InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

amit shah

मुलाच्या पराभवानंतर नारायण राणे अमित शाहांच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा मुलगा माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उभे होते. पण, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. पराभव जिव्हारी लागलेल्या नारायण राणे यांनी यापुढे निवडणूक लढवावी की नाही? याचा विचार करावा लागेल असं विधान केलं होतं. निकालाच्या दोन दिवसानंतर नारायण राणे दिल्लीला…
Read More...

नरेंद्र मोदी- अमित शाह यांनी घेतली आडवाणींची भेट

2014 पेक्षाही यंदा अधिक मोठा विजय भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळाला आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी विजयानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शुक्रवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली.भाजपाला आज जो विजय मिळाला तो लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या नेत्यांमुळेच मिळाला. त्यांनी अनेक दशकं मेहनत करुन पक्षाची बांधणी केली आणि जनतेसमोर एक नवीन विचारधाराही मांडली, असे या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.https://twitter.com/ANI/status/1131792436408279040…
Read More...

महाराष्ट्रात ‘राज’ फॅक्टर फेल? महाआघाडीची महापिछाडी?

महाराष्ट्रात एनडीएला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि विशेष: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला होता. मात्र महाराष्ट्रातील लोकसभा निकालावरून राज ठाकरे फॅक्टर फारसा प्रभावी ठरला नसल्याचे समोर आले आहे.महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा फॅक्टर राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीला फायदेशीर ठरेल अशी शक्यता होती. मात्र आतापर्यंत आलेल्या निकालात आघाडीला पुन्हा अपयशच आले आहे. भाजपला रोखण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेतल्या…
Read More...

अमित शाहांनी बोलावलेल्या मित्र पक्षांच्या बैठकीला उद्धव ठाकरे अनुपस्थित!

निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आहे आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमागे खरे कारण वेगळेच असल्याचे समोर आले आहे.लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह परदेश…
Read More...

निवडणूक आयोग भाजपचा एजंट; आप खासदार संजय सिंह यांचा आरोप

निवडणूक आयोगाचे कार्यालय हे भाजपच्या मुख्यालयात स्थलांतर केले पाहिजे अशी टीका आपचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे. पत्रकारांशी सवांद साधताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिलेल्या क्लीन चीटवरुन निवडणूक आयोगात मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून विरोधकांनी आता भाजपबरोबर निवडणूक आयोगावर सुद्धा निशाना साधला आहे.निवडणुक आयुक्त अशोक अवासा यांच्या नाराजीनंतर स्पष्ट झाले आहे की, निवडणूक आयोग निपक्ष:पणे काम करत नाही. निवडणूक आयोग भाजपचा एजंट…
Read More...

ममता बॅनर्जी यांनी दादागिरी केली तर कुठे बिघडलं ? – राज ठाकरे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. आजवर या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर बिघडलं कुठे?, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. अभिनेते संजय मोने आणि सुकन्या मोने यांनी आयोजित केलेल्या आम्र महोत्सवाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्धाटन झाले. यावेळी राज ठाकरे बोलत होते.अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून पळून आले. यांच्या बाबतीत हेच पाहिजे होतं, असे राज ठाकरे म्हणाले. भाजपचे…
Read More...

ममतांना टार्गेट करण्यासाठीच प.बंगालमध्ये राडा; मायावतींचा भाजपावर निशाणा

पश्चिम बंगालमध्ये घडलेला प्रकार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाच्या काही नेत्यांनी ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता हे स्पष्ट आहे. निवडणुकीचा असा प्रचार धोकादायक आणि अन्यायकारक आहे. अशाप्रकारचं राजकारण पंतप्रधानपदाला शोभणारं नाही असा आरोप बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी भाजपावर केला आहे.जर निवडणूक आयोगाला प्रचारबंदी करायची होती तर ती सकाळपासून का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच निवडणूक आयोगाचा निर्णय भाजपाच्या दबावाखाली…
Read More...

‘भाजपने बाहेरून गुंड आणून कोलकातामध्ये हिंसाचार केला’

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शोमध्ये दगडफेक झाली होती. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रोड शो वेळी तुफान राडा झाला. यावर भाजपने ममता बॅनर्जी यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते. यावर आता तृणमूल काँग्रेसने पलटवार केला आहे.भाजपने बाहेरून गुंड बोलवून, कोलकत्तामध्ये हिंसाचार केल्याचा आरोप, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते डेरेक ओ. ब्रायन यांनी पत्रकार परिषद केला आहे.डेरेक ओ. ब्रायन म्हणाले की, अमित शहा पश्चिम बंगालमध्ये बाहेरून गुंड घेऊन आले. भाजपच्या…
Read More...

निवडणूक काळात काश्मीर पेक्षा जास्त हिंसा पश्चिम बंगालमध्ये – मोदी

पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी म्हणाले, पश्चिम बंगालच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमधल्या निवडणुका जास्त शांततापूर्ण झाल्या. हिंसा आणि दहशतवाद म्हटल्यास पहिलं नाव काश्मीरचं येतं. परंतु काश्मीरमधल्या पंचायत निवडणुकीतही एवढी हिंसा झालेली नाही. तर दुसरीकडे बंगालच्या पंचायत निवडणुकीत शेकडो लोक मारले गेले आहेत. मोदी न्यूज 18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.हिंसा आणि दहशतवादाचा विषय आल्यास काश्मीरचं नाव…
Read More...

…म्हणून कोलकाता येथील योगी आदित्यनाथ यांची सभा केली रद्द

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शो वेळी मंगळवारी तुफान राडा झाला. यावेळी भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शो पूर्णत्वास जाऊ शकला नाही. राड्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज कोलकाता येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची होणारी सभा भाजपतर्फे रद्द करण्यात आली आहे.“आज दुपारी दोन वाजता कोलकात्यात योगी आदित्यनाथ यांची सभा होणार होती. मात्र काल भडकलेल्या हिंसेनंतर काही लोक योगी आदित्यनाथ यांची सभा…
Read More...