InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

विधानसभा

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच समविचारी पक्षांना एकत्र सोबत घेऊ

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा निर्णय  कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या  बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी समविचारी पक्षाच्या नेत्यांना आघाडीच्यावतीने पत्र दिले जाणार आहे. पत्राला प्रितसाद मिळाल्यानंतर छोट्या पक्षांशी चर्चा करावी, असेही बैठकीत ठरले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…
Read More...

राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील-गिरीश महाजन

राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील. सप्टेंबरमध्ये आदर्श आचारसंहिता लागू शकते, असे भाकित फडणवीस सरकारमधील संकटमोचन समजले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवले आहे. नाशिक येथे रविवारी (14 जुलै) झालेल्या नियोजन बैठकीत गिरीश महाजन यांनी सर्वांचेच लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात हे भाकित वर्तवले आहे.लोकसभा निवडणुकीमुळे होऊ न शकलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.…
Read More...

इच्छुक उमेदवारांच्या वंचित बहुजन आघाडी घेणार आजपासून मुलाखती

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी केली जात आहे. पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील पक्षांमध्ये हालचाली सुरू आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचे वृत्त आहे. 288 जागांसाठी इच्छुक उमेदवारांना बोलवले असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वाढली आहे.288 जागांची तयारी करत असलेल्या वंचित आघाडीमुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडी…
Read More...

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे २०० जागांवर एकमत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास २०० जागांवर एकमत झाले आहे. पुढील चर्चा करण्यासाठी येत्या १६ जुलै रोजी मुंबईत दोन्ही पक्षनेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, तर राष्ट्रवादीकडून विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची उपस्थिती असेल.तेवढ्याच जागा…
Read More...

सदाभाऊ खोत विधानसभा निवडणुकीतही भाजपसोबतच जाणार?

विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांची नाकेबंदी करण्याची रणनीती भाजपने लोकसभा निवडणुकीत आखली होती. त्यासाठी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या लोकसभेच्या अनेक जागाही भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या. आता विधानसभा निवडणुकीतही भाजप याच पॅटर्नचा अवलंब करणार असल्याचं दिसत आहे.सांगली जिल्ह्याती इस्लामपूर या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चांगली पकड आहे. याच मतदारसंघातून ते आता आमदारही आहेत. पण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला…
Read More...

कर्जतची लढत रोहित पवार विरुद्ध सुजय विखे पाटील

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची चौथी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. जेमतेम दोन महिन्यांच्या तयारीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. परंतु, पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार संपूर्ण तयारीनिशी कर्जतमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.त्यांच्या तयारीवर भाजपकडून डावपेच आखण्यात येत असून नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांनी देखील भाजपचे राम शिंदे यांच्या विजयाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कर्जतची लढत रोहित पवार विरुद्ध सुजय…
Read More...

विधानसभा अध्यक्ष आमचा राजीनामा स्वीकारण्यास उशीर करत आहे

कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएसचे सरकार वाचविण्यासाठी दोन्ही पक्षांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हा राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. कर्नाटक सरकारच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचा राजीनामा स्वीकारण्यास उशीर करत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. विधानसभा अध्यक्ष संवेधानिक कर्तव्य पार पाडत नसल्याचा आरोप त्यांनी याचिकेद्वारे केला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी देणार आहे.राज्याचे मंत्री डीके शिवकुमार आणि…
Read More...

सुरेखा पुणेकर म्हणतात, ‘बिग बॉस झालं आता लढाई विधानसभेसाठी’

बिग बॉस मराठी सिझन 2 मधून सुरेखा पुणेकर बाहेर पडल्यानंतर एका न्यूज चॅनेलने खास बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी बिग बॉसच्या घरातील अनुभव सांगितले. बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरांना कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या? कोणत्या गोष्टी खटकल्या, अंतिम टप्प्यातील दावेदार कोण असेल अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे. मात्र बिग बॉस झालं आता लढाई विधानसभेसाठी असेल असं त्यांनी म्हटलं आहे.सुरेखाताई म्हणाल्या, 'माझा पुढचा बाणविधानसभेत लागलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. मी आज महाराष्ट्रसाठी एवढं केलं.…
Read More...

कर्नाटक विधानसभा अध्यक्षांकडून 14 आमदारांचे राजीनामे नामंजूर

कर्नाटकातील राजकीय ड्राम्याचा सस्पेंन्स आता आणखी वाढला आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी काँग्रेस – जेडीएसच्या 14 आमदारांचे राजीनामे नामंजूर केले आहेत. मी अध्यक्ष असल्यानं माझ्यावर जबाबदारी आहे. मला नियमानुसार काम करावे लागेल आणि मी योग्य तो निर्णय घेईन असं विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी म्हटलं आहे.विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे आता कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे. 2018मध्ये काँग्रेस – जेडीएसनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर अवघ्या 13 महिन्यात आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे…
Read More...