InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

सेमीफायनल

‘अखेरपर्यंत टीम इंडियाने जी झुंज दिली, ते पाहून बरं वाटलं’; मोदींनी दिल्या टीम इंडियाला…

आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली. टीम इंडियाच्या पराभवावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली. हा परिणाम निराशाजनक आहे, मात्र, अखेरपर्यंत टीम इंडियाने जी झुंज दिली, ते पाहून बरं वाटलं, असं मोदी म्हणाले.https://twitter.com/narendramodi/status/1148959096831217665ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर काल (9 जुलै) न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या…
Read More...

‘धोनी देना साथ हमारा’; भारतीय चाहत्यांचे सोशल मीडियावर मीम्स

ICC Cricket World Cupच्या सेमीफायनलचा पहिला दिवस पावसामुळं रद्द झाला. दरम्यान आज न्यूझीलंडचा 46.1 षटकांपुढचा खेळ खेळण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडला तीन धक्के देत केवळ 28 धावा दिल्या. 50ओव्हरनंतर न्यूझीलंडला 239 धावा करता आल्या. या आव्हानांचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी अवघ्या 4 धावांत तंबूत परतली. त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी 46 धावांची भागिदारी केली. मात्र ऋषभ पंत आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर असाच काहिशी…
Read More...

IND vs NZ: मॅन्चेस्टरमध्ये आभाळ स्वच्छ, खेळाची आशा?

विश्वचषकातील उपांत्य सामना आज होणार का? सगळीकडे याच प्रश्नावर चर्चा होत आहे. रिझर्व्ह डेला भारत आणि न्यूझीलंडमधील उपांत्य सामन्याची क्रिकेट चाहते प्रतीक्षा करत आहेत. यादरम्यान मॅन्चेस्टरमधून हवामानाचे ताजे अपडेट्स आहेत की, तिथे आभाळ स्वच्छ आहे. रात्रीपासून तिथे पाऊस झालेला नाही. मात्र हवामान विभागाने अर्ध्या सामन्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. आज सामना सुरु झाला तर न्यूझीलंडचा संघ आपली उर्वरित षटकं पूर्ण खेळेल.भारत आणि न्यूझीलंडमध्ये मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानातील सामना…
Read More...

जर पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला तर भारताला मिळणार मोठ्ठं टार्गेट

पावसाचा सामन्यावर नेमका काय परीणाम होणार, याचा विचार आता सारे चाहते करत असतील. पण पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला तर भारतासाठी हे धोकादायक ठरू शकते. कारण भारताला यावेळी नोठे टार्गेट मिळू शकते, असे म्हटले जात आहे. जर पावसामुळे न्यूझीलंडचा डाव थांबवण्यात आला आणि ४६ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर भारताला २३७ धावांचे टार्गेट देण्यात येऊ शकते. त्यामुळे भारतासाठी हे धोकादायक ठरू शकते.आतापर्यंत न्यूझीलंडने 46.1 ओव्हर्समध्ये 211/5 धावा केल्या आहेत. याआधी न्यूझीलंडचा कर्णधार…
Read More...

World cup 2019: पावसामुळे सेमीफायनल सामना थांबला, न्यूझीलंड 46.1 ओव्हर्समध्ये 211/5

वर्ल्ड कपच्या सेमी फायनल लढतीत अखेर पावसाने हजेरी लावलीच आणि खेळाडू मैदानाबाहेर पडले. आतापर्यंत न्यूझीलंडने 46.1 ओव्हर्समध्ये 211/5 धावा केल्या आहेत. याआधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पण एकंदरच न्यूझीलंडचा रनरेट आतापर्यंत अत्यंत संथ आहे.कर्णधार विल्यमसनने संयमी आणि चिवट अर्धशतकी खेळी केली. अर्धशतकानंतर रनरेट वाढवण्यासाठी आक्रमक झालेल्या केनला युझवेंद्र चहलने बाद केलं. त्याने 6 चौकारांसह 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रॉस टेलरने अर्धशतकी खेळी केली.…
Read More...

India Vs New Zealand: न्यूझीलँडचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

ICC Cricket World Cupमध्ये आज सेमीफायनलमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी, हा सामना आजच होणार आहे. न्यूझीलंडनं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.पावसाचा लहरीपणा लक्षात घेता येथे कोणत्या कॉम्बिनेशनने मैदानावर उतरावे, याचे उत्तर शोधण्यात दोन्ही संघांचे कर्णधार व्यग्र आहेत. या सामन्यात भारतीय संघ भुवनेश्वर कुमार किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी कोणाची निवड करतील? टीम इंडिया दोन फिरकीपटूंसह मैदानावर उतरेल का? केदार जाधव हा सहावा गोलंदाजाचा पर्याय…
Read More...

रोहितचे शतक भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार – विराट

World Cup 2019 आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी भारत-न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा पहिला सामना होणार आहे. साखळी सामन्यात भारत-न्यूझीलंड यांच्यातील लढत पावासामुळं रद्द करण्यात आली होती. मॅंचेस्टरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळं चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.दरम्यान विराटनं सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत फलंदाजांचे आणि गोलंदाजांचे कौतुक केले. तसेच, "रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमधला सर्वात धडाकेबाज फलंदाज आहे", असे मत…
Read More...

‘भारताला विश्वविजेता होताना पाहायचंय’; शोएब अख्तरचा भारताला पाठिंबा

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विश्वचषकातील सेमीफायनलपूर्वी भारताला पाठिंबा जाहीर केलाय. हा विश्वचषक आशिया खंडात यावा यासाठी आपण पाठिंबा देत असल्याचं तो म्हणाला. न्युझीलंडला दबावात खेळता येत नाही आणि त्यामुळे ते जिंकणार नाहीत. खरं सांगायचं तर विश्वचषक आपल्या खंडात यावा आणि त्यामुळेच मी भारताला पाठिंबा देतोय, असं तो म्हणाला.२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पहिली फायनल टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पण या मॅचवर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना रद्द झाला तर कोणती टीम…
Read More...

World cup 2019: सेमी फायनलच्या वेळी पाऊस पडला तर ‘ही’ टीम जाणार फायनलमध्ये

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पहिली फायनल टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पण या मॅचवर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना रद्द झाला तर कोणती टीम फायनलला पोहोचणार, असा सवाल क्रिकेट रसिकांना पडला असेल.सेमी फायनलच्या वेळी इंग्लंडमधल्या हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण आयसीसीने सेमी फायनल आणि फायनल मॅचसाठी राखीव दिवस ठेवले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मॅच होऊ शकली नाही, तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवण्यात येईल.मॅनचेस्टरमध्ये मंगळवारी मॅच झाली नाही तर हा सामना बुधवारी…
Read More...

पाकिस्तान-बांग्लादेश सामना; टॉस हरल्यास पाकिस्तान बाहेर

सेमीफायनलमध्ये  प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला बांग्लादेशवर मोठा विजय मिळवावा लागेल. प्रचंड धावांच्या फरकाने बांग्लादेशला हरवावं लागणार आहे. त्यासाठी पाकिस्तानला पहिली फलंदाजी करणे अनिवार्य आहे. म्हणूनच सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला टॉस जिंकावा लागेल. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी लागेल. जर बांग्लादेशना नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला तर मात्र पाकिस्तानला कुठल्याही स्थितीत सेमीफायनल गाठणे कठीण होईल. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना कितीही मोठा विजय मिळवला तरीही पाकिस्तानचा नेट…
Read More...