InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

beed

माढा, पुणे, नागपूर या प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाला होणार उशीर

लोकसभा निवडणुकीचे मतमोजणीला सुरुवात झाली असून, प्रत्येकाला आपल्या मतदार संघाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. राज्यातील माढा, पुणे, नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल उशिराने हाती येणार आहेत. सर्वाधिक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने या लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक निकाल येण्यास विलंब होणार आहे. दुसरीकडे  मात्र गडचिरोली-चिमूर दिंडोरी, सातारा, लातूर, नंदुरबार, अकोला या मतदारसंघांतील निवडणूक निकाल उमेदवारांची संख्या कमी असल्याने सर्वप्रथम येथील निकाल हाती येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या…
Read More...

… आणि शरद पवार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटूंबाला म्हणाले, कर्ज फेडू नका, मी बघतो!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी बीड जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला. शरद पवार यांनी खडकत गावापासून दुष्काळी दौरा केला. पवारांनी चार ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. मात्र परत जाताना शरद पवारांना एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समजलं. आष्टी तालुक्यातील इमनगाव येथील शरद साबळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती पवारांना मिळताच त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट…
Read More...

बीड सत्र न्यायालयाची अनोखी शिक्षा; वाळूचोरट्यांना ‘वॉटर कप’साठी करायला लावले श्रमदान

बीडमध्ये भर उन्हात हातात कुदळ-फावडं घेऊन गेवराईचे सहा युवक बांधबंधिस्ताचे काम करत आहेत. या युवकांनी स्वतःला स्वेच्छेने श्रमदानात झोकून दिलेले नाही, तर बीड सत्र न्यायालयाच्या एका आदेशाने त्यांच्यावर श्रमदानाची वेळ आली आहे. वाळू चोरी करणाऱ्या आरोपींना न्यायालयाकडून कडक शिक्षा करताना आपण पाहिले आहे. मात्र, बीडच्या न्यायालयाची ही शिक्षा अनोखी म्हणता येईल. 4 ऑगस्ट 2017 रोजी अवैध वाळू उत्खनन होत असल्याची बाब गेवराईचे मंडळ अधिकारी सुनील तांबारे यांच्या लक्षात आली. त्यानंतर आरोपी तरुणांचा ट्रॅक्‍टर…
Read More...

बीडमध्ये दुष्काळ परिस्थितीत चारा छावणीत मोठा भ्रष्टाचार; शिवसेना जिल्हाप्रमुखांचे पितळ उघडे

चारा छावणीत भ्रष्टाचार केल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या चारा छावणीत तब्बल 800 बोगस जनावरे दाखवण्यात आली होती. प्रशासनाने या भ्रष्ट शिवसेना जिल्हाप्रमुखाचे पितळ उघडे पाडत कारवाई केली आहे. बीड तालुक्यातील कोल्हारवाडी इथल्या चारा छावणीला उपजिल्हाधिकार्‍यांच्या तपास पथकानं भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखानं छावणीतील काळेबेरे उघड होऊ नये म्हणून छावणी तपासणीसाठी आलेल्या महिला उपजिल्हाधिकार्‍यांच्या पथकाला तपासणीपासून तासभर रोखलं. तसंच…
Read More...

मुख्यमंत्री सर, तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये – पंकजा मुंडे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्या नंतर, बीडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनायक मेटे यांना म्हणाले की, जो बीडमध्ये भाजपसोबत तोच राज्यात महायुती सोबत असेल. त्यांना माझं सांगणं आहे भारतीय जनता पार्टी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून जो गोपीनाथ मुंडेंसोबत राहू शकत नाही तो भाजपसोबतही नाही.'  असा थेट इशाराच दिला. यावर सभेत पंकजा मुंडे यांनी देखील विनायक मेटे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मुंडे म्हणाल्या…
Read More...

बीडमध्ये विनायक मेटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला तर इतरत्र भाजपला पाठिंबा देणार, अशी भुमिका घेतली  आहे. मेटे यांनी आता उघडपणे बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार शेतकरीपुत्र बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी तीन वेळा ठरवल्यानंतरही माझा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये, यासाठी पंकजा मुंडे यांनी थेट राजीनामा देऊन घरी बसण्याच्या धमक्या देत विरोध केला. तरीही आपण घटक पक्ष म्हणून काही उघडपणे बोललो नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी लेखी, तोंडी आदेश देऊनही…
Read More...

तुम्ही स्वतः लोकसभा निवडणूक का लढवत नाही?, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना सवाल

राज्याचं नेतृत्व करतो, असं म्हणणारे मागच्या दाराने येतात, स्वतः मात्र निवडणूक लढवत नाहीत इतरांना पुढे करतात, असे म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचं आव्हान दिलं  आहे. अर्ज भरायला आणखी एक दिवस बाकी आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करा, मग महाराष्ट्राची आणि बीडची जनता दाखवेल की कोणावर प्रेम करते. असे आव्हान पंकजा मुंडे यांनी केलं. तुम्ही स्वतः लोकसभा निवडणूक का लढवत नाही?, असा सवाल देखील पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना केला.  महत्त्वाच्या बातम्या – स्टार…
Read More...

‘धनुदादा’ अशी हाक आता मला ऐकायला मिळत नाही, धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

पंकजा मुंडे आणि आपल्या नात्यात आता अंतर पडले आहे. आता बहीण-भावाचा संबंधही राहिलेला नाही. पण ज्यावेळी आमच्यात सुरळित सुरू होते. त्यावेळी त्या मला ‘धनुदादा’ अशी हाक मारत. ही हाक माझ्यासाठी भावणारा विषय आहे. पण ही हाक आता मला ऐकायला मिळत नाही, अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते. माझी आवडती ताई सुप्रियाताई आहेत. काकांबरोबरचे नाते मी कधीच विसरु शकत नाही. पुढच्या जन्मीही मला तेच काका लाभावेत, असेही ते म्हणाले. महत्त्वाच्या बातम्या – राज ठाकरे यांनी घेतलेल्या…
Read More...

Breaking: मराठा आरक्षणासाठी तरुणाची ग्रामपंचायत कार्यालयाला गळफास लावत आत्महत्या

बीड : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आणखीन एका तरुणाने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे, बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील सतीश भगवान होळकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला फाशी घेत आत्महत्या केली आहे. राज्यभरात सध्या मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटल्याच दिसत आहे, अनेक ठिकाणी आंदोलकांकडून एसटी बस आणि गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. 1 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन देखील केले जात आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा…
Read More...

मराठा आरक्षण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून निर्णय जाहीर करा : सुरेश धस

 टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. त्यामुळे यावर कोर्टात प्रलंबित असलेले मराठा आरक्षणचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात यावे अशी मागणी भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी परळीत बोलताना केली. सुरेश धस यांनी परळीत मराठा आंदोलकांसोबत भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर आरक्षणाविषयी प्रलंबित प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे अशी मागणी यावेळी केली. मागील आठ दिवसांपासून परळीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. इतर प्रकरणाप्रमाणे…
Read More...