InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

विधानसभा निवडणुक

कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिवसेना नाराज

भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतील अमित शाहांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावरुन शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भाजपच्या कोअर कमिटीच्या दिल्ली बैठकीत राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर यावेळी चर्चा झाली. विधानसभेसाठी शिवसेनेसोबत युती राहणार पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच हवा असं वक्तव्य अमित शहांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे,…
Read More...

निवडणूकीसाठी शेतकऱ्यांना मोफत वीजेचे गाजर?

विधानसभा निवडणूका काही महिन्यावरच येऊन ठेपलेल्या आहेत. विधानसभा निवडणूका लक्षात घेता शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची थकबाकी २२ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली असून दुष्काळामुळे वीजबिल वसुली ठप्प झाली आहे. त्यामुळे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा उचलून मोफत वीज पुरविल्यास विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत विचारता आणखी आर्थिक सवलत देऊन पुन्हा कृषी संजीवनी योजना…
Read More...

भाजपचे ४५ आमदार पुढची निवडणूक हरण्याची शक्यता; भाजपच्या गुप्त सर्वेक्षणाचा अहवाल

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसेल, असा अहवाल भाजपच्या गुप्त सर्वेक्षणात समोर आला आहे. भाजपाच्या ४० टक्के म्हणजे ४५ आमदारांची चार वर्षातील कामगिरी खराब असून त्यांचे पुन्हा निवडून येणे कठीण असल्याचे अहवालात नमूद केले आहे. भाजप सरकारने दिल्लीतील 'चाणक्य' या संस्थेकडून गुप्तपणे सर्वेक्षण करुन घेतले होते.चाणक्यने केलेल्या सर्वेक्षणात ४५ आमदार आणि ६ खासदारांचे पुढच्या निवडणुकीत निवडून येणे कठीण असल्याची माहिती सर्वेक्षणात पुढे आली आहे. सर्वेक्षणाचा अहवाल भाजपाच्या आमदार…
Read More...

पराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, अशोक चव्हाणांची मोठी घोषणा

मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोट येथे केली. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान स्थानिक खरेदी-विक्री मैदानात सभा पार पडली. त्यावेळी चव्हाण बोलत होते.आगामी निवडणुकांमधील रणनीती संदर्भात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, की केंद्रात व राज्यात भाजप-सेनेचे सरकार आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. जनतेची फसवणूक केली. या…
Read More...