InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

वीज

भेंडवळ गावात वीज पडून एक महिला जागीच ठार

जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात वीज पडून एक महिला जागीच ठार झाली असून 3 महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. भेंडवळ या गावातील सरपंच भगवान जाधव यांच्या पत्नी कुसुम जाधव या वीज पडून मृत्युमुखी पडल्या. तर शेतात काम करणाऱ्या तीन महिलांना दुखापत झाली आहे. सरपंच भगवान जाधव यांच्या शेतात पेरणी सुरू असताना पाऊस सुरू झाला असता सर्व महिला व पुरुष हे झाडाखाली आडोसा घेण्याकरता गेले. दरम्यान, झाडावर वीज पडली. या घटनेत दोन पुरुष बचावले आहेत. घटनेनंतर ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली व…
Read More...

निवडणूकीसाठी शेतकऱ्यांना मोफत वीजेचे गाजर?

विधानसभा निवडणूका काही महिन्यावरच येऊन ठेपलेल्या आहेत. विधानसभा निवडणूका लक्षात घेता शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची थकबाकी २२ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली असून दुष्काळामुळे वीजबिल वसुली ठप्प झाली आहे. त्यामुळे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा उचलून मोफत वीज पुरविल्यास विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत विचारता आणखी आर्थिक सवलत देऊन पुन्हा कृषी संजीवनी योजना…
Read More...

‘सासरेबुवा (ऊर्जामंत्री), तुमची मुलगी नीट नांदत नाही’; चंद्रशेखर बावनकुळेंना एका…

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकलीने पत्र लिहिलं आहे. या पत्रातून भारनियमनाबाबत शेतकऱ्यांची व्यथा सांगितली आहे. ‘सासरेबुवा (ऊर्जामंत्री) तुम्ही दिलेली वीज नावाची मुलगी नीट नांदत नाही’, ‘वीज ही मुलगी सात वाजता जाते ते रात्री १२ वाजता येते’, कधी कधी जाते तर २-२ दिवस येतच नाही’, असं या पत्रात म्हटलं आहे. काय आहे पत्रात? प्रिय, सासरेबुवा ( ऊर्जामंत्री), तुम्ही दिलेली ‘वीज’ नावाची मुलगी नीट नांदत नाही, सातला गेली की रात्री बाराला येते आणि कधी बाराला…
Read More...

कॅपॅसिटर कृषी पंपाचा तारक, तर ऑटो स्विच मारक

वेब टीम- वीज आज माणसांच्या मुलभूत गरजांपैकी एक अत्यावश्यक गरज झाली आहे. शहरीकरणासोबतच विजेची मागणी झपाटयाने वाढत आहे. सोबतच आज ग्रामीण भागातील विद्युतीकरणासह कृषिपंपासाठी विजेची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पारंपरिक संसाधनाचा वापर करून उद्योग अथवा शेती करणे ओघाने कमी होत गेले. विजेचा वापर प्रत्येक जीवनावश्‌यक गोष्टीमध्ये होऊ लागला आहे. त्यामुळे साहजिकच वीज यंत्रणेवर कमालीचा भार वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील…
Read More...