InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

लोकसभा निवडणूक

2019 लोकसभा निवडणुकीतल्या पराभवासाठी मी जबाबदार आहे – राहुल गांधी

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्याच्या जवळपास दोन महिन्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे.या आधीही त्यांनी अनेकदा राजीनामा देण्याची शिफारस केली होती. मात्र काँग्रेस नेत्यांनी एकमुखाने त्याला नकार दिला होता. आज मात्र राहुल गांधीनी राजीनामा देत राजीनाम्याचं पत्र ट्विटरवर टाकलं आहे.https://twitter.com/RahulGandhi/status/1146359704815194112आपल्या राजीनाम्यात राहुल गांधी म्हणाले, " आपली मूल्यं आणि आदर्शांच्या माध्यमातून या सुंदर देशाची सेवा करणाऱ्या काँग्रेस…
Read More...

स्वाभिमानीचे डझनभर कार्यकर्ते आता सदाभाऊंच्या गोटात….

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांचे नेते-कार्यकर्ते आता सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेकडे आकर्षित होत आहेत. जवळजवळ डजनभर कार्यकर्त्यांनी रयत क्रांतीची वाट धरल्यामुळे स्वाभिमानीची ऐन निवडणुकीच्या तोंंडावर तारांबळ उडण्याची शक्यता आहे.राजू शेट्टी लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर आता त्यांना या  पक्षांतर्गत फूटीचा सामना करावा लागतोय. पक्षांतर्गत दबाव, जातीयवादाला कंटाळून हे पक्षप्रवेश होत असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, राज्यकार्यकारणी सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा…
Read More...

अडवाणी, वाजपेयींच्या पावलावर फडणवीसांचे पाऊल; मतदारसंघात रथयात्रा काढणार

काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी रथयात्रा काढत.  आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे.  विधानसभा निवडणुकीच्या आधी फडणवीस राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये रथयात्रा काढणार आहेत.विधानसभेच्या २८८जागांवर पुढील काही महिन्यांत निवडणूक होणार आहे. शेतकरी कर्जमाफी, दुष्काळी उपाययोजना आणि मदत, जलसिंचन प्रकल्प, शेततळी, विहीरी आदींचे काम यामध्ये मांडले जाणार आहे.विधानसभेच्या निवडणुकीला…
Read More...

लालू यादवांच्या पक्षातील लोकांना टिव्हीवर येण्यास मज्जाव

लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने देखील आपल्या प्रवक्त्यांची यादी रद्द केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलाने देखील आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील चर्चांमध्ये सामील होण्यास मज्जाव केला आहे.टिव्हीवर जाण्यास मज्जाव केल्यानंतरही राजद नेता, प्रवक्ता, आमदार किंवा खासदार टिव्हीवरील चर्चेत सामील झाल्यास तो राजदलचा विचार मानला जाणार नाही, अशी सूचना राष्ट्रीय जनता दलाचे प्रधान महासचिव आलोक कुमार मेहता यांनी लालू यादव आणि तेजस्वी यादव यांच्या आदेशावरून दिली आहे.…
Read More...

संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला सर्वाधिक 352 जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधा मानावे लागले. यंदाचा निकाल अनेक अर्थाने विक्रमी ठरला आहे. यंदाच्या लोकसभेत सर्वाधिक महिला विजयी झाल्या आहे.यंदा 78 महिला खासदार संसदेत जाणार आहेत. महिला खासदारांमध्ये भाजपा, तृणमूल, बीजू जनता दल या पक्षांमधल्या महिला उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.१९५२ मध्ये महिला खासदार निवडून येण्याचं प्रमाण सर्वात कमी होतं. सोनिया गांधी, हेमा मालिनी, किरण खेर, साध्वी प्रज्ञासिंह या महिला खासदार…
Read More...

राहुल गांधींकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, मात्र…

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप काँग्रेस कार्यकारिणीने हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही.दिल्लीत सुरु असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी राजीनामा देतील अशी चर्चा सुरू होती. मात्र अनेक काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये असे मत व्यक्त केले होते.महत्त्वाच्या बातम्या –मोदींनी दिला…
Read More...

शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी ‘यांना’ मिळू शकते संधी

लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप युतीला मोठे यश मिळाले. भाजपचा 23 जागांवर तर शिवसेनेचा 18 जागांवर विजय झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 30 मेला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच बरोबर एनडीएच्या मंत्र्यांची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपप्रणित एनडीएच्या खासदारांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.उद्धव ठाकरे या बैठकीदरम्यान पाच मंत्रीपदं मागणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी राज्यसभा खासदार अनिल देसाई, कोल्हापूरचे…
Read More...

मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, 30 मे रोजी शपथविधी सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना 16 वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे काल आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.यंदाच्या लोकसबा निवडणुकीत भाजप अभुतपुर्व यश मिळाले आहे. भाजपने यंदा 303 जागांवर विजय मिळवला आहे.पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. बैठकीत १६ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅबिनेटची शिफारस राष्ट्रपतींना पाठवण्यात आली, त्या आधारावर १६ वी लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याची…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या गुजरातला जाणार

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभुतपुर्व यशानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आईचा आशिर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करत दिली.तसेच आईची भेट घेतल्यानंतर नरेंद्र मोदी हे वाराणसीच्या जनतेचे आभार  मानण्यासाठी परवा काशीला जाणार आहेत.नरेंद्र मोदींनी ट्विट केले की, 'आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. त्यानंतर माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी परवा सकाळी काशीला जाणार आहे.'…
Read More...

…नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत जाईल – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 83 हजार मते मिळाली होती. मला ही मते मराठा समाजाची मिळाली असल्याचे हर्षवर्धन जाधव म्हणाले.तसेच मराठा आरक्षणाचा कायदा केंद्रात पास केला नाहीतर मराठा समाज विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी सोबत जाईल, असे मत देखील हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.हर्षवर्धन जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणावरून वंचित आघाडी सोबत जावं ही मागणी मला तळागाळातुन येत आहे. यासाठी भाजप- शिवसेना…
Read More...