता होती. मात्र, या दोघांनी या खडतर वातावरणाचा परिणाम आपल्या कामावर पडू न देता, आपापला अभिनय चोख बजावला.

विशेष म्हणजे, त्यानंतर पार पडलेल्या ५५ व्या राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘पिप्सी’ सिनेमातील भूमिकेसाठी मैथिलीला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारदेखील देण्यात आला. शिवाय साहिल जोशी यानेदेखील ‘रिंगण’ सिनेमासाठी २०१६ सालच्या ५३ व्या राज्यपुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा सन्मान मिळवला असल्यामुळे, ‘पिप्सी’ सिनेमातील त्याच्या कसदार अभिनयावर दुष्काळी वातावरणाचा तसूभरही परिणाम झाला नाही. अश्याप्रकारे राज्यपुरस्कार विजेते असलेल्या दोन बालकलाकारांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना दर्जेदार अभिनयाची अनुभूती देणारा ठरणार आहे. लहान मुलांच्या निरागस डोळ्यातून सादर होत असलेली ‘पिप्सी’ ची ही बाटली प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच वास्तविकतेकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोनदेखील देऊन जाणार आहे, हे निश्चित !

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरच्या विळख्यात…

‘प्रभो शिवाजी राजा’ या अॅनिमेशनपटातून दिसणार महाराजांचे शिवचरित्र

आरोग्य मंत्रा : तुळशीचे गुणधर्म

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दुष्काळावर मात करत पार पडले ‘पिप्सी’ चे शुटींग’ InShorts Marathi.

]]>
39458
तलाठ्यांच्या हस्तलिखित सहीचा सातबाराही शासकीय कामांसाठी ग्राह्य https://inshortsmarathi.com/handwritten-signature-of-also-available-for-government-work/ Wed, 06 Jun 2018 09:02:18 +0000 https://maharashtradesha.com/?p=36423

मुंबई  : सातबारा उतारा हा डिजिटल स्वाक्षरीबरोबरच तलाठ्याने संगणकीकृत उताऱ्यावर पारंपरिक पद्धतीने स्वाक्षरी करून देण्याची पद्धती सुरूच राहणार आहे. त्यामुळे तलाठ्यांच्या सहीचे सर्व संगणकीकृत सातबारा उतारे, फेरफार व गाव नमुना आठ अ (खातेउतारा) हे उतारे शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे. डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तलाठ्यांच्या हस्तलिखित सहीचा सातबाराही शासकीय कामांसाठी ग्राह्य InShorts Marathi.

]]>

मुंबई  : सातबारा उतारा हा डिजिटल स्वाक्षरीबरोबरच तलाठ्याने संगणकीकृत उताऱ्यावर पारंपरिक पद्धतीने स्वाक्षरी करून देण्याची पद्धती सुरूच राहणार आहे. त्यामुळे तलाठ्यांच्या सहीचे सर्व संगणकीकृत सातबारा उतारे, फेरफार व गाव नमुना आठ अ (खातेउतारा) हे उतारे शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे.

डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा वितरित करण्याची एक अतिरिक्त सुविधा दि १ मे २०१८ पासून उपलब्ध केली आहे. त्याचबरोबरच तलाठ्याने संगणकीकृत सातबारा पारंपरिक पद्धतीने स्वाक्षरी करून देण्याची पद्धती सुरूच आहे. आज अखेरपर्यंत ४० लाख सात बारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले असून उर्वरित उताऱ्यांचे काम टप्याटप्याने प्रगतीपथावर आहे. तसेच शासनाने यापुढे फक्त डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा उतारे स्वीकारण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तलाठ्यायाने संगणकीकृत सातबारावर शिक्का मारुन आणि सही करुन दिल्यास बोगस कागदपत्र दिल्याचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कोणताही तोंडी अथवा लेखी आदेश शासनाने दिलेले नाही. सद्यस्थितीत सर्व संगणकीकृत सातबारा, फेरफार व गाव नमुना आठ अ (खातेउतारा) तलाठी यांच्या हस्तलिखित स्वाक्षरीने वितरित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. असे सातबारा उतारे सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

मागील आठवड्यात काही दिवस ई-फेरफार प्रकल्पाच्या मुख्य सर्व्हर (Monitor Server) मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यातील २९ जिल्ह्यामधील संगणकीकृत सातबाराबाबतचे कामकाज बाधित झाले होते. तथापि त्यापैकी औरंगाबाद, नांदेड, नंदूरबार, परभणी व यवतमाळ हे जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांचे सर्व्हर दि ०१ जून २०१८ रोजी सुरु करण्यात आले आहेत. वरील जिल्ह्यांचे सर्व्हर देखील दि. ३ जून २०१८ रोजी सुरु केले आहेत. तथापि सर्व सर्व्हर पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची कार्यवाही माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून सुरु आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्तांनी दिली आहे.

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तलाठ्यांच्या हस्तलिखित सहीचा सातबाराही शासकीय कामांसाठी ग्राह्य InShorts Marathi.

]]>
36423
यवतमाळच्या शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच https://inshortsmarathi.com/the-series-of-trouble-on-farmers-is-already-going-on/ Tue, 13 Feb 2018 12:29:51 +0000 http://maharashtradesha.com/?p=24619

यवतमाळ / संदेश कान्हु : यवतमाळ जिल्हा हा व्हाइट सिटी म्हणून ओळखला जात होता मात्र कांही वर्षात ही ओळख पुसल्याजाऊन यवतमाळ जिल्ह्यची नवी ओळख महाराष्ट्र भर झाली आहे ती म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्य. एकेकाळी समृद्ध असलेल्या याच जिल्ह्यत आजवर अनेक शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारी पना आसमानी व सुलतानी संकटामुळे आत्महत्या केली. आत्महत्येच्या सुरुअसलेल्या या सत्रामुळे अनेक […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. यवतमाळच्या शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच InShorts Marathi.

]]>

यवतमाळ / संदेश कान्हु : यवतमाळ जिल्हा हा व्हाइट सिटी म्हणून ओळखला जात होता मात्र कांही वर्षात ही ओळख पुसल्याजाऊन यवतमाळ जिल्ह्यची नवी ओळख महाराष्ट्र भर झाली आहे ती म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्य. एकेकाळी समृद्ध असलेल्या याच जिल्ह्यत आजवर अनेक शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारी पना आसमानी व सुलतानी संकटामुळे आत्महत्या केली. आत्महत्येच्या सुरुअसलेल्या या सत्रामुळे अनेक कुटुंब आज पोरके झाले आहेत. शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी अनेक प्रयत्न होतांना दिसतात मात्र नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांच्या पिच्छा काही सोडतांना दिसत नाही. त्यामुळेच यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातिल अश्रु अनावर झालेत.

खरीप हंगामातील कापूस पिकांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. हजारो हेक्टर वरील कापूस पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च सुद्धा निघु शकला नाही. याच बोंडअळीचा प्रदुर्भाव होऊ नये म्हणून ख़बरदारिचा उपाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कपाशीवर किटकनाशक फवारणी केली मात्र अडानी शेतकरी राजाने योग्य पद्धतीने फवारणी न केल्यामुळे त्यास आपल्या जीवाशी मुकावे लागले. यवतमाळ जिल्ह्यत तब्बल 28 शेतकरी तसेच शेतमजूराणां किटकनाशक फवारणीमुळे आपले जीव गमवावे लागले. शेतकरी हा राब राब राबतो काबाड़ कष्ट करतो आणि परिस्थितिशी झगड़तो मात्र सातत्याने होणाऱ्या नैसर्गिक आघातांमुळे माझा शेतकरी राजा खचून गेला आहे.

खरीप पिक गेले तर काय रब्बी पिकातुन समृद्धिचा मार्ग स्विकारु अशी आशा बाळगत माझा अन्नदाता सेप्टेंबर महिन्यात कामास लागला. चार महीने उलटले शेतात पिक हिरवेगार दिसूलागले आता मात्र चिंता दूर झाली असे भासु लागले. सर्वांचे कर्ज फेडु ताठ मानेने जगु असा विचार शेतकरी राजा करू लागला मात्र फेब्रुवारी महीना आला अन्न होत्याच न्हवत झांल. अन्नदात्यावर आसमानी संकट कोसळूण पडल. रात्रंदिवस लेकरा सारखे जपलेल्या पिकांवर गारांचा मारा झाला. ती गारही साधीसूधी न्हवती टपुरी ग़ार व वादली वाऱ्यांने कष्टकरी शेतकऱ्यांच्या पिकांना झोपवून नष्ट केले नाहीत तर अन्नदात्याचे स्वप्न भंग केलेत. शेतकरी विनवनी करतो तेव्हा हा पाउस पाठ फिरवतो मात्र नको त्या वेळेस येऊन थैमान घालतो. शेतकरी जगला तर देश जगेल अन्यथा सर्वत्र हाहाकार मजेल. कर्म चांगले असेल तर फळ निश्चितच चांगले मिळते अशे एकिवात आहे मात्र इतरांचे पोट जगवणाऱ्या माझ्या शेतकरी राजास त्यांच्या फळा पासून वंचित का राहाव लागतय हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. यवतमाळच्या शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच InShorts Marathi.

]]>
24619