InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

abvp

मराठा विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश ग्राह्य धरले जावेत यासाठी ‘अभाविप’चा राज्य…

राज्यात मराठा विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश, त्यासाठी आंदोलन, यावर न्यायालयाची भूमिका, सरकारची भूमिका यावरुन महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली. परंतू सरकारने अखेर यावर अध्यादेश जारी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबत माहिती दिली.याबाबत अभाविपने देखील सरकार पुढे आपली भूमिका मांडत विद्यार्थींचे रद्द करण्यात आलेले प्रवेश ग्रह्य धरावे आणि सरकारने त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावी अशी भूमिका मांडत पाठपुरावा केला होता. अखेर सरकारने विद्यार्थींच्या पाठीशी उभे राहत  सर्व विद्यार्थ्याचे प्रवेश कायम…
Read More...

मराठा समाजातील विद्यार्थी शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित

पुणे : महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या मराठा समाजातील आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमामध्ये निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच  घेतला. परंतु त्याचा अध्यादेश शिक्षणसंस्था व महाविद्यालय प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. नुकतीच महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये या विषयात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे यामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.आज अभाविप पुणे…
Read More...

नागराज मंजुळे विद्यापीठाचे जावई आहेत का?

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने दिले होते. दरम्यान, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात काढण्याच्या सूचना नागराज मंजुळे यांना दिल्या. मात्र नोटीस बजावून १५ दिवस झाले तरी शूटिंगसाठी उभारलेला सेट जैसे थे स्थितीत आहे. त्यामुळे नागराज मंजुळे विद्यापीठाचे…
Read More...

धर्मा पाटील प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना खुले पत्र

पुणे - सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर काल विरोधकांनी टीका करत सरकारवर चांगलीच आगपाखड केली. शेतकरी विरोधी सरकारने एकप्रकारे धर्मा पाटील यांची हत्याच केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली होती ,या टीकेनंतर आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राम सातपुते या विद्यार्थी नेत्याने लिहलेलं पत्र…
Read More...

अक्षय कुमार च्या हाती ‘अभाविप’ चा झेंडा

टीम महाराष्ट्र देशा: अभिनेता अक्षय कुमार याचा 'पॅडमॅन' नावाचा चित्रपट रिलीज होत आहे. दरम्यान अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी दिल्ली विद्यापीठात गेला होता. 'पॅडमॅन' हा एक चरित्रात्मक चित्रपट आहे. अरूणाचललम मुरूगगनाथम यांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारली आहे. या चित्रपटाचे प्रोमो, ट्रेलर्स, पोस्टर सध्या जोरदार चर्चेत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार याच्यासोबत राधिका आपटे आणि सोनम कपूरच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत.दिल्ली विद्यापीठात महिला मॅरेथॉनला अक्षय कुमारने हजेरी लावली. या…
Read More...

शुटिंगसाठी मैदान दिल्याने माजी सिनेट सदस्य नाराज

पुणे:‘एकिकडे विद्यापीठातील कॅन्टीनच्या खाद्यपदार्थांचे आणि रिफेक्ट्रीतील जेवणाचे दर वाढविण्याचे काम सुरू असून दुसरीकडे चित्रपटाच्या शूटिंगसाठी नाममात्र शुल्कात मैदान वापरण्यास देणे सुरू आहे, हे काम विद्यापीठ प्रशासनाला शोभत नाही. समाजातील विविध स्तरातून विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर टिका होत असताना प्रशासनाला मैदान वापरायला देण्याची आवश्यकता तरी काय ?,’ असा सवाल उपस्थित करत  विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने…
Read More...

मुंबई विद्यापीठाचे ऑनलाइन तक्रार निवारण केंद्र

वेबटीम : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभाराचा बऱ्याच विद्यार्थांना फटका बसला. प्रदीर्घ काळानंतर जाहीर झालेल्या निकालामध्ये असंख्य त्रुटींचे निरसन करण्यासाठी मुंबई विद्यापीठातील मदतकेंद्र अपुरे पडत असल्याने आता ऑनलाइन तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात  आले आहे.निकालातील तांत्रिक चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठाने सुरु केलेल्या ऑनलाइन केंद्रामुळे विद्यार्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ऑनलाइन केंद्राच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी १० अधिकाऱ्यांचा चमू कार्यरत असणार आहे. आलेल्या तक्रारींचा…
Read More...