InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Arvind Kejriwal

अरविंद केजरीवाल यांनी पाठवली गौतम गंभीरला नोटीस

आप उमेदवार आतिशी यांच्यासंदर्भात वादग्रस्त पत्रके वाटल्याचा आरोप आपने गौतम गंभीरवर केला होता. त्यानंतर गौतम गंभीरने केजरीवाल करताना म्हटले की, मला लाज वाटते की, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी केजरीवाल यांच्या सारखा व्यक्ती बसलेला आहे. तुम्ही अत्यंत घाणेरडे मुख्यमंत्री असून तुमच्याच झाडूने तुमचा मेंदू साफ करण्याची गरज आहे. आम आदमी पक्षाचे चिन्ह झाडू असून त्यावर गंभीरने केजरीवाल यांच्यावर टीका होती.या वक्तव्यावरून अरविंद केजरीवाल यांनी गंभीरला नोटीस बजावली आहे.  24 तासाच्या आत, उत्तर देऊन माफी…
Read More...

‘काही काम नसेल तर घरी जेवायला या’, शीला दीक्षित यांचे केजरीवालांना आमंत्रण

दिल्लीत आज 7 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्याआधीच दिल्लीच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये ट्विटरवार पाहायला मिळाले.दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट जेवणाचेच आमंत्रण दिले आहे. शीला दिक्षित यांनी ट्विट केले की, माझ्या प्रकृतीसंदर्भात अफवार का पसरवताय. जर काही काम नसेल तर घरी जेवायला या. त्या निमित्ताने माझी प्रकृती कशी आहे ते देखील पाहता येईल. अफवा न पसरवता निवडणूक लढण्यास शिका असे ट्विट दीक्षित यांनी केले.…
Read More...

‘माझ्या वडिलांनी केजरीवालांना 6 कोटी देऊन खरेदी केले पश्चिम दिल्ली मतदार संघाचे तिकिट’

लोकसभा निवडणुकीसाठी उद्या दिल्लीत मतदान होणार असून त्यापूर्वी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. आम आदमी पक्षाचे पश्चिम दिल्लीतील उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखड यांनी, तिकीटासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. केजरीवाल यांना पैसे दिल्याचा आपला ठोस पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.उदय जाखड यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला आव्हान देत म्हटले आहे की माझे वडील पहिल्यापासून 'आप'मध्ये होते अथवा ते 'अण्णा' आंदोलनाशी…
Read More...

‘सामना’तून केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखामधून आपचे सर्वेसर्वा आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘किती थपडा खाल?’ या मथळ्याखाली आज सामनामधून उद्धव ठाकरे यांनी नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.‘नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात. आम्ही या प्रकाराशी सहमत नाही. केजरीवाल यांच्या सुरक्षेत कोणतीही…
Read More...

रोड शो दरम्यान अरविंद केजरीवाल यांना तरूणाने कानशिलात लगावली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर रोड शो दरम्यान एका तरूणाने कानशिलात लगावण्याची घटना घडली आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मोतीनगरमध्ये आपचे उमेदवार बृजेश गोयल यांच्या प्रचारासाठी आले होते.त्याचवेळी अचानक एक युवक त्यांच्या जीपच्या बोनटवर चढला आणि कानाखाली मारले.हल्ल्यानंतर तरूणाला आपच्या कार्यकर्त्यांनी तरूणाला बेदम चोपत, पोलिसांच्या हवाली केले. केजरीवालांवर हल्ला करणाऱ्याचे नाव सुरेश असून तो कैलास पार्क येथील रहिवासी आहे. यापूर्वी 2014 मध्ये सुद्धा एका युवकाने अरविंद केजरीवाल…
Read More...

काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला नाही – अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आपचे उमेदवार दिलीप पांडे यांच्या प्रचारासाठी रोड शो केला. यावेळी त्यांनी भाजप दिल्ली अध्यक्ष आणि उमेदवार मनोज तिवारी यांच्यावर नाचणाऱ्याला मत देऊ नका, अशा शब्दात टीका केली आहे.अरविंद केजरीवाल म्हणाले की, मनोज तिवारी चांगले नाचतात. दिलीप पांडे यांना नाचता येत नाही, मात्र काम करता येते. त्यामुळे काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला देऊ नका.'उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातून आपकडून उमेदवार दिलीप पांडे, भाजपचे उमेदवार मनोज तिवारी आणि…
Read More...

“भाजपनं आपच्या आमदारांना दिली 10 कोटींची ऑफर”

सध्या दिल्लीमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत.आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपने आम आदमी पक्षाच्या 7 आमदारांना 10 – 10 कोटीची ऑफर दिली. त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.ल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी देखील भाजपवर आमदार खरेदीचा आरोप केला होता. नरेंद्र मोदींना हे शोभत नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी झाली…
Read More...

मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या संबधी उत्तर प्रदेश पोलिसांना 2 धमकीची पत्रे मिळाली आहेत. या पत्रामध्ये रेल्वे स्टेशन आणि मंदिरही उडवण्याचा उल्लेख आहे.शामली आणि रुडकी रेल्वे स्‍टेशनवर या चिट्ठ्या मिळाल्या आहेत. यामध्ये अयोध्येच्या ‘राम जन्‍मभूमीवर’ हल्ला करणार असल्याचे देखील म्हटले आहे.संबंधित प्रकरण हे एटीएसकडे सोपवण्यात आले आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर…
Read More...

मंदिर, मशिदीला भेट देऊन राष्ट्रनिर्माण होणार नाही- केजरीवाल

मंदीर आणि मशीदीला भेट देऊन राष्ट्रनिर्माण होणार नाही, मोदी आणि राहुल गांधी यांनी धार्मिक स्थळांना दिलेल्या भेटीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.राष्ट्रनिर्माण हे मंदीर मशीदीत जाऊन नाहीतर देशात चांगल्या प्रकारे शिक्षणाची सोय, उच्च दर्जाचे दवाखाने उभे करुन, चांगले रस्ते, पाणी आमि वीज या सोयी सुविधांच्या नागरिकांना पुरवून होत असतात, असे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.…
Read More...