InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

याचिका

खासदार नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीलाचं आव्हान

नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीलाच आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नवनीत राणा यांच्या विरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणी सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. मात्र नवनीत कौर यांनी लुभाणा समुदायाच्या आरक्षणातून निवडणुकीसाठी अर्ज भरला होता आणि त्या विजयी झाल्या असं याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.…
Read More...

इम्तियाज जलील निवडीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल

एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील अडचणीत येण्याची शक्यता आहे. जलील यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. धर्माच्या नावावर मते मागितल्यामुळे इम्तियाज जलील यांचे सदस्यत्व रद्द करण्याची आणि त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.धर्माच्या नावावर मते मागणे, प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्ह्याची कलमे लपवणे आणि खर्चाचा हिशोब न मांडणे या कारणावरून याचिका दाखल झाली. शेख नदीम शेख करीम या लोकसभेतील पराभूत…
Read More...

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करा’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 23 जुलैला अंतिम सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी आरोप अ‍ॅड. सतीश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.२०१४ मध्ये फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. हे दोन्ही गुन्हे नागपूरमधील असून त्यातील एक…
Read More...

Budget 2019: अंतरिम बजेटविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेत शुक्रवारी १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. २०१९-२० मधील आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्याच्या काही तासानंतर, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.अॅडव्होकेट मनोहरलाल शर्मा यांनी बजेटविरोधात याचिका दाखल केली आहे. संविधानात अंतरिम बजेटसारखं कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे हे बजेट रद्द करा, अशी मागणी अॅडव्होकेट मनोहरलाल शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात केली.याचिकाकर्त्यांच्या मते, संविधानात केवळ पूर्ण बजेट आणि लेखानुदान ताळेबंद सादर…
Read More...

वेबसिरीजचे ‘सेन्सॉर’ आवश्‍यक; न्यायालयात याचिका

नेटफ्लिक्‍स, युट्यूबसारख्या वेबसाइट्‌सवर अश्‍लील दृश्‍ये व संवादांचा समावेश असलेल्या वेबसिरीज सर्रासपणे दाखविल्या जात आहेत. यामुळे समाजमनावर वाईट परिणाम होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचा मुद्दा जनहित याचिकेद्वारा उपस्थित केला आहे. ॲड. दिव्या गोंटिया यांनी ही याचिका दाखल केली आहे.वेब सिरियल्समुळे भारतीय संस्कृती व नैतिकतेची ऐशीतैशी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. वेब सिरीजना पारंपरिक माध्यमांप्रमाणे कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे लागू नाहीत. त्यामुळे नेटफ्लिक्‍स, एएलटी बालाजी,…
Read More...

राफेल करार रद्द करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नवी दिल्ली: भारतीय राजकारणात सध्या राफेल विमान खरेदीचा मुद्दा अतिशय गाजताना दिसत आहे. राफेल डीलमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं सातत्यानं केला आहे. राजकारणात गाजणारा हा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. राफेल करार रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Read More...

आरोपीतर्फे अन्य लोकांना याचिका करता येणार नाही – महाराष्ट्र सरकार

नवी दिल्ली : एल्गार परिषदेच्या निमित्तानं देशात अराजक पसरवण्याचा कट रचल्याप्रकरणी स्थानबद्ध करण्यात आलेल्या पाच जणांच्या समर्थनात दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र  सरकारानं आपली बाजू  मांडली. ज्यांना ताब्यात घेतले आहेत ते आरोपी असून  आरोपीतर्फे अन्य लोकांना याचिका करता येत नसल्याचा मुद्दा महाराष्ट्र सरकारने न्यायालयात मांडला आहे. 'एल्गार परिषद' संदर्भात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींविरोधात आकसबुद्धीनं कारवाई केली गेलेली नसून ते सरकारनं बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचे…
Read More...